बुलडाणा : जिल्ह्यातील ३३ ग्रामपंचायतींची निवडणूक निकाल जाहीर ;

बुलडाणा : जिल्ह्यातील ३३ ग्रामपंचायतींची निवडणूक २१ डिसेंबरला झाली आणि काल, २२ डिसेंबरला मतमोजणी होऊन नवे सदस्यही समोर आले. ग्रामपंचायतीच्या निवडणुका पक्षावर लढवल्या जात नसल्या तरी राजकारणाचा प्रभाव मात्र मोठ्या प्रमाणावर असतो. पोटनिवडणुकांत बहुतांश ठिकाणी काँग्रेसचा वरचष्मा दिसून आला आहे.

असे आहेत विजयी उमेदवार…

बुलडाणा तालुक्यात चांडोळ येथे सविता राऊत, सावळा सुंदरखेड येथे पूजा हिवाळे.

• सिंदखेड राजा : दत्तपूर येथे कृष्णा राजू पवार, वरूडी येथे दीपक गुंजकर, सवडद येथे सतीश काटकर, सोयंदेव येथे मायावती खरात.

• शेगाव : डोलारखेड येथे अनिल हिवराळे, जलंब येथे वैशाली सुनील हेलोडे, वरूड येथे पंचशीला सुहास गवई.

मोताळा : अंत्री येथे विश्वंभर लाहुडकर, वरूड येथे सौ. संगिता वाकोडे, कोथळी सुनंदा इंगळे, उबाळखेड येथे आकाश भिसे, आव्हा येथे साहेबराव ढगे, सारोळापीर येथे कल्पना चव्हाण, कोल्ही गोलर येथे शारदा निशानकर, किन्होळा येथे उज्ज्वला कुऱ्हाळे.

• खामगाव : वाडी येथे सौ. शीतल ललीत तांगडे, पिंप्री देशमुख येथे शांताराम जगदेव वसतकार, नांद्री येथे सौ. धृपदाबाई श्रीराम तिवाले, जयरामगड येथे सखुबाई आत्माराम जाधव.

• मलकापूर : रणथम (चिखली) येथे गिताबाई मेहेंगे, देवधाबा येथे नीलेश बोरसे, वाकोडी येथे गायत्री पाटील.

संग्रामपूर : सोनाळा येथे राधेश्याम बिबेकर. • लोणार : गुंधा येथे नयना अशोक ताजने, धाड येथे प्रताप केशव शेजुळ, बाबुलखेड येथे इंदूबाई सुरेश हाडे, दाभा येथे गणेश पंढरी अजगर.

देऊळगाव राजा : देऊळगाव मही येथे दीपिका गजानन खरात.

• चिखली : पेठ येथे नंदा लक्ष्मण शेळके, खैरव येथे नंदकिशोर भास्कर सपकाळ.