नगरपालिकेने स्वनिधीतून केलेला खर्च ९८ कोटीच्या शिल्लक राकमेतून कामगारांना देण्यासाठी खर्चाला संचालकांची मंजुरी मिळणार:- रवी रजपुते
इचलकरंजी:- महापालिकेच्या स्वनिधीतून निवृत्त कर्मचाऱ्यांची रक्कमा आणि शासकीय देयके १४ व १५ वित्त आयोगाचा जादा हिस्सा नगरपालिका फंडातून भागवण्यात अली आहे, ही रक्कम शासनाने सहायक अनुदानापोटी महापालिकेस दिलेल्या ९८ कोटीतून पालिका स्वनिधीत वळवण्यात यावीत या साठी ९८ कोटी शिल्लक रक्कमेला खर्च करण्याची परवानगी लवकरच मिळणार आहे, त्यानंतर सदर रकमेतून पालिका कर्मचाऱ्याची सर्व देय रक्कमा भागवल्या जाव्यात ,त्यासाठी आपण महानगरपालिका आयुक्तांकडे आग्रह धरणार आहोत, असे मा, उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांनी स्पष्ट केले, सहाय्यक अनुदानापोटी येथे पालिकेस ९८ कोटी आले, त्याचे सर्व थरांतून कौतुक झाले, खासदार धैर्यशील माने यांच्या नेतृत्वाखाली मी स्वतः मा, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, मा, रवींद्र माने,प्रकाश मोरबाळे, सागर चाळके, आदींसह त्यासाठी शासनदरबारी मोठे प्रयत्न केले, असे स्पष्ट करून रवी रजपुते म्हणाले ,पालिका कर्मचाऱ्याच्या देय रक्कमा भगवण्यासाठी या निधीचा प्राधान्याने वापर करावा, असे शासनाने बंधन घातले होते, मात्र सातव्या वेतन आयोगाची फरकाची रक्कम देण्याची तरतूद त्यात न्हवती त्यामुळे त्यासाठी नगरपरिषद संचलकाकडून खास बाब म्हणून मंजुरी मिळवून घेतली त्यानंतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची पहिल्या व दुसऱ्या टप्याची रक्कम, मेडिकल बिले ग्रॅज्युईटी रक्कम देण्यात आली, शिवाय गेल्या दोन महिन्याचा कर्मचाऱ्याचा पेन्शन व पगार याच ९८ कोटीतून भागवला,सुमारे २० कोटी रुपये एवढी रक्कम त्यासाठी खर्ची पडली, कर्मचाऱ्यांचा मासिक पगार व पेन्शन सहाय्यक अनुदानातून देण्याएवजी ९८ कोटीतूनच भागवला , शिवाय शासकीय देय रक्कमही भागवली, त्यात ५० कोटी रुपये खर्ची पडले आहेत, से स्पष्ट करून रवी रजपुते म्हणाले, आज अखेर कर्मचाऱ्यांचा सुट्टीचा पगार,ग्रॅज्युईटी, मेडिकल बिले,अर्जित रजा(रजारोखे) फंडाच्या रक्कमा आदी देय रक्कम १७ कोटीच्या घरात आहे, या रक्कमा ९८ कोटीतिल शिल्लक रकमेला खर्चाची मंजूरी मिळाल्यावर यातुन भागवता येणार आहेत, सातव्या वेतनाचा तिसरा हप्ता या शिल्लक रक्कमेतून ही रक्कम ९८ कोटीतून सध्या शिल्लक रकमेतून भागवावी असा आमचा आग्रह आहे, शिवाय या रक्कमा देण्यासाठी आयुक्तांकडे आग्रही मागणी व विनंती करू असे रवी रजपुते म्हणाले, कामगाराच्या रक्कमा भगवल्यावर आयुक्तांनी श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी अशी आमची त्यांच्याकडे मापक अपेक्षा आहे असेही त्यांनी स्पष्ट केले, ९८ कोटींच्या खर्चाला मंजुरी मिळण्याच्या कामामध्ये आयुक्त सुधाकर देशमुख ,उपायुक्त प्रदीप ठेंगल, अकौंटन मिसाळ मॅडम चे सहकार्य लाभले आहे.
Posted inकोल्हापूर
नगरपालिकेने स्वनिधीतून केलेला खर्च ९८ कोटीच्या शिल्लक राकमेतून कामगारांना देण्यासाठी खर्चाला संचालकांची मंजुरी मिळणार:- रवी रजपुते
