स्वराज्य क्रांती सेना पँथर आर्मीच्या वतीने नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा नियुक्ती सोहळा संपन्न
नायगाव (पालघर):
फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचा प्रसार करून समाजात जनजागृती करण्याच्या उद्देशाने ‘स्वराज्य क्रांती सेना पँथर आर्मी’ संस्थापक प्रमुख संतोषदादा आठवले यांच्या आदेशाने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी, १२ जुलै २०२६ रोजी नायगाव (पूर्व), ता. वसई येथील स्टार सिटी येथे हा नियुक्ती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे नेतृत्व ‘स्वराज्य क्रांती सेना ‘पँथर आर्मी’चे महाराष्ट्र प्रदेश महासचिव अॅड किरणराव मोरे यांनी केले. या सोहळ्यात संघटनेच्या विविध स्तरावरील पदाधिकाऱ्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली. यामध्ये जिल्हा कार्याध्यक्ष, तालुका अध्यक्ष, महानगरपालिका अध्यक्ष, वॉर्ड अध्यक्ष, ग्रामपंचायत अध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अशा महत्त्वपूर्ण पदांवर नियुक्ती करण्यात आली.
‘पँथर आर्मी जिंदाबाद’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. प्रत्येक गावात जाऊन फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीतून ‘पँथर’ जागृत करण्याचे महत्त्वाचे काम संघटनेमार्फत हाती घेण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते, ज्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली:
- मा. श्री. उमेश जामसांडेकर: ज्येष्ठ पत्रकार आणि राष्ट्रीय सल्लागार.
- मा. श्री. प्रा. अरुण मेढे सर: महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष
- ऍड. किरण म्हात्रे: उच्चशिक्षित महाराष्ट्र प्रदेश महिला सचिव.
यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले असून, संघटनेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
