पाय पसरतोय ओमिक्रॉन सावध राहण्याची गरज !प्रा डॉ सुधीर अग्रवाल

पाय पसरतोय ओमिक्रॉन
सावध राहण्याची गरज !

प्रा डॉ सुधीर अग्रवाल

देशभरात करोना संसर्गाचे प्रमाण अतिशय झपाट्याने वाढताना दिसत आहे. दैनंदिन रूग्ण संख्येत मोठी वाढ दिसून येत आहे. शिवाय, करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर सुरू आहे. एकीकडे करोनाचे संकट असताना दुसरीकडे ओमायक्रॉन बाधितही आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय तसेच सर्वच राज्यांच्या आरोग्य यंत्रणांना व लोकांना सतर्क राहण्याची व कोरोना नियमांची सक्तीने पालन करण्याची गरज आहे.करोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी कडक निर्बंधांची अमलबजावणी करण्याची गरज आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी देशभरात २४ तासांमध्ये आढळलेल्या नवीन करोनाबाधितांची संख्या ही अडीच लाखांपेक्षाही जास्त दिसून आली.

आज आढळलेली कोरनाबाधितांची संख्या ही कालच्या रूग्ण संख्येपक्षा २ हजार ३६९ रूग्णांनी जास्त असल्याचे दिसत आहे. याशिवाय, मागील २४ तासात ३१४ करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूची देखील नोंद झालेली आहे. १ लाख ३८ हजार ३३१ रूग्ण करोनामुक्त देखील झाले आहेत.

देशातील अॅक्टिव्ह केसेसची संख्या १५ लाख ५० हजार ३७७ आहे. तर, दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट हा १६.२८ टक्के आहे. तसेच, ७ हजार ७४३ ओमायक्रॉनबाधितांची देखील नोंद झालेली आहे.

जगभरात कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटची दहशत पाहायला मिळतेय, मात्र गेल्या काही दिवसांपासून जगातील सहा देशांमध्ये ओमिक्रॉन संसर्गाचा वेग कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र भारतात अद्याप अशी परिस्थिती निर्माण झालेली नाही. रुग्णसंख्या कमी होत असलेल्या देशांमध्ये यूके, कॅनडा, इटली, आयर्लंड, डेन्मार्क आणि आइसलँड या देशांचा समावेश आहे. या देशांमध्ये कोरोना संसर्गाचा आलेख आता खाली घसरत आहे.

मात्रा भारतातून रुग्णसंख्या अजून कमी होत नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. एका महिन्यापूर्वी इतर देशांमध्ये ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळू लागले होते. अशा परिस्थितीत भारतात येत्या काही आठवड्यांतचं कोरोनाची तिसऱ्या लाट येणार की नाही हे स्पष्ट होईल.

आकडेवारीनुसार, देशात सध्या कोरोनाची तिसरी लाट सुरू आहे, ज्यामध्ये दैनंदिन संसर्गाचा दर १६ टक्क्यांच्या पुढे गेला आहे आणि आठवड्याचा संसर्गही १३ टक्क्यांवर पोहचला आहे. गेल्या तीन दिवसांपासून देशात दररोज दोन लाखांहून अधिक रुग्ण समोर येत आहेत. त्याचवेळी, ७ ते १५ जानेवारी दरम्यान देशात १७.५० लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

पाच टक्के रुग्ण रुग्णालयात भरती
यावर तज्ज्ञ रिजो म्हणाले की, भारतातील पाच टक्क्यांहून कमी रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येत आहे. मात्र, येत्या काही दिवसांत हा दर पाच टक्क्यांवरून दहा टक्क्यांवर पोहचण्याची भीतीही व्यक्त केली जातेय.

