माध्यम प्रतिनिधींनी अधिस्वीकृतीसाठी परिपूर्ण प्रस्ताव पाठवावेत – उपसंचालक प्रवीण टाके यांचे आवाहनइलेक्ट्रॉनिक्स माध्यमांसोबत कोल्हापूर उपसंचालक कार्यालयात महत्त्वपूर्ण चर्चा ***

माध्यम प्रतिनिधींनी अधिस्वीकृतीसाठी परिपूर्ण प्रस्ताव पाठवावेत – उपसंचालक प्रवीण टाके यांचे आवाहनइलेक्ट्रॉनिक्स माध्यमांसोबत कोल्हापूर उपसंचालक कार्यालयात महत्त्वपूर्ण चर्चा ***

📰 माध्यम प्रतिनिधींनी अधिस्वीकृतीसाठी परिपूर्ण प्रस्ताव पाठवावेत – उपसंचालक प्रवीण टाके यांचे आवाहन
इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांसोबत कोल्हापूर उपसंचालक कार्यालयात महत्त्वपूर्ण चर्चा ***
कोल्हापूर दि :१९
राज्य शासनाने पत्रकारांसाठी स्वर्गीय शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी, आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान निधी योजना, अधिस्वीकृती पत्रिका अशा अनेक महत्त्वाच्या योजना राबवल्या आहेत. या योजनांचे प्रस्ताव पाठवताना ते परिपूर्णरित्या पाठवावेत, असे आवाहन उपसंचालक प्रवीण टाके यांनी आज केले.
कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयाने आज इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांसाठी राष्ट्रीय पत्रकार दिन व अधिस्वीकृती परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी राज्य शासनाने माध्यमांसाठी उपलब्ध केलेल्या विविध सुविधांविषयी त्यांनी माहिती दिली.

पत्रकारांना अधिकाधिक सुविधा मिळाव्यात व अधिकाधिक पत्रकार सुविधांसाठी पात्र ठरावेत, असा शासनाचा प्रयत्न आहे. मात्र, त्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव आवश्यक असतात. प्रस्ताव परिपूर्ण करण्यासाठी पत्रकारांनी जिल्हा माहिती कार्यालयाची मदत घ्यावी, असे आवाहन श्री. टाके यांनी यावेळी केले.
🎥 वृत्तांकनासंदर्भात इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या अपेक्षा
कार्यक्रमादरम्यान, जिल्हा माहिती कार्यालयामार्फत वृत्तांकनासंदर्भात इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या अपेक्षांवरही चर्चा झाली. चर्चेत सहभागी होताना पत्रकारांनी, इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठी जिल्हा माहिती कार्यालयाने संबंधित कार्यक्रमांचे व्हिडिओ फुटेज (छायाचित्रण) तात्काळ उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना केली.
🤝 पत्रकारांच्या सुविधांसाठी पाठपुरावा करणार – जिल्हा माहिती अधिकारी
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी शासकीय कार्यक्रमांना व यशोगाथांना इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी प्रसिद्धी द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच, जिल्हा माहिती कार्यालयाकडून पत्रकारांच्या सुविधांसाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
  • उपसंपादक रणजीत पवार यांनी पत्रकारांसाठी राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या विविध सोयी-सुविधांची माहिती दिली.
  • विभागीय माहिती कार्यालयाने यापूर्वी बेळगाव येथील पत्रकारांसाठी अधिस्वीकृती पत्रिका मार्गदर्शन कार्यशाळा आणि कोल्हापूर येथील दैनिक/साप्ताहिक संपादक चर्चासत्र आयोजित केले होते. आज इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रतिनिधींसाठी या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक संचालक श्रीमती वृषाली पाटील यांनी केले. यावेळी माहिती अधिकारी फारुख बागवान यांच्यासह इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रताप नाईक, रणजीत माजगावकर, विजय केसरकर, विजयकुमार कुंभार, कृष्णात जमदाडे, शेखर पाटील, विश्वास कोरे, विशाल पुजारी, अमरसिंह पाटील, चंद्रकांत कबाडे आदी प्रतिनिधी उपस्थित होते.
    पुढील माहितीसाठी किंवा अधिस्वीकृती प्रक्रियेतील मदतीसाठी आपण जिल्हा माहिती कार्यालयाशी संपर्क साधू शकता.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *