रत्नागिरी : दरवर्षी १ जानेवारी हा दिवस ‘शौर्य दिवस’ म्हणून साजरा करण्यात येत असतो. यंदाच्या विजयस्तंभ शौर्य दिनाचे हे २०४ वे वर्ष आहे. या शौर्यदिनामित्त छत्रपती संभाजी महाराजांना हि ठिकठिकाणी अभिवादन केले जाते. रत्नागिरी काँग्रेस अनुसूचित जाती जमाती विभागाच्यावतीने संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील छत्रपती संभाजीराजे यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी अनुसूचित जाती जमातीचे जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, रोहित तांबे , सेरवर जाधव, विनोद कांबळे, उमेश जाधव , शैलेश जाधव , धर्मा कांबळे, किशोर कांबळे, संगम पवार ,विजय मोहिते, निलेश जाधव आदी उपस्थित होते.