क्रांतीदिन

क्रांतीदिन

क्रांतीदिन

चले जाव ‘हा नारा बनला क्रांतिदिनाला
‘करा वा मरा ‘ मंत्र जाहला क्रांतिदिनाला.. Rc

शूर स्वभावी राष्ट्रपित्याची आज्ञा झाली
हरेक योद्धा गांधी ठरला क्रांतिदिनाला..

भारतभूच्या जखड शृंखला तुटू लागल्या
अहिंसतेने घाव घातला क्रांतीदिनाला..

सत्याग्रह हा पाया बनला स्वातंत्र्याचा
मवाळ योद्धा पुन्हा गर्जला क्रांतिदिनाला ..

उर्मी घेतच स्वातंत्र्याची पहाट आली
प्रकाशतारा तो लुकलुकला क्रांतीदिनाला..

चहू दिशांनी स्वातंत्र्याचे वादळ आले
युनियन जॅकच मुळात हलला क्रांतिदिनाला ..

सहस्त्रकाचे महाननायक गांधी झाले
सारा देशच उभा ठाकला क्रांतीदिनाला ..

संग्रामाची सुरूच मैफल काही दशके
स्वातंत्र्याचा सूर छेडला क्रांतिदिनाला..

राजेशाही, हुकूमशाही संपत आली
स्वातंत्र्याचा दीप तेवला क्रांतिदिनाला..

इंग्रजांसही कळून चुकले…’अखेर ‘आली
इथला पाया ढळू लागला क्रांतीदिनाला..

‘नऊ आठ ‘ हा केवळ साधा दिनांक नाही
तो कायमची मशाल ठरला क्रांतीदिनाला..

—प्रसाद माधव कुलकर्णी
समाजवादी प्रबोधिनी,
५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट
इचलकरंजी – ४१६ ११५
ता.हातकणंगलेे जि .कोल्हापूर
( महाराष्ट्र)
( ९८ ५०८ ३० २९०)
Prasad.kulkarni65@gmail.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *