इचलकरंजी /प्रतिनिधी –
दिव्यांग उन्नती अभियान अंतर्गत आणि जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून मंजूर इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील दिव्यांग लाभार्थ्यांना गुरुवारी आवश्यक साहित्य प्रदान करण्यात आले.
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या दिव्यांग उन्नती अभियान अंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना आवश्यक ते साहित्य दिले जाते. त्या अंतर्गत इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील 300 लाभार्थ्यांना साहित्य मंजूर झाले आहे. याकामी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या साहित्याचे वाटप गुरुवारी करण्यात आली. 300 पैकी पहिल्या टप्प्यात 80 लाभार्थ्यांचे साहित्य प्राप्त झाले आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासन नियमांचे पालन करत प्रातिनिधीक स्वरुपात लता केसरकर, अल्लाद्दीन जमादार, मल्लाप्पा मैंदर्गी, रेखा पोवार, संजय गवळी व कविता कोळी या लाभार्थ्यांना डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते साहित्य प्रदान करण्यात आले. उर्वरीत लाभार्थ्यांना दररोज पाच याप्रमाणे साहित्याचे वाटप केले जाणार असून संबंधित लाभार्थ्यांनी जुनी नगरपालिका इमारत याठिकाणी संपर्क साधावा.
उर्वरित दिव्यांगाना आवश्यक ते साहित्य लवकरात लवकर मिळण्यासाठी पाठपुरावा करु, अशी ग्वाही यावेळी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांनी यावेळी दिली.
Posted inकोल्हापूर