रत्नागिरी/ जिल्हा प्रतिनिधी
रत्नागिरी : भाईशा घोसाळकर व ज्युनियर कॉलेज कडवई याठिकाणी दि. 20 डिसेंबर रोजी राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या पुण्यातिथी निमित्त अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रवींद्र खानविलकर उपस्थित होते. त्यांनी हायस्कुल व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यादरम्यान गाडगे महाराज यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. अस्वच्छता, अज्ञान अंधश्रद्धा निर्मूलन यांची कास धरून गरीब समाजातील स्वतःचे जीवन कार्य वाहून घेतले व समजला एक वेगळी दिशा संत गाडगेबाबा यांनी दिली. कीर्तनाचा प्रभावी माध्यम याचा वापर करून तळागाळातील लोकांपर्यत स्वच्छतेचे महत्व त्यांनी पटवून दिले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये याचा अंगीकार केला पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले. तसेच ‘वैज्ञानिक विचार’ या विषयासंबंधित गाडगे बाबांनी वेगवेगळे उपक्रम कसे राबवले व त्यामध्ये समाजाचा प्रभावी वापर त्यांनी केला याचे अनेक दाखले त्यांनी विद्यार्थ्यांना दिले.
यावेळी प्रशाळेचे मुख्याध्यापक अवघडे सर, पेयवेक्षक साळुंखे सर, शांताराम भुरवणे सर, कुंभार सर व महाविद्यालयाचे प्राध्यापक , विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.