संगमेश्वर | फणसवणे दशक्रोशी ग्रामस्थांचे रस्त्यासाठी प्रजासत्ताकदिनी बेमुदत आमरण उपोषण

⭕ ग्रामस्थांनी यापूर्वी हि केले होते उपोषण

⭕ उपोषणकर्त्या ग्रामस्थांना स्थानिक आमदार भेट देणार का?

रत्नागिरी/ जिल्हा प्रतिनिधी

संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री पूल ते नायरी रस्ता खड्ड्याचे साम्राज्य पसरले असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हे समजत नाही. गेली अनेक वर्षे या रस्त्याची फार दुरावस्था झाली आहे. प्रत्येक वेळी आश्वासनाव्यतिरिक्त ग्रामस्थांच्या मागण्यांना केराची टोपली दाखवली जात असल्याने नायरी परिसरातील दहा गावातील ग्रामस्थांनी 26 जानेवारी फणसवणे नाक्यात पक्ष विरहित आमरण उपोषण सुरु आहे. जो पर्यत रस्त्याच्या कामाला सुरुवात होत व वर्क ऑर्डर मिळत नाही तोपर्यत उपोषण सुरूच राहणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी ठाम भूमिका घेतली आहे.

या रस्त्याला स्थानिक आमदार शेखर निकम यांनी रस्त्यासाठी भरगोस निधी आणला असला तरी मात्र निविदा प्रक्रिया अद्याप अपूर्ण असल्याचा ग्रामस्थांनी आरोप केला आहे. जर निविदा निघाल्या तर 27 तारखेला जावेद खान यांच्याशी वाटाघाटी कोणत्या करणार आहे? असा संतप्त सवाल उपोषणकर्त्या ग्रामस्थांनी केला आहे.

● ‘या’ रस्त्यासाठी ग्रामस्थांनी यापूर्वी हि केले होते उपोषण

नायरी, तिवरे, निवळी, नेदरवाडी मार्ग हा सुमारे अठरा ते वीस किलोमीटरचा असून या मार्गाची फारच दयनीय अवस्था झाली आहे. या मार्गावर छोटे मोठे अपघात होत असतात. रस्त्यांमुळे त्रस्त नागरिकांनी संबंधित विभागाकडे अनेक अर्ज विनंत्या करून देखील दखल घेतली गेली नाही. या मार्गासाठी पावसाळ्या पूर्वी स्थानिक ग्रामस्थांनी पक्ष विरहित उपोषण केले होते. त्यावेळी संबंधित विभागाने एका महिन्यात कामाला सुरुवात करू, असे लेखी आश्वासन दिले होते. मात्र लेखी अश्वासनाला बळी पडून ग्रामस्थांनी उपोषण स्थगित केले होते.

● उपोषणकर्त्या ग्रामस्थांना स्थानिक आमदार भेट देणार का?

रस्त्यांमुळे त्रस्त ग्रामस्थांनी आमरण उपोषणाला 26 जानेवारी पासून सुरवात केली आहे. आतापर्यत नायरी दशक्रोशी भागातील 435 लोकांनी प्रत्यक्ष उपोषण ठिकाणी भेट देऊन पाठींबा दिला आहे. तसेच वेगवेगळ्या संघनटनाच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणकर्ते संदेश कुळेकर, अमित पवार, सत्यवान विचारे, संतोष गुरव, संतोष सावंत, यांना भेट दिली.

दरम्यान इतर कोणताही लोकप्रतिनिधी फिरकला नसल्याने नायरी दशक्रोशी ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. स्थानिक आमदार शेखर निकम यांनी उपोषण स्थळी भेट देणे अपेक्षित होते मात्र आमदारांना ग्रामस्थांचा विसर पडल्याचे दिसून आले आहे. याबरोबर आमदारांनी या रस्त्यासंबंधीत टेंडर निघाल्याचे सांगितले दुसऱ्या बाजूने संबंधित ठेकेदारांशी बोलणी चालू असल्याचे पत्रात नमूद केल्याने या पत्रात गोम असल्याचे म्हटले जात आहे. लोकांच्या मनातील आमदार , विश्वासू आमदार अशी ओळख असणारे आमदार शेखर निकम यांनी तरी ग्रामस्थांची दिशाभूल करायला नको होती, असे हि म्हटले जात आहे. आमदार शेखर निकम यांच्या विषयी असलेला विश्वास कार्यकर्त्यांना डगमगलेला दिसून आला आहे. विश्वासाने आमदारांना दशक्रोक्षितील भागातून वाढता पाठींबा मिळत होता त्याच जनतेचे आमदार शेखर निकम यांना विसर पडला आहे. हे दुर्भाग्यच म्हणावे लागेल. त्यामुळे आता तरी आमदार निकम उपोषणकर्त्यांना भेट देणार कि नाही? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.