मुंबई – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून संत सावता माळी मंडळ ऐरोली आणि समाजप्रबोधन कार्यात धडाडीने अग्रेसर असणारी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे शाखेच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 2 जानेवारी 2022 रोजी वैज्ञानिक दृष्टिकोन व जादूटोणा विरोधी कायदा प्रात्यक्षिकासह व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. हे व्याख्यान सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यत सावता भवन सेक्टर -5 ऐरोली, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे.
या ज्ञानाच्या माध्यमातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक कार्याविषयी व त्यांनी समाजाला दिलेल्या अनमोल योगदानाविषयी आणि अंधश्रद्धेमुळे वाढणाऱ्या गुन्हेगारीस चाप बसवण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन व जादूटोणा विरोधी कायदा प्रचार व प्रसार या संदर्भात सर्वसामान्य जनतेला माहिती मिळावी व त्यातून प्रबोधन व्हावे या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच बाबा, बुवा आणि इतर तथाकथित भामटे यांच्या चमत्काराच्या मागची मानसिकता कशी असते तसेच भोंदूबाबा कसे खोटे चमत्कार दाखवतात त्या चमत्काराचे प्रात्यक्षिक सह व्याख्यान व त्यामागे असलेला वैज्ञानिक दृष्टिकोनाबाबत व्याख्यान देण्यात येणार आहे. असे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रसिद्धी पत्रकातून जाहीर करण्यात आले आहे.
दरम्यान, या व्याख्यानाला प्रथम नाव नोंदणी केलेल्या 45 जणांना प्रवेश देण्यात येणार असून हा कार्यक्रम संपूर्ण निशुल्क व मोफत असणार आहे. नाव नोंदणी करण्यासाठी डॉ. प्रकाश सावंत यांच्या या 9224570085 क्रमांकाशी संपर्क करावा. असे आवाहन अभाअंनिस च्या वतीने करण्यात आले आहे.