प्रस्तावित हातकणंगले इचलकरंजी रेल्वे मार्ग होऊ देणार नाही ; रेल्वे विरोधी कृती समितीचा इशारा

कबनूर प्रतिनिधी /चंदुलाल फकीर

प्रस्तावित हातकणंगले इचलकरंजी रेल्वे मार्गावरील शेतकरी,रहिवाशी, नागरिकांना  देशोधडीला लावून इचलकरंजी मधील मूठभर लोकांच्या हट्टापायी रेल्वे आणण्यात येत आहे इचलकरंजी मध्ये रेल्वे यावी व इचलकरंजीचे नाव रेल्वेच्या नकाशावर यावे यासाठी नवीन हातकणंगले इचलकरंजी रेल्वेमार्ग करून या मार्गावर शेतकरी रहिवासी नागरिक यांना देशोधडीला लावून इचलकरंजी मधील मूठभर लोकांच्या हट्टापायी रेल्वे आणण्यात आहे त्यास आमचा पूर्ण विरोध आहे असे प्रतिपादन इचलकरंजी रेल्वे विरोधी कृती समितीचे पदाधिकारी यांनी केले प्रसंगी रक्ताचे पाट वाहतील पण हा अन्यायी रेल्वेमार्ग होऊ देणार नाही असा इशारा हातकणंगले कोरोची, कबनूर, इचलकरंजी,चंदुर येथील शेतकरी, रहिवासी आणि नागरिकांनी शासन व रेल्वे प्रशासनास दिला आहे रेल्वे विरोधी कृती समितीचे जयकुमार कोले म्हणाले हातकणंगले रेल्वे स्टेशन हे इचलकरंजी हद्दीपासून केवळ पाच किलोमीटर अंतरावर आहे इचलकरंजीला वस्त्रनगरी संबोधले जाते पण आजतागायत इचलकंजी येथून एकही कापडाची गाठ अथवा कापड रेल्वेने वाहतूक झालेले नाही अथवा इचलकरंजीत आलेले नाही मात्र इचलकरंजी मधील काही लोकांच्या हट्टापायी हा रेल्वेचा घाट घातला आहे तो अन्याय आहे या रेल्वे मार्गात अनेक शेतकऱ्यांची बागायत व जिरायत शेती जाणार आहे आणि उद्योगधंदे ,पाण्याच्या योजना जाऊन त्यांचे संसार उध्वस्त होणार आहेत तसेच भविष्यात नियोजित कराड हातकणंगले इचलकरंजी ते निपाणी बेळगाव असा रेल्वेमार्ग करण्यासाठी जर हा मार्ग होणार असेल तर मोठा धोका होणार आहे कारण नदी पार करण्यासाठी मोठा भराव करावा लागणार असल्याने पाण्याचा दाब वाढून रुई,इंगळी,चंदुर, पट्टणकोडोली व इचलकरंजी मधील काही भागात पाणी जाणार आहे त्यामुळे या गावातील अनेक कुटुंबियांना गाव सोडावे लागणार आहे  जयकुमार कोले म्हणाले खरोखरच इचलकरंजीला रेल्वे हवी असेल तर अनेकांचे संसार उद्ध्वस्त करण्या एवजी तारदाळ गावाच्या उत्तरेस रेल्वेमार्ग नजीक रेल्वे भव्य जंक्शन करता येईल शिवाय इचलकरंजी मधील  शहापुर गावाची हद्द ही रेल्वे रुळापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे इचलकरंजीकराना तेथून रेल्वे आणणे सोयीचे होईल रेल्वे प्रशासन शासन व आजी-माजी लोकप्रतिनिधीनी याचा विचार करून प्रस्तावीत हातकणंगले इचलकंरजी हा आठ किलोमीटरचा अन्यायी रेल्वे मार्ग रद्द करावा यावेळी पंचगंगा सहकारी साखर कारखाना चेअरमन पी एम पाटील, शरद कारखाना संचालक डी बी पिष्टे, गुंडा इरकर हातकणंगले,बी डी पाटील कबनूर, नागेश पुजारी चंदुर,चंद्रकांत मगदूम इचलकरंजी, दादासो पाटील जायगोंडा, प्रकाश पाटील मुरगोंडा, यांच्यासह शेतकरी, नागरीक उपस्थित होते.