वेदासी विटाळ शास्त्रासी विटाळ ! पुराणे अमंगळ विटाळाची !
✍️नवनाथ दत्तात्रय रेपे
भट बोकड मोठा या पुस्तकाचे लेखक
मो. ९७६२६३६६६२
देहासी विटाळ म्हणती सकळ ! आत्मा तो शुद्ध बुद्ध।।
देहीचा विटाळ देहीच जन्मला।सोवळा तो झाला कवण वर्ण।।
विटाळा वाचूनि उत्पत्तीचे स्थान।कोणी देह निर्माण नाही जगी।।
म्हणूनि पांडुरंगा वानितसे थोरी।विटाळ देहांतरी वसतसे।।
देहीचा विटाळ देहीच निर्धारी।म्हणत महारी चोखीयाची।।
असे रोखठोक मत आपल्या अभंगातून संत सोयराबाई यांनी मासिक पाळीविषयी मांडले आहे. पण हे विचार भटांच्या डोक्यात बसण्यापलीकडचे आहे. कारण आर्य भटांच्या खोपडीतून निघालेल्या व निर्माण झालेल्या भंकस कथेतून सांगितल की, ब्रम्हणदेव नामक अर्धनारी ? नटेश्वराच्या जागेतून बगलेतून तोंडातून व पायातून जगातील मानवजातीची उत्पत्ती झाली. त्याच विचारधारेचे पाईक आज त्या बाईल्या ?ब्रम्हदेवाचे देव्हारे माजवताना दिसतात. पुरुषाच्या मुखातून लेकर होतात का ?ह्या ब्रम्हदेवाला मासिक पाळी कुठून येत होती असा प्रश्न महात्मा फुलेंनी विचारून ह्या ब्रम्हदेवाचा गर्भपात केला होता. पण असे प्रश्न आजपर्यत ज्यांच्या मस्तकात कधीच पडले नाहीत ते बाईल्यांचे बाईले समर्थक महीलेला मासिक पाळीमुळे दुय्यम स्थान देतात, तीचा पावलोपावली अवमान करतात. त्या पुरुष सत्ताक संस्कृतीच्या समर्थकांना सागावं वाटत की, तुम्ही ज्याच्या पोटी जन्म घेतला आहे ती तुमची आई एक महीला आहे. तुमच्या जन्मापुर्वी व जन्मानंतर तुमच्या आईने सहन केलेल्या कळा आणि तिच्या वाट्याला आलेले दु:ख विसरून महीलाच्या मासिक पाळीला नावे ठेऊन महीलांना हीन लेखू नका. ह्याच कारण मासिक पाळीतून तुमचा जन्म झाला आहे याची थोडीतरी लाज बाळगा. पण आज काही कपाळकरंट्ये मात्र महीलेला आलेल्या मासिक पाळी दरम्यान तीचा अवमान होईल अस वर्तन करताना दिसतात. त्यात काही शिक्षकही कुठेच कमी नाहीत अस म्हटल तर चालेल ? कारण मासिक पाळीत जर मुलीने वृक्षारोपण केल तर ते झाड जळत असा जावईशोध एका शिक्षकानं लावला त्यावर मोजक्याच लोकांनी प्रतिक्रिया दिली. त्याव्यतिरिक्त चित्रातला वाघ केवळ आणि केवळ चित्रातच डरकाळी फोडताना शोभून दिसण्या लायक आहे अस वाटायला लागल कारण अजूपर्यंत वाघातल्या चित्राने डरकाळी फोडली नाही ही खुप मोठी शोकांतिका आहे.
