डीमॅट आणि ट्रेडिंग खाती असणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. येत्या ३१ मार्चपर्यंत KYC पूर्ण करण्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये ६ डिटेल्स तुम्हाला द्यावे लागणार आहेत. ही माहिती अपडेट न केल्यास तुमचे डीमॅट खाते इनऍक्टिव्ह केले जाईल. त्यानंतर ही माहिती अपडेट केल्यानंतरच ती पुन्हा ऍक्टिव्ह होईल.
शेअर बाजाराचे काम पारदर्शक व्हावे आणि शेअर होल्डिंगची संपूर्ण माहिती मिळावी यासाठी KYC वर भर देण्यात येत आहे. KYC सह, सेबीकडे शेअर खरेदी आणि विक्रीचे संपूर्ण खाते असेल. यामुळे करचुकवेगिरीलाही आळा बसेल.
KYC प्रक्रिया कशी पूर्ण करावी ?
NSDL नुसार नाव, पत्ता, पॅन डिटेल्स , मोबाईल नंबर, ई-मेल आयडी आणि वार्षिक उत्पन्न यांचा समावेश आहे. डिमॅट खातेधारकाने उत्पन्न, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी अपडेट न केल्यास त्याचे खाते इनऍक्टिव्ह केले जाईल.
खाते इनॅक्टिव झाल्यास काय होईल?
खाते इनऍक्टिव्ह केल्यावर, सध्याचे शेअर्स किंवा पोर्टफोलिओ खात्यातच राहतील. मात्र, तुम्ही कोणत्याही नवीन प्रकारची खरेदी आणि विक्री करू शकणार नाही. KYC डिटेल्स अपडेट केल्यावरच हे खाते पुन्हा ऍक्टिव्ह केले जाईल. सीडीएसएल आणि एनडीएसएल ने यापूर्वीच यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे.