उजेडात भांडाभांडी, अंधारात घालू अंडी !
दिन – ब – दिन बढ़ती जा रही बेरोजगारी,
कारण नेता और राजनीती की लाचारी !
जनता रहती है मुंह देखती,
मलाई खा रहे हैं नेता और भ्रष्टाचारी !
मुंबईतील गोरेगाव येथे आमदारांसाठी ३०० एचआयजीची घरे बांधण्यात येणार आहेत. एमएमआर रिजनमधील (मुंबई महानगर प्रदेश म्हणजे मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथील) आमदारांना वगळून ग्रामीण भागातील आमदारांना ही घरे दिली जातील असे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केले. नवीन आमदार निवासाचे काम सुरू असल्याने सध्या अनेक आमदारांना मुंबईत भाड्याच्या घरांत राहावे लागत आहे. त्यामुळे आव्हाड यांची ही घोषणा त्यांच्यासाठी सुखकारक ठरली आहे. आमदारांना घरे दिली या घोषणेबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निर्णयाचे स्वागत केले. (सरकारनामा २४ मार्च २२) सरकारने आमदारांसाठी घरांचा निर्णय घेतला यात काही नवल वाटत नाही पण नवल वाटत ते एकाच गोष्टीच की, शेतक-याचे प्रश्न, बेरोजगारीचे प्रश्न अथवा महीलांवर होणा-या अत्याचारावर विधानभवनात राडा होतो ?आणि या राड्यामुळे कित्येक वेळा हिवाळी व पावसाळी अधिवेशनात कामकाज तहकुब होताना पाहील आहे पण आमदारांच्या घरांचा निर्णय होताना त्याला एकाही मतदार संघाच्या एकाही आमदाराने व विरोध पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोध का केला नाही ?कारण घरकुलाचा लाभार्थी होण्यासाठी थंड आणि षंढाची भूमिका घेणा-यात तुमच्या मतदार संघाचा आमदार आहे का ?याचा मतदारांनी विचार करावा. कारण हा लोकप्रतिनिधी जर विधानसभेत तुमच्या मतदार संघाचे प्रश्न मांडण्याऐवजी जर तो स्वतःच्या घरकुलासाठी खाली मान घालून नंदीबैलाप्रमाणे गुबू गुबू करत असेल तर या बैलाचा पोळा करण्यापुर्वी एकदा पवनी घाला. कारण शेतक-याकडून बळजबरीने वीजबिलाची रक्कम वसूल केली जात असताना तुमचा लोकप्रतिनिधी विधानसभेत प्रश्न मांडत का नव्हता ?हे लोकप्रतिनिधी काय विधानभवनात जाऊन रबरी लिंग चोळत बसतात ?असे पक्ष श्रेष्ठीचे रबरी लिंग चोळे आमदार ओळखा आणि यांना येणा-या काळात पाण्यात डोहात पनवी घाला. कारण हे शेतक-यांच्या प्रश्नांसाठी केवळ ऐकमेकांना भांडल्याच नाटक करतात पण स्वहीताच्या निर्णयाला एकमुखाने संमती देतात म्हणून तर विद्रोही कवी म्हणतात तस ‘उजेडात भांडाभांडी, अंधारात घालू अंडी !’ अस धोरण लोकप्रतिनिधीच आहे.
मुंबई ही अनेकांसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे, पण शिवसेनेने तसा कधी विचार केला नाही. तसेच, मुंबईचा एवढा गांभीर्यानं विचार माझ्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांएवढा कुणी केला नाही. मुंबईतील कष्टकऱ्यांना घरे बांधून देण्यासंबंधी राज्य सरकार गांभिर्याने विचार केला. झोपडपट्टी पुनर्विकास, बीडीडी चाळ, पत्रा चाळ यांचा उल्लेख करताना आमदारांसाठीही मुंबईत हक्काच घर असणार असल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितले. सर्वसामान्य लोकांचं झालं, आता लोकप्रतिनीधींचं काय? तर आपण जवळपास 300 आमदारांसाठी मुंबईत घरे देणार आहोत. त्यानंतर, आमदारांना कायमस्वरुपी घरे आपण देत आहोत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विधानसभेत स्पष्ट केलं.
