Mpsc | राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी २ जानेवारीची राज्यसेवा पूर्व परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे. २जानेवारी रोजी राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार होती. मात्र, कोरोना काळात परीक्षा न झाल्याने वाढीव सवलत देण्यात आली आहे. या सवलतीचा लाभ मिळावा यासाठी ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे एमपीएससीने पत्रकात म्हटले आहे.

एमपीएससीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे, १ मार्च, २०२० ते १७ डिसेंबर २०२१ कालावधीत वयोमर्यादा ओलांडली त्या उमेदवारांना संधी देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पुढे होणाऱ्या परीक्षेसाठी २८ डिसेंबर २०२१ ते १ जानेवारी पर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज भरण्यासाठी १ जानेवारी रात्री ११. ५९ पर्यंत अर्ज करता येणार आहे. भारतीय स्टेट बँकेच्या चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरून…