रत्नागिरीतील नर्सिंग कॉलेजच्या १७ विद्यार्थांसह संघटनेच्या कार्यकर्त्यांचे उद्या आझाद मैदानावर आंदोलन

रत्नागिरीतील नर्सिंग कॉलेजच्या १७ विद्यार्थांसह संघटनेच्या कार्यकर्त्यांचे उद्या आझाद मैदानावर आंदोलन

रत्नागिरीतील नर्सिंग कॉलेजच्या १७ विद्यार्थांसह संघटनेच्या कार्यकर्त्यांचे उद्या आझाद मैदानावर आंदोलन

रत्नागिरी /जिल्हा प्रतिनिधी

रत्नागिरी तालुक्यातील द यश फाउंडेशन नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट या नामांकित महाविद्यालयातील गलथान कारभार काही दिवसांपूर्वी भारतीय लोकसत्ताक विद्यार्थी संघटनेने उघड केला होता. नर्सिंग महाविद्यालयाने विद्यार्थ्याना प्रवेश देऊ असे सांगितले मात्र अंतिम परीक्षेला विद्यार्थ्याना बसविलेच नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याबाबत नर्सिंग महाविद्यालयांच्या प्राचार्यांना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जाब विचारला होता. यावर प्राचार्यांनी उडवा उडवीची उत्तर दिली. यावर रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना दोन वेळेस विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊनसुद्धा जिल्हाधिकारी डी एन पाटील यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे आता भारतीय लोकसत्ताक विद्यार्थी संघटनेने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

या नर्सिंग महाविद्यालयातील तब्बल ७४ विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी दीड लाख रूपये उकळून विद्यार्थांना 2020-21 या वर्षात प्रवेश देण्यात येईल, असे सांगून प्रवेशच दिला नाही. या महाविद्यालयाचे संस्थाचालक बाळ माने विद्यार्थ्यांशी बेजबाबदाररित्या वागत आहे तसेच महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केले तसेच विद्यार्थ्यांची फसवणूक करून आर्थिक लूट देखील केली. या प्रकरणी महाविद्यालय व बोर्ड प्रशासनावर कारवाई करण्यात यावी, GNM च्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थीनीची परीक्षा तात्काळ घेऊन व्दितीय वर्षास प्रवेश मिळालाच पाहिजे, २०२० – २१ वर्षा मध्ये विद्यार्थीनी घेतलेल्या शैक्षणिक कर्जाचे एका वर्षाचे व्याज विद्यार्थीनीना द्यावे अथवा पुढील वर्षाची फी माफ करावी, शैक्षणिक वर्ष २०२० २१ या वर्षाची पूर्ण फी घेऊन त्या वर्षाच्या बोर्डाच्या परीक्षेस न बसणाऱ्या व विद्यार्थीनीची दोन वर्ष शैक्षणिक अथवा आर्थिक नुकसान व फसवणुक करणाऱ्या महाविद्यालय व बोर्ड प्रशासन यांच्यावर कारवाई करण्यात यावी, विद्यार्थीनीना डूब्लिकेट फी रीसीट देऊन आर्थिक नुकसान व आर्थिक फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, हॉस्टेलची फी घेऊन हॉस्टेल उपलब्ध न करणाऱ्या महाविद्यालय प्रशासनावर कारवाई करण्यात यावी. या प्रमुख पाच मागण्यांसाठी उद्या 21 जून रोजी सकाळी 10 वाजता लोकसत्ताक विद्यार्थी संघटनेच्यावतीने आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात कार्यकर्त्यांसोबत विद्यार्थी ही सहभागी होणार आहेत. अशी माहिती विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष मनीष जाधव यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *