लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मोठया उत्साहात……….!
इचलकरंजी:- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतनिमित्त येथील रवी रजपूते सोशल फौंडेशन तर्फे कामगार चाळ मध्ये डॉ आंबेडकर भवनात रक्तदान शिबीर घेण्यात आले . शिवाय प्रभाग बारा मधील जेष्ठ नागरीकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले . *जेष्ठ नेते विलासराव गाताडे , माजी नगरसेवक रवी माने, भाऊसाहेब आवळे *,* कामगार नेते शिवाजी जगताप,के के कांबळे,धनंजय पळसुले, हरी माळी, आगसर, सदा मालाबादे, भाऊसाहेब कसबे यांच्या हस्ते तसेच मा. उपनगराध्यक्ष रवी रजपूते* यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले . प्रभाग 12 मधील नागरीकांच्यावतीने आयोजित या कार्यक्रमात लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याचा आढावा घेतला आणि त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा लोकोपयोगी उपक्रम हाती घेण्यात आल्याचे रवी रजपूते यांनी स्पष्ट केले .ते म्हणाले, प्रभाग 12 मध्ये गेल्या 25 वर्षांपासून आम्ही राष्ट्रीय महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करीत आलो आहे, जयंतीनिमित्त त्या महापुरुषांचे विचार समाजात विविध सामाजिक आणि कृतिशील उपक्रमाच्या माध्यमातून पोहोचवत असतो, केवळ डिजिटल फलक लावून जयंतीचा दिखावा करीत नाही, असेही रवी राजपुते यांनी स्पस्ट केले.
तत्पूर्वी लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करून अभिवादन करण्यात आले .
या वेळी भागातील उपस्थित …. 500 एवढ्या जेष्ठ नागरीकांना छत्र्या वाटप करण्यात आल्या . तर रक्तदान शिबिरात 101 रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदवला .
हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी रवी राजपुते सोशल फौंडेशन,झाकीर जमादार युवा मंच, कामगार चाळ युवक मंडळ आदी संघटनांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले ,तर रवी राजपूते सोशल फौंडेशनचे रोहीत रवी राजपूते यांनी आभार मानले.