फासी वादी विचारांचा इतिहास बदलतात ?
इतिहासाचे विच्छेदन हे विचाराच्या इतिहासा शिवाय होत नाही हे जर उद्दिष्ट असेल इतिहास म्हणजे काय? विचाराचा इतिहास म्हणजे काय? हे दोन प्रमुख घटक समजावून घेणे खूप महत्त्वाचे आहे इतिहास जीवनाच्या सर्व क्षेत्राशी निगडित आहे इतिहास हा भूतकाळ आहे इतिहास हा वर्तमानाशी संलग्न आहे इतिहास या समस्या आहेत इतिहास हा सत्य थोडे व असत्य जादा यांचा संग्रह आहे इतिहास हे बहुसंख्यांक याचे शोषण आहे इतिहास हे प्रभुत्व जातींचे अवशेष आहेत इतिहास ही गुलामी आहे हा साम्राज्यवाद आहे इतिहास ही ज्ञान बंदी आहे इतिहास निर्मम शोषणाचे घटित आहे इतिहास हा भूतकाळ आहे परंतु ते सर्व प्रकारचे धर्म संस्कृती चे ओझे आहे ते सूड आहेत त्या समस्या आहेत म्हणून इतिहासाच्या नव दृष्टिकोनाची नितांत गरज आहे
इतिहासाच्या पोटात असंख्य अज्ञाताचे प्रदेश साठलेले असतात वर्तमानाच्या सत्य कथन व रचना यातून असत्याचा इतिहास निर्माण करण्याची प्रक्रिया ही प्रभुत्व वादी वर्ग करीत असतो त्यामुळे असत्याच्या समर्थनासाठी प्रभुत्व वादी यांना हिंसा उपयोगी पडते
इतिहासाला हिंसा प्रिय असते हिंसेच्या आधारे इतिहास पुढे जात असतो या सर्वांच्या मध्ये विचाराचा इतिहास हिंसेचा इतिहास धर्माचा इतिहास मानवी सभ्यतेचा इतिहास मानवी शोषणाचा इतिहास अत्याचाराचा इतिहास धर्मांतराचा इतिहास बुद्धिप्रामाण्यवाद यांचा इतिहास निरीश्वरवादी यांचा इतिहास मानवमुक्तीचा इतिहास वंचितांचा इतिहास अभिजन वाद्यांच्या प्रभुत्वाचा इतिहास असेइतिहासाचे अनेक नवे विभाग आणि प्रदेश आता ज्ञान शाखा तयार करीत आहे त्यामुळे इतिहासाचा इतिहास आणि विचारा चा इतिहास हे संलग्न पणे ज्ञान शाखांच्यामध्ये पुढे आले आहेत
विचाराचा इतिहास आणि नीती तत्त्वज्ञानाचा इतिहास हे संलग्न पणे चालत राहतात तत्त्वज्ञानाच्या इतिहासात विचाराच्या इतिहासाचे सूक्ष्म संदर्भ सलग धागे जोडले जातातच असे नाही उदाहरणार्थ निरीश्वरवाद यांचा इतिहास यामध्ये हिंसा हत्या ही सारखी पुढे येते त्यामुळे निरीश्वरवादी परंपरा आणि प्रतीक वादी ईश्वरवादी यांची परंपरा यांची संमिश्र ता यांच्या कथानकातील असंत्याची आदलाबदल हि धूर्तपणे चालू असते त्यामुळे विचाराचा इतिहास हा नेहमी प्रदूषित होत असतो केला जात असतो विचाराचा इतिहास यामध्ये मानव मुक्तीचा लढा असतो विचाराचा इतिहासामध्ये शोषणाविरुद्ध लढण्याच्या परंपरेचा पराभव कसा केला गेला आहे हे आढळून येते विचाराचा इतिहास हा धर्मसत्तेच्या श्रद्धा राजकारणातून बदलला जातो भारतीय इतिहासाच्या व्यापक क्षेत्रात हे सर्व संघर्ष चालू आहेत आणि सन्मुख असा इतिहासाचा प्रवासही पुढे चालू आहे सूड इतिहासाला प्रिय असतो वंशवाद हा इतिहासाचा पाया असतो इतिहासाला असं त्याचे वरदान असते इतिहास हा या तीन घटकांच्या आधारे नेहमी वर्तमान संघर्षमय बनवतो भारतामध्ये मंदिर मशिदी चर्च यांच्यावरील हल्ले ते नष्ट करणे त्यावर दुसऱ्या धर्माच्या इमारती बांधणे याबद्दलचा चाललेला इतिहासाचा ऊन मादी विचार इतिहासाच्या रक्तपाताच्या पुनरावृत्ती ची गोष्ट ठरणार नाही ना इतके भय निर्माण झाले आहे ज्ञान वापीचा वाद
कुतुब मिनार चा वाद ताजमहल चा वाद अनेक ठिकाणी बुद्ध मूर्ती सापडत असल्याचे उत्खननातील पुरावे थोडक्यात धर्म संघर्षाच्या रक्तपा ता चा कालचा इतिहास हे भारतीय वर्तमानाचे मरण बनले आहे म्हणून विचारा चा इतिहास हा अखिल मानव जातीच्या कल्याणचा इतिहास आहे विचारांच्या इतिहासात मानवी सभ्यतेचे नव् अविष्कार पुढे येत असतात मानवजात ही नेहमी वर्तमानातून हा विचाराचा इतिहास तयार करीत असते पण विचाराच्या इतिहासाचे मारेकरी हे हिंसेचे पाईक असतात त्यांना मानव मुक्तीचा इतिहास नष्ट करावयाचा असतो बुद्धीप्रामाण्यवादी व्यक्ती आणि संघटना नष्ट करावं करणे रक्त पाती इतिहासकारांचे अहम कर्तव्य त्यांनी ठरवलेले असते त्यामुळे त्यांची प्रिय हिंसा इतिहासाला मोठी करते बुद्धिप्रामाण्य वादाचे चा इतिहास विवेकचा इतिहास निरीश्वरवा दाचा इतिहास हे विचाराच्या इतिहासाचे विभाग आहेत यामध्येच मानवमुक्तीचा आशावादी प्रवास आढळून येतो काळाच्या व्यापक पटलावर विचाराचा इतिहास अल्प गोष्ट आढळते आधुनिक उत्तर काळात विचाराच्या इतिहासाला कायम महत्त्वअसणारआहे पण अस्त्याच्या कथनाचेमाहितीचे. मायाजाल हे इतके मोठे व्यापक असणार आहे की त्यामधून विचाराचा इतिहास याचे अन्वेषण करणे अशक्य होणार आहे विचाराचा इतिहास शोधला पाहिजे स्वीकारला पाहिजे त्याचे समर्थन केले पाहिजे तोच पुढे नेला पाहिजे त्यामधूनच मानवमुक्तीच्या कल्याणाचा देशी व आंतरराष्ट्रीय प्रवास सुखकर होऊ शकतो आणि कार्पोरेट भांडवलशही व कार्पोरेट साम्राज्यवादी यांची मिलीभगत रोखता येते व जगातील निर्मन शोषण रोखता येते यासाठी विचाराच्या इतिहासाचे नवे पारायण करण्याची गरज आहे विचाराचा इतिहास हा व्यर्थ अभिमान नाकारतो सत्य स्वीकारतो विचाराचा इतिहास हा वंशवाद नाकारतो हा धर्मवाद नाकारतो हा प्रादेशिक वाद नाकारतो हा भाषावाद नाकारतो विचाराचा इतिहास हा ज्ञान आणि मानव मुक्ती या दोन संलग्न जीवन प्रवासाला सशक्त करतो म्हणून साहित्य म्हणजे विचार नव्हे साहित्य म्हणजे ज्ञान नव्हे साहित्य म्हणजे दुःख मुक्ती नव्हे साहित्य म्हणजे निव्वळ अभिजात सर्वश्रेष्ठ आनंद ही नव्हे साहित्यात इतिहासाला लपवले जाते साहित्य आहे इतिहासाचे स्व समर्थनाचे निंदनीय प्रयत्न असतात ते संघर्ष नाकारून सुप्त आणि मुक्तपणे अविष्काराचे आक्रोश साहित्य करीत असते साहित्य आवाज असतो वेद नसते दुःखाचा गहिवर असतो परंतु तो उदारमतवादाच्या लेखन कर्त्याच्या दया वादाने विकसित होऊन मांडला जातो तो इतिहास त्या दया वाद्यांना मोठा करतो म्हणून विचारा चा इतिहास हा सत्याचा इतिहास म्हणून स्वीकारण्याची विकसित करण्याची ज्ञान अभिवृत्ती सर्व ज्ञान क्षेत्रांच्या मध्ये सतत वाढली पाहिजे अश्या दृष्टीने प्रयत्नांची नितांत गरज आहे तरच असहमती अविष्कार स्वातंत्र्य अभिव्यक्ती शोषणाविरुद्ध संघर्षाचे निरंतर प्रयत्न टिकून राहतील अन्यथा हिंसा प्रिय फासीवाद हा असत्याचा इतिहासाने सशक्त होत पुढे जात राहील घराघरात येत राहील आणि वंशवादी शोषण वादी हे फाशी वादाचे वाहक विचार इतिहासाचे मारेकरी म्हणून त्यांची निवड करण्यात त्यांना बाजूला ठेवण्यात शिक्षणक्षेत्राला काम कर कायम करावे लागेल आज विचाराचा इतिहास आणि वंचितांचा इतिहास मानवमुक्तीचा इतिहास शांती सद भावाचा इतिहास या विचारधारांचे सशक्तिकरण प्रत्येकाने करीत राहणे हाच संघर्ष काळातील मार्ग ठरतो आहे तो स्वीकारण्याशिवाय दुसरा उपाय नाही
शिवाजी राऊत प्रेस
सातारा 20 जून 22 वेळ 10.15