प्रत्येक मानव हा आईच्या उदरातून निर्माण झालेला आहे, त्या जीवाची निर्मीती होण्यासाठी महीलेला मासिक पाळी येण म्हत्वाच असत. पण ब्रम्हदेवाच्या जांगेतून गरंगळत आलेल्या पिलावळी मात्र आज महीलांच्या मासिक पाळीवर प्रश्न करून त्यांना हीनतेची वागणूक देताना दिसतात. त्यात नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथिल त्र्यंबक देवगाव आश्रम शाळेत १५ दिवसांपूर्वी वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी शाळेतील शिक्षकाने सर्वांना सूचना केली की, ज्यांना मासिक पाळी सुरु असेल त्यांनी झाड लावू नये, अन्यथा झाड जळून जाईल अस सांगून ज्या विद्यार्थिनींना मासिक पाळी होती त्यांना वृक्षारोपण करु दिलं नाही. याप्रकरणी एका १२ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेणा-या विद्यार्थिनीने ह्या शिक्षकाची थेट तक्रार केली आहे. पाळीचा आणि वृक्षारोपणाचा काहीही संबंध नसताना केवळ अंधश्रद्धेपोटी शिक्षकाने हे केल्याने अनेकांनी यावर संताप व्यक्त केला आहे. (मटा २६ जूलै २२) मासिक पाळीचा ज्यांना एवढा तिटकारा असेल त्यांनी खुशाल आपण ब्रम्हाच्या जांगेची पैदाईश आहोत हे जाहीर कराव ?कारण अशा नालायक पिलावळी ह्या भुतलावर जन्माला येण्यापुर्वी त्यांच्या मातेने असा कपाळ करंटा लाल कुशीतच का मारला नसेल ?मासिक पाळीतील मुलीच्या स्पर्शाने जे झाड जळत ते आमच्या हिताच असणारच नाही. त्यामुळे मास्तरड्याने खुशाल त्या झाडाचा पाला चघळत बसावा. पण महीला मुलींना जर यानंतर अशी वागणूक कोणी देण्याचा प्रयत्न केला तर त्याला धडा शिकवण्यासाठी मुलींनी सज्ज रहाव कारण लढूनच अशी बांडगुळ नेस्तनाबुत करता येतील.
पीडीत मुलगी सांगते की, ‘ज्या मुलींना मासिक पाळी आली आहे त्यांनी झाडे लावायची नाहीत. कारण त्यांनी लावलेली झाडे मरतात. मासिक पाळीत मुलींनी झाडाकडे यायचं सुद्धा नाही’,‘मागच्या वर्षी जी झाडे लावण्यात आली होती ती जगली नाहीत. कारणं मासिक पाळी आलेल्या मुली झाडाजवळ जातात आणि त्यामुळे झाडं जगत नाही’,असं शिक्षक म्हणाले. याबद्दल मुलींनी शिक्षकांना प्रश्नही विचारला मात्र, शिक्षकांनी दमदाटी करत गप्प बसण्यास सांगितलं असल्याचेही पीडित विद्यार्थिनी म्हणाली. या प्रकरणी आदिवासी विकास विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे आश्रमशाळेवर प्रशासन काय कारवाई करणार हे पाहण महत्वाचं आहे. (लोकसत्ता २६ जूलै २०२२) त्या मुलीने या प्रकरणी आवाज काढला त्याबद्दल तिचे अभिनंदन कारण अशा मानसिकतेच्या लोकांना वेळीच ठेचल पाहीजे, नाहीतर असे विघ्नसंतोषी मास्तरडे मुलींना दमदाटी करून या समाजात मुलींना जगणे मुष्किल करतील. त्यामुळे ह्याला सांगावं वाटत की, स्पर्शाने झाड जळत नसत तर त्याला कमी पडलेल्या पाण्यामुळे झाड जळत असत हे ज्याला समजत नाही अशा शिक्षकाला पायतानाचे फटके का दिले जाऊ नयेत ?अशानीच शिक्षणक्षेत्राचा सत्यानाश केला आहे अस म्हटल तर चुकत कुठे ?जिवंत सरस्वतीचा अवमान करणारांचे मुक समर्थन करून फोटोतील सरस्वतीच्या पुढे ताट वाटी ओवाळून धूप बत्तीचा अंगारा कपाळी माखणारे असे मास्तरडे धरून पायताने का फटकावू नयेत ?जेव्हा मुली अशा विध्नसंतोषींना पायतानाचे फटके देतील तेव्हाच कुठेतरी मुलींचा सन्मान होईल अन्यथा हे नराधम अवमान तर करतच आहेत.
