नाडगाव रस्त्यावर मोटारसायकलीची समोरासमोर धडक, एक ठार, एक गंभीर

नाडगाव रस्त्यावर मोटारसायकलीची समोरासमोर धडक, एक ठार, एक गंभीर

बोदवड शहरातील नाडगाव रोडवरील रस्त्यावर मोटारसायकल समोरासमोर धडकल्याने एक ठार एक महिला गंभीर व दोन पुरुष जखमी झाले आहे.

नाडगाव रोड वर दुपारी २ वाजेच्या सुमारास मध्यप्रदेश मधील मयत राधु रजन बारेला (४४) रा. तुरक गोराळा चिडीयापाणी जि.बुन्हाणपूर (मध्यप्रदेश) व नांदगाव येथील दोन तरुण हे मध्यप्रदेश मधून येत असताना दोन्ही दुचाकी अमोरासमोर धडक झाली.

नांदगाव येथील पोलिस पाटील नितीन गोरे यांनी पोलिस स्टेशनला माहिती देऊन जखमींना ग्रामीण रुग्णालयामध्ये आणून त्यांच्या वर उपचार करून जिल्हा रुग्णालय जळगाव येथे पाठवण्यात आले. मयताच्या नातेवाईक रात्री उशिरापर्यंत पोलिस स्टेशनमध्ये येणार असून उशिरापर्यंत गुन्हा नोंद न होईल असे सुत्रांनी सांगितले.