प्रतिनिधी:करण झनके
बुलढाणा:22/12/21 सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारच्या वटहुकुमावर स्थगिती कायम राज्यातील इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) राजकीय प्रतिनिधित्वाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्य सरकार न्यायालयात अभ्यासपूर्ण तसेच प्रभावीपणे बाजू मांडण्यात मागे पडले आहे. जोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ओबीसीच्या राजकीय प्रतिनिधित्वाचा तिढा सुटत नाही तोपर्यंत राज्यातील निवडणुका पुढे ढकलण्यात यावा, अश्या मागणीचे निवेदन बुलढाणा जिल्हाधिकारी यांच्याकडे बहुजन समाज पार्टी वतीने देण्यात आले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की राज्यातील ओबीसी बांधवांची माहिती एकत्रित करण्यासाठी राज्य सरकारने निर्देश दयावे, अशी बसपाची आग्रही मागणी आहे. संबंधित माहिती एकत्रित करण्यासाठी पुरेसा निधी सरकारकडून पुरवण्यात आला नसल्या चेही समोर आली आहे.
यासह विविध मागण्या निवेदन देण्यात आले आहे. सदर निवेदनावर बसपा चे प्रभात खिल्लारे प्रदेश सचिव
मनोज इंगळे.प्रदेश सदस्य, सोपान सावरकर अमरावती झोन प्रभारी,संतोष तायडे झोन प्रभारी,ऍड डी.एम. भगत जिल्हा अध्यक्ष,अरुण माळी जिल्हा उपाध्यक्ष,दिलीप सरकटे जिल्हा महासचिव,धम्मपाल तायडे जिल्हा कोषाध्यक्ष, धिरज इंगळे संघटक मंत्री,हिम्मतराव जाधव संयोजक,तसेच बुलडाणा जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांच्या साह्य आहेत.
Posted inबुलढाणा