विद्यार्थ्यांना धडे देणारा शिक्षकच जर मुलींना मासिक पाळीत अवमान कारण हिनतेची वागणूक देऊन भेदभवाची कृत्य करत असेल तर मुलांच्या भविष्याचं काय ?असा प्रश्न उपस्थित होतोय. आज देशात एकीकडे सर्वोच्च राष्ट्रपती पदावर आदिवासी महिला विराजमान होत असतांनाच दुसरीकडे आदिवासी आश्रम शाळेतील एका तरुणीला वृक्षारोपण करण्यापासून थांबवलं जातं ही विचार करण्याची गोष्ट आहे. कारण २१ व्या शतकातही अशा संतापजनक घटना घडत असतील तर यावर कठोर कारवाई होणे अत्यंत महत्वाचे आहे. घडलेल्या या प्रकाराबद्दल समाजातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे रुपाली चाकणकर यांनी सदरील घटनेची चौकशी करुन तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. (मटा २६ जूलै २०२२) महीला या नात्याने प्रत्येक महीलेने त्या नाशिक येथिल घटनेचा व तेथिल शिक्षकाचा निषेध करून पीडीत मुलीच्या पाठीशी खंबीरपणे उभ राहील पाहीजे. पण इतर वेळी महीलांच्या प्रश्नावर टाहो फोडल्याचा बनाव करून स्वतःची पोळी भाजणारी तृप्ती देसाई व चित्राताई वाघ ह्या काय कुठे हजला गेल्या का ?कारण ह्यांनी अजूनपर्यत या प्रकरणी आपली भुमिका स्पष्ट का केली नाही ? त्यामुळे अशा संधीसाधू महीला ओळखून यांचाही बंदोबस्त मुलींनी केला पाहीजे. कारण ह्या शिक्षकांच्या डोक्यात बसलेली घाण ही मनुच्या डोक्यातून डोक्यातून निघालेल्या नरकुंडातील आहे. त्यामुळेच तर अशा ब्राम्हणांविषयी दिनकरराव जवळकर म्हणतात की, ब्राम्हण लोक ब्रम्हदेवाच्या ओकारीपासून झालेले असोत किंवा जुलाबापासून झालेले असोत त्यांची जन्मजात अशी वाकडी शेपटी असते.
मासिक पाळी आलेल्या विद्यार्थिनीला शाळेतील वृक्षारोपणाच्या उपक्रमात सहभागी होण्यास मनाई केल्याची घटना नाशिकमध्ये घडली होती. या घटनेचे तीव्र पडसाद उमटल्यामुळे राज्य महिला आयोगापासून ते शिक्षण विभागापर्यंत सगळ्यांनीच या घटनेची गंभीर दखल घेतली. त्यात प्रकल्प अधिकारी यांनी पीडीत मुलीच्या शाळेला बुधवारी भल्या पहाटे भेट दिली. अधिकारी शाळेत दाखल होताच शिक्षकांची एकच पळापळ सुरु झाली. कारण नियमानुसार आश्रमशाळेतील शिक्षकांनी मुख्यालयात राहणे बंधनकारक असते. मात्र हे शिक्षक आपापल्या घरून ये-जा करून आश्रमशाळेत शिकवत असल्याचा प्रकार यावेळी समोर आला. अधिकारी शाळेत आल्याचे समजताच हे शिक्षक तातडीने शाळेकडे जाण्यासाठी निघाले. त्यावेळी देवगाव घोटी रस्त्यावर ह्या मुलीचा अवमान करणा-या शिक्षकांच्या कारला अपघात झाला. (मटा २७ जूलै २०२२) पाळीला विरोध करणारा शिक्षक हा शिक्षक म्हणणाच्या पात्रतेचा होऊन शकत नाही. कारण अशा निच मानसिकतेचे लोक गर्भातच निधन का पावले जात नाहीत ?त्यामुळे प्रकल्प अधिकारी यांनी ह्या शिक्षकाला निलंबीत करून त्या मुलींच्या पायावर नाक घासायला लावल पाहीजे तेव्हाच अशा गोष्टींना आळा बसेल. कारण मासिक पाळी व विटाळासंबंधी संत चोखोबा म्हणतात की,
कोण तो सोवळा कोण तो वोवळा। दोन्हींच्या वेगळा विठ्ठल माझा।।
वेदासी विटाळ शास्त्रासी विटाळ! पुराणे अमंगळ विटाळाची।।
जन्मतां विटाळ मरतां विटाळ।चोखा म्हणे विटाळ आदि अंती।।
निचाचे संगती देवो विटाळला।पाणी प्रक्षाळोनी सोवळा केला।।
कोण तो सोवळा कोण तो ओवळा। विटाळाचे मूळ देहमूळ।।
चोखामेळा म्हणे मज वाटते नवल। विटाळापरते आहे कोण।।