पत्की यांचे प्रतिपादन हदयस्पर्श हितगुज – प्रबोधन मेळाव्यात आरोग्य दिनदर्शिका प्रकाशन
कोल्हापूर – गेली अनेक वर्ष दर्जेदार संगीत उपक्रमासह कार्यरत असलेल्या हदयस्पर्श संघटने सह विविध सामाजिक – सार्वजनिक संघटनांनी आरोग्य प्रबोधनाला प्राधान्य द्यावे अशी अपेक्षा ज्येष्ठ संशोधक डॉक्टर सतीश पत्की यांनी व्यक्त केली . यांच्या सह मान्यवराच्या हस्ते येथील शाहू स्मारक भवनात शायरन फिचर्स च्या ‘आरोग्य दिनदर्शिका 2022 ‘चे प्रकाशन संपन्न झाले . यावेळी सावलीचे किशोर देशपांडे व्हाईट , व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे , आरोग्य भरतीच्या अश्विनी माळकर , संकल्पचे रघुवीर सिंह राठोड , आरोग्य अधिकारी डॉ. मानसी कदम यांच्यासह विविध मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी पाहुण्याचा परिचय करून देत आरोग्य दिनदर्शिकेच्या मागील भूमिका राजेंद्र मकोटे यांनी विषद केली . कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालखंडात ‘ पेंशट साठी ऑक्सीजन पासून ते उपलब्ध असणारे बेड तसेच रुग्णवाहिका ते नेमके नेमके उपचार करणारे डॉक्टर याची वेळेत माहिती किती गरजेचे – लाखमोलाचे आहे, हे अधिकच अधोरेखित झाले . या पार्श्वभूमीवर गेली दहा वर्षे सलग प्रकाशित होत असलेल्या आरोग्य दिनदर्शिका अधिक मोलाची ठरत आहे . यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील महात्मा फुले जन आरोग्य योजनेत तसेच कर्नाटक आरोग्य श्री योजना मध्ये सहभागी हॉस्पिटल्स , तसेच ब्लड बँका – रुग्णवाहिका , सर्पमित्र , आरोग्यमित्र यापासून ते संकटकाळी उपलब्ध असणारे हक्काचे कार्यकर्ते पासून किल्ले हरवल्यास संपर्क करण्याच्या व्यक्ती या सर्वांचे संपर्क फोन नंबर तसेच विविध आरोग्य दिनाची माहिती देण्यात आलेली आहे . त्याचबरोबरीने महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा मुख्य प्रशासकीय अधिकारी भावना चौधरी , संकल्प चे डॉ. पी.एन . कदम , जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर उषादेवी कुंभार , सायबरचे प्राध्यापक – समुपदेशक राजेंद्र पारिजात , ठाण्याचे सामाजिक कार्यकर्ते सुहास जावडेकर , नॅब सल्लागार – शहीद शिक्षण प्रसारक मंडळ – टिटवे चे डॉ. प्रा . जगन्नाथ पाटील , ज्येष्ठ वकील विनय कदम , संवाद च्या वाचाश्रवण तज्ञ डॉ. रेश्मा हुजुरबाजार आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांचे कोरोना संदर्भाने सकारात्मक बदल बदल आणि नविन संधी या संदर्भाने विचार नमूद करण्यात आले आहेत . आगामी काळात पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्हानिहाय आरोग्य दिनदर्शिका प्रसिद्ध करण्याचा मनोदय असल्याचे त्यांनी नमूद केले . हृदयस्पर्श चे प्रमुख पद्माकर कापसे यांनी तब्बल 21 महिन्यानंतर हा कोरोना निर्बंधानंतर हा स्नेह मेळावा संपन्न होत आहे . यामध्ये कोरोना विरु द चा लढाई चाअनुभव असलेल्या आरोग्य क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती व मार्गदर्शन हे महत्त्वाचे आहे , आगामी काळात हृदयस्पर्श विविध उपक्रमांचे आयोजन करणार असल्याचे जाहीर केले . वैधकीय अधिकारी डॉ .मानसी कदम यांनी ‘ भारत 2025 पर्यत क्षयरोग मुक्त होण्यासाठी कोरोनाचा दोन वर्षातील अनुभव सकारात्मकतेने उपयोगी पडतील असा विश्वास व्यक्त केला . आरोग्य भारतीच्या अश्विनी माळकर यांनी ‘ आरोग्य क्षेत्रातील सर्व घटकांचा समन्वय हा गरजेचे असल्याचे दोन वर्षातील अनुभव आणि पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे , त्यासाठी शायरन फीचर्स ची ही आरोग्य दिनदर्शिका महत्वाची समन्वयकाची भूमिका निभावत आहे अशा शब्दात आपल्या शुभेच्छा दिल्या. तर शंभर टक्के लसीकरणासाठी आणि आगामी काळातील बूस्टर डोस साठी ही व सामाजिक क्षेत्रातील संघटनांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा यावेळी जिल्हा लसीकरण अधिकारी फारुक देसाई यांनी व्यक्त केली . कोरोनाच्या प्रतिकूल अनुभवा आधारे येणाऱ्या संकटावर आपण संघटीतपणे प्रभावीपणे मात करु शकतो , हा समाजात र्निमाण झालेला दृढ विश्वास हा मोलाचा असून त्यात समुपदेशनाचे आणि प्रबोधनाची जोड देऊन अधिक सक्षमतेने आगामी काळात कार्यरत राहणे गरजेचे आहे असे मत सावलीचे किशोर देशपांडे यांनी व्यक्त केले यावेळी व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे यांनी कोरोना काळात कोविड सेंटर पासून अन्नदान पर्यत विविध मदत कार्यात कोल्हापूरकरांच्या सहभागाचा अभिमान असल्याचे नमूद केले . संकल्प चे रघुनाथ सिंह राठोड तसेच अंध संघटक शरद पाटील यांनी ही आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा मकोटे यांनी करत यांनी करत शेवटी आभार मानताना आरोग्य दिनदर्शिका शहरात गुजरीतील नातू पेपर स्टॉलसह अंध विक्रेत्याकडे स्वागत मुल्यात उपलब्ध असल्याचे नमूद केले . या हदयस्पर्शी आरोग्य हितगुज व शायरन च्या आरोग्य दिनदर्शिका प्रकाशन अशा संयुक्त सोहळ्यास ग्राहक पंचायतीचे अशोक पोतनीस , नेशन फर्स्ट फॅशन फडची अवधूत भाटे , समाजसेविका कलावती पाटील , प्रियदर्शिनी चोरगे’ उषा भिलवडीकर , डायमंड हॉस्पिटल चारुदत्त रणदिवे , डीटीसी चे एकनाथ पाटील , दिलीप काटे , तुषार भिवटे , श्रम फाऊंडेशनचे कमलाकर सारंग सह आरोग्य – कला – सामाजिक क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते .