आजच्या काळात ह्रदयविकाराचा झटका सामान्य झाला आहे. आपण अनेकदा ऐकतो की एखाद्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. परंतु, ह्रदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीर बरेच संकेत देत असतं, त्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणं अनेकदा जीवावर बेतू शकत, अशा परिस्थितीत आपल्याला हृदयविकाराचा झटका का येतो आणि तो टाळण्याचा उपाय काय आहे याविषयी माहिती असणे आवश्यक आहे.
हृदयविकाराचा झटका का येतो?
शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढले की हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. वास्तविक, शरीरात कोलेस्टेरॉलचे दोन प्रकार असतात. यापैकी पहिला चांगला आणि दुसरा वाईट. जेव्हा तुमच्या शरीरात खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते तेव्हा हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो. बिघडलेली जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे शरीरात कोलेस्टेरॉल वाढू लागते.
हृदयविकाराची लक्षणे :
छाती दुखणे
चक्कर येणे
श्वास घेण्यास त्रास होणे
गॅस निर्मिती
थंड घाम येणे, मळमळ होणे किंवा डोके हलके वाटणे
थकवा जाणवणे, छातीत अस्वस्थतेसह किंवा त्याशिवाय धाप लागणे
हात आणि खांदा दुखणे
लक्षणांमध्ये एक किंवा दोन्ही हात, पाठ, मान, जबडा किंवा पोटात वेदना किंवा अस्वस्थता यांचा समावेश असू शकतो.
पुरुषांप्रमाणेच, स्त्रियांच्या हृदयविकाराच्या झटक्याचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे छातीत दुखणे किंवा अस्वस्थता आहे. परंतु, पुरुषांपेक्षा स्त्रियांना इतर काही सामान्य लक्षणे, विशेषत: श्वास घेण्यास त्रास, मळमळ/उलटी आणि पाठ किंवा जबडा दुखणे अनुभवण्याची शक्यता जास्त असते.
अशाप्रकारे करा स्वत:चे रक्षण
जर तुम्हाला अशी लक्षणे जाणवली तर अजिबात उशीर करू नका आणि डॉक्टरांना भेटा, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर उपचार मिळतील. होय, अनेक वेळा रुग्णाला हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे समजण्यास उशीर होतो, ज्यामुळे त्याचा जीव वाचवणे कठीण होते. तथापि, तुम्हाला लहान लक्षणे जरी दिसली, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.