⭕️ रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरीला थांबे
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर होळीसाठी आणखी एक गाडी जाहीर करण्यात आली आहे. नव्याने जाहीर करण्यात आलेली गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस ते कर्नाटकातील ते ठोकूर दरम्याान धावणार आहे. शिमगोत्सवासाठी जाहीर करण्यात आलेली ही गाडी (01017) दि.17 मार्च रोजी लो. टिळक टर्मिनसहून दुपारी 1.30 वाजता सुटून दुसर्या सकाळी 7 वा. 10 मिनिटांनी ती ठोकूरला पोहचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी (01018) ठोकूर येथून दि. 18 मार्च रोजी दुपारी 12 वाजता सुटून दुसर्या दिवशी ती पहाटे 5 वाजता मुंबईत लो. टिळक टर्मिनसला पोहचेल.
संपूर्ण प्रवासात या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, थीवी, करमाळी, मडगाव, कारवार, कुमटा, मुरडेश्वर, भटकळ, मूकांबिका रोड, बिंदूर, कुंदापुरा, उडूपी, मुलकी, सुरतकल या स्थानकांवर थांबणार आहे. एकवीस डब्यांच्या एलएचबी गाडीला प्रथम श्रेणी ए. सी 1, टू टायर ए.सी. 3, थ्री टायर एस. सी. 15 तसेच जनरेटर कार दोन अशी कोचची रचना असेल. शासनाचे कोव्हीड संदर्भातील नियम पाळून ही गाडी चालवली जाणार आहे.