
स्वराज्य क्रांती सेना ‘पँथर आर्मी’चा भव्य नियुक्ती सोहळा संपन्न: फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचा जागर
नायगाव (पालघर): फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचा प्रसार करून समाजात जनजागृती करण्याच्या उद्देशाने पँथर आर्मी प्रमुख संतोषदादा आठवले यांच्या आदेशाने नायगाव (पूर्व) येथील स्टार सिटी येथे रविवारी, १२ जुलै २०२६ रोजी एका विशेष नियुक्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात संघटनेच्या विविध स्तरावरील नवीन पदाधिकाऱ्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली.

कार्यक्रमाचे नेतृत्व ‘स्वराज्य क्रांती सेना – पँथर आर्मी’चे महाराष्ट्र प्रदेश महासचिव ॲड. किरणराव मोरे यांनी केले. ‘पँथर आर्मी जिंदाबाद’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. प्रत्येक गावात जाऊन फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत ‘पँथर’ जागृत करण्याचे महत्त्वाचे ध्येय संघटनेने या वेळी मांडले.

या सोहळ्याला ज्येष्ठ पत्रकार व राष्ट्रीय सल्लागार मा. श्री. उमेश जामसांडेकर, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. श्री. प्रा. अरुण मेढे सर हे मान्यवर उपस्थित होते. त्यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची यादी:
सोहळ्यात खालीलप्रमाणे विविध पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या:
| अ.क्र. | नाव | पद |
|---|---|---|
| १ | मा. श्री. वसंत शिवराम तायडे | वॉर्ड अध्यक्ष |
| २ | मा. श्री. सुभाष बबरु घोडके | ग्रामपंचायत अध्यक्ष |
| ३ | मा. श्री. सचिन ज्ञानोबा कांबळे | कार्यकारिणी सचिव (नायगाव शहर) |
| ४ | मा. श्री. संकेत देवेंद्र भटकर | वसई-विरार शहर अध्यक्ष |
| ५ | मा. श्री. विकास विष्णू पाटील | वसई-विरार शहर सरचिटणीस |
| ६ | मा. श्री. वसंत बनसोड | मीरा-भाईंदर अध्यक्ष |
| ७ | मा. श्री. अर्जुन डावरे | मीरा-भाईंदर सरचिटणीस |
| ८ | मा. श्री. सुनील डावरे | जिल्हा कार्याध्यक्ष |
| ९ | मा. श्री. संदेश भोईर | जिल्हा सचिव |
| १० | मा. सौ. रेखा राजू जावळे | महिला जिल्हा कार्याध्यक्षा |
| ११ | मा. सौ. संगीता बोरकर | तालुका महिला अध्यक्ष (नायगाव) |
| १२ | मा. श्री. राजू मगर | तालुका अध्यक्ष |
| १३ | मा. श्री. ओमकार | जिल्हा कार्याध्यक्ष |
| १४ | मा. श्री. संजय पाटील | महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष |
| १५ | मा. श्री. गंगाधर भालेराव | पालघर जिल्हा (उच्चशिक्षित तज्ज्ञ) |
या नियुक्ती सोहळ्यामुळे पँथर आर्मीच्या संघटनात्मक बांधणीला नवी गती मिळाली असून, भविष्यात जनहिताची कामे अधिक ताकदीने केली जातील, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.




