📰 जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीतील कार्यालयांमधील धार्मिक प्रतिमा आणि चिन्हे हटवणार!
कोल्हापूर: (प्रतिनिधी) – जिल्हाधिकारी कार्यालय आणि त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या विभागीय कार्यालयांमधील धार्मिक प्रतिमा आणि चिन्हांचे विधीनुसार सन्मानपूर्वक काढण्याबाबत कोल्हापूरचे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी आदेश दिले आहेत.
संविधान सन्मान युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. निलेश रंजना आनंद बनसोडे, रा. विचारे माळ, कोल्हापूर यांनी केलेल्या निवेदनानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने ही कार्यवाही केली आहे.
प्रमुख मुद्दा: जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथील निवासी उपजिल्हाधिकारी (क्र./कावि/१७९/कावि/स्वी/१३९०/२०२५) यांनी २९/१०/२०२५ रोजी हे पत्र जारी केले आहे.
या कार्यालयांना निर्देश:
हे पत्र जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहाय्यक, अपर जिल्हाधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि इतर संबंधित विभागीय अधिकाऱ्यांसह एकूण १८ विभागांना कार्यवाहीसाठी पाठवण्यात आले आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी, कोल्हापूर यांच्या स्वाक्षरीने जारी केलेल्या या आदेशात नमूद केले आहे की, श्री. निलेश रंजना आनंद बनसोडे यांनी जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांच्याकडे केलेल्या निवेदनानुसार सर्व संबंधित कार्यालयांनी नियमानुसार उचित कार्यवाही करावी.