ओमिक्रॉनमुळे संसर्गाची नवीन लाट मागील लाटेपेक्षा अधिक प्रभावी दिसून आली आहे. अशा परिस्थितीत भारतातील कोरोना दुसऱ्या लाटेशी तुलना केल्यास कोरोनाचा प्रसार अधिक होण्याची शक्यता आहे. आरोग्य मंत्रालयाच्या अधिका-याने सांगितले की, जेव्हा ब्रिटनमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळला तेव्हा तेथे सुमारे सहा टक्के रुग्ण रुग्णालयात दाखल केले जात होते.

सक्रिय रुग्णांची संख्या अनेक पटींनी वाढली
आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार, १२ जानेवारीपर्यंत अनेक राज्यांमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत सक्रिय रुग्णांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे. उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाची सक्रिय प्रकरणे १४ पटीने वाढली म्हणजे रुग्णसंख्या ३१७३ वरून ४४,४६६ पर्यंत पोहचली आहे. तर पंजाबमध्ये ८.६५, मध्य प्रदेशात १०.९५ आणि बिहारमध्ये ११.२७ टक्के रुग्ण वाढ झाली आहे.

जगभरातील करोना रुग्णसंख्येच्या आकड्यात या आठवड्यात प्रचंड वाढ झाल्याचं दिसून येतंय. चिंताजनक म्हणजे, रुग्णसंख्या वाढीसोबतच मृत्यूंच्या संख्येतही जवळपास १२ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आलीय.

‘एएफपी’च्या माहितीनुसार, या आठवड्यात दैनंदिन करोना रुग्णांची संख्या गेल्या आठवड्याच्या तुलनेत ४४ टक्क्यांनी वाढलीय. ही रुग्णसंख्या विक्रमी २.७८ दशलक्षांपर्यंत पोहोचली आहे. या भयंकर परिस्थितीसाठी आणि आकडेवारीसाठी ‘ओमिक्रॉन’ व्हेरियंट जबाबदार असल्याचं समोर येतंय.
यात, आशियामध्ये २१० टक्के, मध्य पूर्वमध्ये १४२ टक्के, लॅटिन अमेरिका-कॅरिबियन प्रदेशात १२६ टक्के आणि ओशिनियामध्ये ५९ टक्कं रुग्णांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
अमेरिका आणि कॅनडामध्ये करोना रुग्णसंख्येत ३१ टक्क्यांनी वाढ झाल्याचं दिसून येतंय. फिलिपिन्समध्येही रुग्णसंख्येत सर्वाधिक ३२७ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आलीय. यानंतर भारतात ३२१ टक्के, कोसोवोमध्ये ३१२ टक्के, ब्राझीलमध्ये २९० टक्के आणि पेरूमध्ये २८४ टक्के वाढ झाली आहे.

आफ्रिकन देशांत रुग्णसंख्या घसरतेय
उल्लेखनीय म्हणजे, याच दरम्यान दक्षिण आफ्रिका हा एकमेव देश आहे जिथे रुग्णसंख्येत घट झाल्याचं आणि परिस्थितीत सुधारणा होत असल्याचं दिसून येतंय. इथे रुग्णसंख्येत ११ टक्के घट झाल्याचं समोर येतंय.
आफ्रिकन देशांमध्ये झपाट्यानं घटणाऱ्या रुग्णसंख्येवर नजर टाकली तर ‘इस्वातिनी’त सलग दुसऱ्या आठवड्यात रुग्णसंख्येत सर्वात मोठी घट नोंदवण्यात आलीय. ही घट ४५ टक्के आहे. ३० टक्क्यांच्या घसरणीसह झांबिया दुसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेत २७ टक्के, नामिबियामध्ये २६ टक्के आणि यूकेमध्ये २५ टक्क्यांची घट झालीय. चार दक्षिण आफ्रिकन देशांना डिसेंबरच्या सुरुवातीला ओमिक्रॉन व्हेरियंटनं चांगलाच फटका दिला होता, तर यूके आणि युरोप गंभीरपणे प्रभावित झालेल्या देशांमध्ये होते.

९५६१५९४३०६