आमदार योगेश कदम यांनी खेड तालुका पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष किशोर साळवी यांचे केले अभिनंदन

रत्नागिरी/ जिल्हा प्रतिनिधी

खेड : खेडमधील ज्येष्ठ व अभ्यासू पत्रकार श्री. किशोर साळवी यांची खेड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाली. सदर निवडीबाबत आमदार श्री. योगेश कदम यांनी श्री. किशोर साळवी यांचे अभिनंदन केले आहे.

लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारीतेच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाची समस्या प्रखरपणे सर्वांसमोर आणून त्यांना न्याय मिळवून द्याल. तुमची लेखणी आपल्या हक्काची बोली वाटेल असे वृत्त कार्य घडेल अशी शुभेच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

माजी जिल्हाप्रमुख श्री. शशिकांत चव्हाण, नगरसेवक श्री. अंकुश विचारे, माजी उपनगराध्यक्ष श्री. कुंदन सातपुते, विभागप्रमुख श्री. अभिजीत चिखले, माजी नगरसेवक श्री. सतिश चिकणे, युवा सेना आय टी सेल तालुका अधिकारी श्री. दर्शन महाजन, श्री. सुनिल शिंदे, श्री. तुषार साप्टे, श्री. धनंजय नायर, श्री. प्रणव शिरगावकर, श्री. मानस उपावले, श्री. यश खेडेकर यावेळी उपस्थित होते.

.