रत्नागिरी : वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा रेखा ठाकूर, राज्य उपाध्यक्ष गोविंद दळवी व वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष डॉ अरुण सावंत यांचा रत्नागिरी जिल्हा दौरा दि. ३ डिसेंबर 2021 रोजी सकाळी ११:०० वाजता स्वामी विवेकानंद हॉल मध्यवर्ती एस टि स्टॅन्ड समोर चिपळूण येथे होणार आहे.
जिल्ह्यातील सर्व आजी-माजी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कळविण्यात येते की, संपूर्ण महाराष्ट्रात वंचितांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या , छोट्या , छोट्या समुहांना राजकीय अस्तित्त्वाची जाणीव करून देणा-या वंचित बहुजन आघाडीस मिळणारा प्रतिसाद ,पाठिंबा पाहता रत्नागिरी जिल्हा मात्र उदासीन दिसून येत आहे. इथल्या संख्येने प्रचंड असलेल्या कुणबी समाजाचा प्रस्थापित शिवसेना ,भाजप , राष्ट्रीय काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस यांनी फक्त वापरच केला आहे. भंडारी , मुस्लिम ,लिंगायत गुरव ,तेली , कुंभार ,धनगर आणि बौद्ध समाज हे सर्व समाज राजकीय दृष्ट्या सक्षम आणि प्रभावशाली असताना राजकीय उपेक्षा भोगत आहेत. येणा-या स्थानिक पातळीवरील स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हि कोंडी फोडण्यासाठी , आणि वंचित बहुजन आघाडीच्या वाडी , गाव ,गण ,महाल , तालुका स्तरावरील कार्यकर्त्यांना संघटित करून ,पक्षाची ध्येयधोरणे , भूमिका विषद करणे ,त्यांच्यातील आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे . सदर संघटन समिक्षा मेळावा हा रत्नागिरी कार्यकारिणी व महिला आघाडी कार्यकारणी तसेच श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांवर निष्ठा असलेले सर्वच कार्यकर्ते ,समर्थक आणि हितचितकांसाठी महत्वाचा असून .वंचित बहुजन आघाडी व श्रध्देय बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे रत्नागिरीचे (दक्षिण) जिल्हाध्यक्ष रुपेंद्र जाधव आणि रत्नागिरी (उत्तर) जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांनी केले आहे.