(लोकमत २४ मार्च २२) सरकार लोकांना कांदा चाळ, पत्रा शेड असल फुटकळ देऊन स्वतः आणि स्वतःच्या राजकीय लोकांना घर वाटपाचा निर्णय घेत ही खुप मोठी शोकांतिका आहे. कारण एकीकडी शेतकरी देशोधडीला जात असताना त्यांच्याच मताच्या जिवावर मलीदा चाखणा-या लोकप्रतिनिधींना शेतकरी शेतमजून सुशिक्षित बेरोजगार नौकरीसाठी वनवन फिरत आहेत हे का दिसत नाही ?बहुतेक या राजकीय बांडगुळांना मोतिबिंदू झाला असावा. कारण हे महाविकास आघाडी सरकार व विरोधी पक्ष हे स्वतःच्या हितासाठी फायदेपंडीत होतात हे सत्य कोणत्याही पक्षाचा झेंडेधारी भक्त नाकारणार नाही. पण भक्तांड पिलावळ ह्या घरकुल प्रकरणावर विरोधी भूमिका घेऊ शकत नाही कारण त्यांना बापापेक्षा नेता प्रिय वाटतो. बापाची हाड नदीला गेली तरी चालेल पण नेता मुंबई दिल्लीला गेला पाहीजे अस म्हणणारे भक्त सध्या गल्लोगल्ली श्वानासारखी भटकंती करताना दिसत आहेत. म्हणून तर षंढ राजकारण्यांना सुगिचे दिवस आले आहेत.
राज्यातील सर्व आमदारांना मुंबईत स्वतःच्या पैशावर घराचे भाडेही भरणे होत नसेल तर यांनी खुशाला राजीनामे देऊन गावाकडे येऊन चार दोन म्हशीच पालनपोषण करायला कोणी आडवल आहे ?एका एका आमदारांची मालमत्ता किती आहे ?हे इडीच्या माध्यमातून सर्वांसमोर उघड झाल आहे तरीही हे मुख्यमंत्री लोकप्रतिनिधींना भिकारचोटच समजत असतील तर हे महाराष्ट्राच दुर्देव आहे. राज्यात अनेक कुटुंब बेघर आहेत त्यांना हक्काच घर नाही, ते वारंवार अर्ज करून थकले पण त्यांना हक्काच घर मिळू शकत नाही. पण इडीच्या भितीने दवाखान्यात भर्ती होणा-या आमदारांना हक्काच घर दिल जात ही खुप मोठी शोकांतिका आहे. म्हणून तर विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
आमदार असो की खासदार
पंजे असो की छक्के
हे बरे ना ते खरे
सब्ब घोडे बारा टक्के.
आमदारांसाठीच्या घरकुलाचा निर्णय विधानसभेत घेतला जात असताना तिथे कोणत्याही प्रकारचा विरोध न करणारे काही राजकारणी मात्र विधानसभेच्या बाहेर येऊन मला घरकूल नको म्हणून बतावणी करताना दिसतात त्यात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे व मनसेचे आमदार राजू पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे आमदार राजेंद्र शेळके तसेच भाजपचे नागपूरचे आमदार मोहन मते यांनी आपल्याला घरांची आवश्यकता नसल्याचं म्हटलं आहे. (बीसीसी २५ मार्च २२) तर मग आता तुमच्या मतदार संघाचा आमदार काय करतोय ?बघा भक्तांनो तुमचे साहेब रबरी लिंक चोळत बसलेत का ?कारण यापुर्वी अर्थसंकल्पीय अधिवेशनातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार निधी तब्बल एक कोटी रुपयांनी वाढवला त्यामुळे आमदारांना आता पाच कोटी रुपये निधी मिळत आहे. तसेच आमदारांच्या ड्रायव्हरचीही पगारवाढ केली. (बीसीसी २५ मार्च २२) तेव्हाही कोणत्या मतदार संघाच्या लोकप्रतिनिधीने विरोध केला नाही कारण स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी हे लोक एकत्र येतात मात्र जनसामान्यांच्या हिताचे प्रश्न सोडवण्यासाठी उदासीन दिसतात, किंवा गल्लीतल्या शेंबड्या पोरासारखा गोंधळ घालून वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे जे सामान्याचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ मारतात त्यांना जनतेने मतपत्रिकेतून जोरदार चपराक मारली पाहीजे. याविषयी विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
आत्तेभाऊ मामेभाऊ पकालीचं पाणी पिऊ
तुला थोडं मला थोडं मांडिआड खात राहू
परदेशी तुपासंगे भारताची खाऊ पोळी
आम्ही म्हणू हडेलहप्प जणता म्हणेल…..
दस्तर पिंजर खार कबुतर डोली.
