लांजा : लांजा तालुक्यातील तळवडे येथे ग्रामविकास मंडळ, तळवडे आयोजित भव्य जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार दि.२० मार्च रोजी होणार आहे. या स्पर्धेसाठी आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.
स्पर्धेतील यशस्वी प्रथम क्रमांकासाठी १५,५५५ रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकासाठी ११,१११ रुपये व सन्मानचिन्ह, तृतीयसाठी ७,७७७ रुपये व सन्मानचिन्ह अशी बक्षीसे देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर उत्कृष्ट निशाण, उत्कृष्ट झांज, आणि उत्कृष्ट सनई कलाकारांसाठी १५०१ व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात येणार आहेत. सहभागी सर्व स्पर्धकांना सन्मानचिन्ह व प्रवास खर्चासाठी १५०० रुपये देण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी संजय पाटोळे- ९७६७१८२३१७, प्रकाश पाटोळे- ७०२०२९९२४४ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्पर्धंकानी सहभागी होण्याचे आवाहन ग्रामविकास मंडळ, तळवडे यांच्यावतीने करण्यात आले आहे.