ग्रामपंचायत कबनूरच्या ग्रामसभेत गावठाण हद्द वाडीसह सर्व विषयांना मंजुरी
कबनूर -(विशेष प्रतिनिधी चंदुलाल फकीर) कबनूर येथील गाव सभा गावठाण हद्दवाढ, २०२२-२०२३ चे अंदाज पत्रकासह विविध विषयावर चर्चा करण्यासाठी ऑफलाइन गाव सभा बोलावण्यात आली होती. त्यामध्ये सविस्तर चर्चा होऊन सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच सुधीर पाटील होते. सभेच्या सुरुवातीलाच सभाअध्यक्ष सुधीर पाटील यांनी प्रत्येकाला बोलण्याची संधी दिली जाईल प्रत्येकाच्या प्रश्नाची उत्तरे दिली जातील परवानगी घेऊनच एक एक जण बोला म्हणजे सर्वांना त्याची माहिती होईल असे सांगितले. सुरुवातीलाच गाव सभेला आरोग्य अधिकारी व इतर अधिकारी का उपस्थित नाहीत? समस्या गावकऱ्यांनी कोणासमोर मांडायच्या? यावरून ग्रामस्थांनी एकाच वेळी प्रश्नाचा भडिमार केला. सुरुवातीलाच गाव सभा सुरू होण्यापूर्वीच ग्रामस्थांना खुर्च्या बसायला कमी पडल्याने एका संतप्त नागरिकांने सभाअध्यक्ष यांना आम्हा ग्रामस्थांना जोपर्यंत बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था होत नाही तोपर्यंत तुम्ही खुर्चीत बसायचे नाही. उठा,म्हणून डायस वरील सर्वांनाच उठवले व खुर्च्या आल्यानंतरच सर्व जण बसले त्यानंतर सभेला सुरुवात झाली गावठाण हद्दवाढवर चर्चा होऊन गावठाण हद्द वाढ व्हावी असा ठराव करण्यात आला. संविधान सभागृह बांधावे असा ठराव करण्यात आला दरम्यान दत्तनगर येथील महिलांनी पाणी प्रश्न व दिवाबत्तीची गैरसोयीबद्दल प्रश्नाचा भडिमार केला गावातील नागरिकांनीही गावातील विविध प्रश्नावर विचारणा केली. यावेळी झालेल्या चर्चेत बाळासो कामत, दिलावर पटेल, अल्ताफ मुजावर,शिवाजी चव्हाण, महावीर लिगाडे, महावीर पिंपळे, गजानन आमले, महादेव पाटील, महावीर कांबळे, मधुकर फरांडे, रियाज चिकोडे, प्रमोद पाटील, बबन केटकाळे आदींनी सहभाग घेतला यावेळी जिल्हा परिषद सदस्य विजयाताई पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती रेश्मा सनदी, ग्रामसेवक,ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका,मदतनीस व ग्रामस्थ उपस्थित होते.
Posted inकोल्हापूर