आमदारांना मुंबई मोफत घरे देण्याच्या सरकारच्या निर्णयावर जोरदार टीका होत असल्याचे पाहून राज्य सरकारची सारवासारव सुरू आहे. त्याबाबत तुळजापूरमध्ये सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण म्हणतात की, आमदारांना मोफत घरे देणार असा कुठलाही निर्णय झाला नव्हता. (मटा २८ मार्च २२) तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा फक्त आमदारासाठी घर देण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे. आमदारांना घरे देण्याचा महविकास आघाडी सरकारचा निर्णय आहे. आमदारांना घरे द्यायला नकोत हे माझे वैयक्तिक मत आहे. गृहनिर्माण योजनेत कोटा ठरवून त्यात आमदारांना घरं द्या. (एबीपी २८ मार्च २२) तर मग बघा आता एक नेते म्हणतात निर्णय झालाच नाही तर दुसरे म्हणतात माझा वैयक्तिक विरोध आहे. कारण मा. शरद पवार नेहमी द्वंद भुमिका घेतात. जस की, केंद्र सरकारने जे शेतकरी विरोधी कायदे पारित केले होते तेव्हा या कायद्याच समर्थन पवारांनी केल होत. पण शेतकरी अंदोलनाची धग व वाढता पाठींबा पाहुन पवारांनी आपली भुमिका बदलली होती. यापुर्वीही जेम्स लेन प्रकरण व इव्हीएम विरोधी अंदोलनात संभ्रमित भुमिका घेणारे हेच ते शरद पवार आहेत पण साहेबांनी डब्बल भूमिका घेऊन कोलांटउड्डी मारलेली ही त्यांच्या भक्तांना समजणार नाही. म्हणून तर म्हणावं वाटत की,
चुनाव प्रचार में खूब वादे करते हैं,
समाज सेवा की खातिर जाहिर इरादे करते हैं !
बदल जाते हैं चुनाव के बाद,
राजनेता राजनिती और चापलूसी प्यादे करते हैं !.
हेरंब कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहताना म्हणाले की, उद्धवजी, सरकारविषयीच्या सहानुभूतीला घरघर लागेल असे निर्णय घेऊ नका. एसटीचा संप सुरू असून आमदारांच्या ड्रायव्हरची पगारवाढ जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे त्यामुळे सर्व सामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून आमदारांना घरं देण्याचा निर्णय संतापजनक आहे. तसेच मराठी शाळा संस्थाचालक संघटनेचे समन्वयक सुशील शेजूळे म्हणाले की, मराठी शाळा आणि शिक्षणासाठी सरकारकडे पैसे नाहीत आणि आमदारांना मुंबईत घरं देण्यासाठी बजेट आहेत. तर विश्वंभर चौधरी यांनीही म्हटलं की, आमदारांना घरं देण्याचा राज्य सरकारचा निर्णय म्हणजे करदात्यांच्या पैशांवर घातलेला दरोडा आहे. ज्यांची संपत्ती १०० कोटी रुपयांच्या पुढे आहे त्यांना घरं मिळणार ही राज्याच्या तिजोरीची लूट आहे. (बीसीसी २५ मार्च २२) तसेच शिक्षण सेवकांकडूनही याविरोधात ट्वीटरवर मोहीम सुरू करण्यात आली आहे. आमदारांना निधी वाढ आणि घरं देण्याच्या निर्णयाला ट्वीट करून विरोध केला जातोय. त्यात शिक्षण सेवक तुकाराम गिरी यांनी म्हटलं की, जेव्हा आम्ही सहा हजार रुपयांवर राबत होतो तेव्हा तुम्ही आमदारांती घरं भरत होतोत, हे आम्ही कदापी विसरणार नाही.(बीसीसी २५ मार्च २२) म्हणून बहूजन समाजाला सागांव वाटत की, तुम्ही निवडून दिलेला लोकप्रतिनिधी तुमच्या हिताचा आहे का ?जो आपल्या स्वतःच्या घरकुलाचा निर्णय होत असताना थंड बसतो तो तुमचे प्रश्न सोडवेल का ? टांग्याचे घोडे बदलून पाहीले आणि यावेळी टांगा पल्टी करून टांगा बदलला तरी आताचेही घोडे कामचूकार ऐतखाऊ आणि मलिदाचोर निघालेत हे वास्तव नाकारता येत नाही. म्हणून तर म्हणून विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
याने काढाली तिची गुंडी, तिने ओढाली याची बंडी
उजेडात भांडाभांडी, अंधारात घालू अंडी !
उगी उगी रूसाफुगी, कधी अट्टीकट्टी घरू
चहावर बहिष्कार, मलिद्यावर ताव मारू !
रेपे नवनाथ दत्तात्रय
मो. 9762636662