काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन…

  • काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन…

काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन…

कोल्हापूर – काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन झाले.गेल्या काही दिवसांपासून हैदराबाद येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार होते. हैदराबादमधून त्यांचे पार्थिव दुपारी एक वाजेपर्यंत कोल्हापुरात आणण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. 2019 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचा पराभव केला होता. मनमिळावू व कार्यतत्पर अशी ओळख असणाऱ्या जाधव यांच्या मृत्यूने उद्योगासह राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

गेल्या दीड वर्षापासून त्यांना दोन वेळा कोरोनाची लागण झाली होती. त्यातून ते ठणठणीत बरे झाले होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांना पुन्हा त्रास होऊ लागल्याने हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.