चिपळूण : चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था ठेवी ७५० कोटी पेक्षा जास्त या विभागात राज्यात प्रथम क्रमांकाची ठरल्याने लोणावळा येथे आयोजित बँको पतसंस्था सहकार परिषद २०२२ व बँको पतसंस्था ब्ल्यू रिबन २०२१ या कार्यक्रमात चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेला राज्यस्तरीय बॅको ब्ल्यू रिबन २०२१ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्यावेळी बँकांचे मुख्य संपादक अविनाश शिंत्रे – गुंडाळे, अशोक नाईक उपस्थित होते. चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था ७५० कोटीपेक्षा जास्त ठेवींच्या श्रेणीत राज्यात प्रथम क्रमांकाची ठरल्याबद्दल अविज पब्लीकेशन कोल्हापूर व गॅलेक्सी इनमा पुणे यांच्या संयुक्त विद्यामाने हा पुरस्कार देण्यात आला. अविज पब्लीकेशन कोल्हापूर ही संस्था सहकार क्षेत्रातील देशपातळीवर एक मार्गदर्शक संस्था म्हणून कामकाज करीत आहे. या संस्थेमार्फत प्रतिवर्षी सहकार क्षेत्रात देशपातळीवर कार्यरत असणाऱ्या व उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या विविध प्रकारच्या बँकीग कामकाज करणाऱ्या संस्थासाठी पुरस्कार जाहिर केले जातात. चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थने अल्पावधीतच कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात आपले सर्वोत्कृष्ट अस्तित्व सिध्द केले आहे. या संस्थेने ठेवींबरोबरच कर्जदारांसाठी विविध कर्ज योजना राबवुन शेतकरी व सुशिक्षीत बेरोजगार तरुणांना स्वावलंबी करण्यात हातभार लावला आहे यामुळे हि संस्था अल्पावधीतच नावारुपाला आली आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्यासह संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.स्वप्ना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत सुरु आहे. या संस्थेने सर्व आघाड्यांवर यश संपादन करीत ठेवींचा ८७५ कोटींचा टप्पा पार करुन आता १००० कोटी ठेवींचा टप्पा पुर्ण करण्याचा नुकताच संकल्प चेअरमन श्री . सुभाषराव चव्हाण यांनी सोडला आहे. त्याची दखल अविज पब्लीकेशन, कोल्हापुर व गॅलेक्सी इनमा, पुणे यांनी घेतली असून या संस्थेने ७५० कोटीच्या श्रेणीत राज्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल राज्यस्तरीय बँको ब्ल्यू रिबन २०२१ हा नुरस्कार जाहीर केला. या पुरस्काराबद्दल चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी या दोन्ही संस्थाचे आभार मानले. सभासद ठेवीदार यांचा विश्वास, प्रशासकीय योग्य नियोजन कर्मचा-यांचे परिश्रम समन्वयकांची अखंड साथ यामुळेच संस्थेला हा पुरस्कार मिळाला असून संस्थेची जबाबदारी आणखी वाढली असल्याचे सांगितले. संस्थेच्या स्थापने पासुनच संस्थेने सामाजिक बांधिलकीस प्राधान्य दिले आहे. सामाजिक बांधीलकी हा संस्थेचा पाया आहे याचे भान ठेवून संस्था अनेक सेवा भावी संस्था व सामाजिक उपक्रमानां त्यांच्या विधायक उपक्रमात आर्थिक सहाय्य करीत असते. प्रामुख्याने नैसर्गिक आपत्ती, वैदयकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रिडा या उपक्रमानां सढळ हस्ते मदत करीत असते. कोरोनाच्या लढाईसाठी (कोविड- १९) साठी रु.१.०० कोटी भरघोस मदत” मुख्यमंत्री सहाय्यता निधीला केली आहे. तसेच कर्मचारी वर्गाकडून आपल्या पगारातून दोन दिवसांचा पगार रक्कम “रत्नागिरी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला” रु.४.०० लाख मदत केली. चिपळूणमध्ये आलेल्या महापुरामध्ये पुरग्रस्त व्यावसायीक खातेदारांना कमी व्याजदराने कर्जपुरवठा केलेला आहे. तसेच पुरग्रस्त ५५०० खातेदारांना कौटुंबिक साहित्य किट वाटप करणेत आले आहे. त्यामुळेच संपुर्ण महाराष्ट्रात
आपले वेगळे स्थान निर्माण करण्यास संस्था यशस्वी झाली आहे. चिपळूण नागरी पतसंस्थेच्या महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्रातील रत्नागिरी, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापुर जिल्हातील ५० शाखांच्या संलग्न कार्यक्षेत्रात संस्थेचे एकुण १,३०,५८५ सभासद आहेत. संस्थेचे फेब्रुवारी २०२२ अखेर ५७ कोटी ९१ लाख भागभांडवल आहे, संस्थेचे एकूण स्वनिधी ११२ कोटी ९४ लाख आहेत. संस्थेच्या एकूण ठेवी ८७४ कोटी ९५ लाख संस्थेच्या एकूण कर्जव्यवहार ७३० कोटी ६३ लाख पैकी प्लेज कर्ज ३२४ कोटी १३ लाख त्यापैकी सोनेतारण कर्ज व्यवहार २९२ कोटी ०९ लाख, गुंतवणुक ३०२ कोटी १४ लाख, मालमत्ता २८ कोटी ७४ लाख अशी सांपत्तीक स्थिती असलेल्या या संस्थेला बँको ब्ल्यु रिबन पुरस्कार २०२१ मिळाल्याबद्दल कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील जनतेमधुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.