महविकास आघाडीची रणनीती यशस्वी; प्रवीण दरेकरांच्या हातातून मुंबई बँकेची सत्ता खेचून घेतली

मुंबई : भाजप नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचे वर्चस्व असलेल्या मुंबई बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीला आज अचानक रंगतदार वळण आले. भाजपा आणि प्रवीण दरेकर यांच्याविरोधात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन त्यांची युती निवडणूक रिंगणात उतरली. यासाठी अर्थमंत्री अजित पवार आणि पर्यटन
मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार रणनीती आखली जाऊन सह्याद्री अतिथिगृहात एक बैठक झाली. मुंबई बँकेवर अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सिद्धार्थ कांबळे ११-९ मताने विजयी झाले.

शिवसेनेचे उपाध्यक्षपदाचे उमेदवार अभिषेक घोसाळकर यांना १०-१० अशी समसमान मते मिळाली. त्यांनंतर
चिठ्ठी द्वारे विठ्ठल भोसले यांचा विजय झाला. एक वर्ष अध्यक्षपद राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे राहणार असून नंतर ते शिवसेनेकडे राहणार आहे.

मुंबई बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीची खेळी लक्षात येताच भाजपाकडून अध्यक्षपदाचा उमेदवार अचानक
बदल्यात आला. आमदार प्रवीण दरेकर यांच्या एवजी प्रसाद लाड यांनी अध्यक्ष पदाची निवडणूक लढवली. त्यात त्यांचा पराभव झाला. या निवडणुकीच्या
पाश्वभूमीवर मुंबई बँकेच्या मुख्यालाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तत्पूर्वी सह्याद्री अतिथीगृहावर उपमुख्यमंत्री अजित पवार
आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मुंबई बँकेतील प्रतिनिधींची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, सुरज चव्हाण उपस्थित होते.
त्यांनी पडद्यामागून सूत्रे हलवली. या बैठकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यानुसार मुंबई बँकेवर
अध्यक्षपदी सिद्धार्थ कांबळे तर उपाध्यक्षपदी अभिषेक घोसाळकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. मुंबई बँकेची अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची
गुप्त मतदानाने निवडणूक झाली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यामुळे युतीच्या ११ संचालक सदस्य झाली आहे. तर भाजपकडे आता ९ संचालक
आहेत. मुंबई बँक अध्यक्ष निवडणुकीत दरेकर यांना मोठा धक्का बसला असून त्यांना बँकेच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले.

मुंबई बँकेवर भाजपचे प्रवीण दरेकर,प्रसाद लाड, विठ्ठल भोसले, आनंद गाड,कविता देशमुख विनोद बोरसे,सरोद पटेल, नितीन बनकर, अनिल गजरे संचालक आहेत तर
राष्ट्रवादी काँग्रेसचे संचालक संदीप घनदाट, शिवाजीराव
नलावडे,पुरुषोत्तम दळवी, विष्णू गंमरे, सिद्धार्थ कांबळे,जयश्री पांचाळ, नंदू काटकर, जिजाबा पखर आहेत. शिवसेनेचे सुनील राऊत, अभिषेक घोसाळकर, शिल्पा सरपोतदार संचालक आहेत.

शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले की, महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणूक लढवली आणि अध्यक्षपद जिंकले. या वर्षी
सिद्धार्थ कांबळे हे अध्यक्षझाले पुढील वर्षी शिवसेनेचा अध्यक्ष असेल. उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांना समसमान प्रत्येकी १० मते
मिळाली आणि ईश्वर चिठी द्वारे भाजपचे विठ्ठल भोसले यांच्या बाजूने निकाल लागला आणि ते उपाध्यक्ष झाले. आता उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काय गडबड
झाली ते आमचे नेते बघतील आणि निर्णय घेतील असे सुनील राऊत यांनी सांगितले.

सिद्धार्थ कांबळे म्पहणाले की, पक्षाने सोपवलेल्या जबाबदारी नुसार या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मी उभा राहिलो आणि निवडून आलो . आणि मुंबई
बँकेची सूत्रे माझ्या हाती आली . उपाध्याक्ष्पदाच्या निवडणुकीत आमच्या पैकी कुणाचे मत फुटले हे सांगायला मी काही जादुगार नाही मात्र आम्ही सगळे
काहीसे आश्चर्यचकित आहोत. अर्थात ते नंतर कळेलच आणि त्याबाबत काय करायचे ते आमचे नेते ठरवतील मात्र मुंबई बँकेवर जो डाग आहे तो धुवून काढण्याचा
मी आणि माझे सहकारी नक्कीच प्रयत्न करतील . प्रवीण दरकार आणि माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत.दरेकर साहेबांनी हि बँक साडेचार हजार कोटीवरून सात हजार कोटींवर नेली मी ती १५ हजार कोटींवर नेणार आहे. मला स्वताला बँकिंग क्षेत्राचा अनुभव आहे. मुंबई बँकेचे संचालक म्हणून आम्ही सगळे
एकत्रच आहोत फक्त पक्षाची लेबल वेगवेगळी आहेत . आता मी या संचालक मंडळाचा कॅप्टन म्हणून मुंबई बँकेची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करीन असा
विश्वास नवनिर्वाचित अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांनी व्यक्त केला आहे. तर विनोद घोसाळकर म्हणाले की, पक्ष नेतृत्वाने दिलेल्या आदेशानुसार अभिषेक
याने या मुंबई बँकेत चांगले काम करण्याचा प्रयत्न केला आताही तो संचालक म्हणून कार्यरत राहणार आहे त्याने मुंबई बँकेत झालेल्या चुकीच्या कामाविरुद्ध नेहमी आवाज उठवला. उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत दोन्ही
उमेदवारांना समसमान मते पडली त्यामुळे ईश्वर चीत्तीने उपाध्यक्ष निवडण्यात आला. सहकार क्षेत्रात सर्वांनी मिळून काम करायचे असते यावेळीही
चांगले काम करून बँकेची प्रतिमा अधिक चांगली केली जाईल असे विनोद घोसाळकर यांनी सांगितले.