मलकापूर , प्रतिनिधी – उमेश ईटनारे
हनुमान चौक ते कृषी उत्पन्न बाजार समिती (बेलाड यार्ड) पर्यंतचा रस्ता डांबरीकरण करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना शहर उपप्रमुख उमेश हिरूळकर यांच्यासह अनेकांनी निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी मलकापूर यांच्याकडे आज १९ जानेवारी रोजी केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहराचा मध्यभाग असलेल्या हनुमान चौक येथून कृषी उत्पन्न बाजार समिती (बेलाड यार्ड) येथे जाण्याकरीता कमी अंतराचा रस्ता आहे. मात्र सदरचा रस्ता हा अतिशय खराब असल्याने तो वाहतुकीस योग्य नसल्याने कृउबास (बेलाड यार्ड) येथे शेतकरी, व्यापारी, नागरिक यासह आदींना जाण्यासाठी महामार्ग क्र.६ ने आजरोजी ये-जा करावी लागते. महामार्ग क्र.६ चे आजरोजी काम सुरू असून या महामार्गावर रहदारीही मोठ्या प्रमाणात राहत असल्याने अनेकदा वाहतुकीचा खोळंबा होण्या बरोबरच अपघातही घडतात. त्यामुळे कृउबासमध्ये जाणाNयांच्या मनामध्ये भीतीयुक्त परिस्थिती नेहमीच असते.
हनुमान चौक येथून जाणारा सरळ रस्ता हा कृउबास बेलाड यार्ड पर्यंत पोहचतो. त्यातच या मार्गावर जागृत खापरखेडा हनुमान मंदिर सुध्दा आहे. त्यामुळे भाविकांचे सुध्दा याठिकाणी दर्शनाकरीता मोठ्या प्रमाणावर जाणे-येणे असते. तसेच याठिकाणी भंडारे व विविध धार्मिक कार्यक्रम सुध्दा नेहमी होत असल्याने भाविक नेहमीच जातात. त्यांना कृउबास अथवा मंदिरावर जावयाचे असल्याने महामार्ग क्र.६ ने जीव मुठीत घेवून जावे लागते.
तेव्हा शहरातून हनुमान चौक मार्गे जाणारा कमी अंतराचा रस्ता जो हनुमान टॉकीज ते अमित कॉटसीनच्या मागील बाजू पर्यंत झालेला आहे. मात्र झालेला रस्ता काही ठिकाणी खराब व खड्डेमय झालेला आहे तेव्हा त्या रस्त्याची डागडुजी करून दुरूस्ती करणे बरोबरच सदरचा रस्ता त्या ठिकाणापासून पुढे कृउबास (बेलाड यार्ड) पर्यंत नवीन डांबरीकरण केल्यास शेतकरी, व्यापारी, नागरिक व खापरखेडा येथे हनुमान मंदिरावर दर्शनासाठी जाणाNया भाविकांना याचा फायदाच होईल. तेव्हा सदरचा रस्ता हा तातडीने करण्यात यावा, अशी मागणी निवदेनाद्वारे करण्यात आली.
निवेदनावर शिवसेना शहर उपप्रमुख उमेश हिरूळकर यांचेसह पुरूषोत्तम क्षिरसागर, भिमराव फरफट, निवृत्ती संबारे, विष्णू पाटील, सिताराम अंभोरे, हरीभाऊ देवकर, जनार्दन हिंगणकर, अनिल बोंबटकार, हनुमान आगळे, राजेंद्र खराडे, रामकृष्ण साठे, श्रीकृष्ण धोरण, निवृत्ती संबारे, शेषराव पाटील, दिलीपकुमार पटेल, प्रदीप संबारे, केलास संबारे, विजय काळे, राजेश फुलोरकर, वैभव कवळे, भानुदास फुलोरकर, राजू जावरे, आदित्य खराडे यांचेसह अनेकांच्या स्वाक्षऱ्याआहेत.