भाट्ये पुलावरून समुद्रात उडी मारणार्‍या तरुणाला स्थानिक मच्छिमारांनी वाचवले

भाट्ये पुलावरून समुद्रात उडी मारणार्‍या तरुणाला स्थानिक मच्छिमारांनी वाचवले

रत्नागिरी : राजीवडा – भाट्ये येथील पुलावरून एका तरुणाने समुद्रात उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना आज, मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. मात्र, काही तरुणांनी बोटीच्या साह्याने या तरुणाला वाचविले. आफान रऊफ वस्ता, अरमान नजीर होडेकर, सलमान नजीर होडेकर असे या जीव वाचविणार्‍या तरुणांची नावे आहेत.

याबाबत माहिती अशी की, अतुल बागडे या तरुणाने १२ वाजता राजीवडा-भाट्ये पुलावरून खाडीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, खाडीत बुडणाऱ्या अतुल याचा राजीवडा येथील तरुणांनी तत्काळ होडी घेऊन जीव वाचवला.

या पुलावरून अनेकांनी खाडीत उडी मारून आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु, बुडणाऱ्या अनेकांचा जीव राजीवडा येथील स्थानिक मच्छीमारांनी वाचविले आहेत. मच्छीमारांना दाखवलेल्या या प्रसंगावधानाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.