कौतुकास्पद ! रत्नागिरी गृहरक्षक दलातील जवान आकाश पालकरने ६१११ उंचीचे युनाम शिखर केले सर ;आकाश सोबत प्रसादने ही फडकवला शिखरावर राष्ट्रध्वज

कौतुकास्पद ! रत्नागिरी गृहरक्षक दलातील जवान आकाश पालकरने ६१११ उंचीचे युनाम शिखर केले सर ;आकाश सोबत प्रसादने ही फडकवला शिखरावर राष्ट्रध्वज

कौतुकास्पद !

रत्नागिरी गृहरक्षक दलातील जवान आकाश पालकरने ६१११ उंचीचे युनाम शिखर केले सर

आकाश सोबत प्रसादने ही फडकवला शिखरावर राष्ट्रध्वज

कोकणातील माऊंटेनिअर्स असोसिएशन शिखर सर करणारी पहिली संस्था

कपिलानंद कांबळे /रत्नागिरी प्रतिनिधी

कमीत कमी अंश सेल्सिअस तापमान, प्रचंड बर्फवृष्टीसह झोंबणारे वारे अन् अतिशय कमी ऑक्सिजन पातळी… असे अत्यंत प्रतिकूल वातावरण म्हणजे शारीरिक क्षमतांची कसोटीच. तरीही न डगमगता रत्नागिरीच्या आकाश प्रमोद पालकर याने नुकतेच हिमालय प्रदेशातील लाहौल भागात असलेले माऊंट युनाम हे ६१११ मीटर उंचीवर असणारे व २०,१०० फूट उंचीचे शिखर यशस्वी चढाई करून भारताचा राष्ट्रध्वज फडकावून आकाशने रत्नागिरीकरांसह सर्वच भारतीयांची मान उंचावली आहे. आकाश पालकर हा शिखर सर करणारा गृहरक्षक दलातील एकमेव ठरला आहे. हिमालय सर करणे हे मोठ मोठ्यांनाही अशक्य ठरत असताना आकाशचे शौर्य आणि उत्साह थक्क करणारा आहे. या यशस्वी कामगिरीबद्दल रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डॉ मोहित कुमार गर्ग यांनी आकाश पालकरचा सत्कार केला आहे.

समुद्रसपाटीपासून उंच ठिकाणावर गेल्यानंतर शरीराला त्या वातावरणाशी समरस होण्यासाठी वेळ द्यावा लागतो व शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवावे लागते. त्यासाठी सतत पाणी पिणे,दिवसा न झोपणे,शारिरिक हालचाली करत राहणे आवश्यक असते. हळूहळू उंची गाठत जावे लागते. आवश्यक ती सर्व काळजी घेत २४ जुलै २०२२ रोजी रत्नागिरीतील चार जणांनी शिखराला गवसणी घालण्याचे ठरवले.
२५ तारखेच्या सकाळी ९ वाजता चंदीगड येथे हे चौघे पोचले. माऊंट सर करण्याच्या दृष्टीने निघालेले रत्नागिरीचे गिर्यारोहक दुपारी २ वाजता हिमाचल प्रदेश याठिकाणी पोहोचून त्यानंतर रात्री ११ वाजता मनाली येथून निघाल्यानंतर किलॉंग जिस्पा,बारालाचा यामार्गे भरतपूर येथून त्यांची चढाई सुरू झाली. सुरूवातीला भरतपूर येथे पोहोचल्यानंतर त्यांचा ऑक्सिजनचा पारा खाली सरकत होता. परंतु विविध पद्धतीने वातावरणाशी जुळवून घेत त्यांनी स्वत:ची ऑक्सिजन पातळी वाढवून चढाईसाठी सज्ज झाले. भरतपूर ते कॅम्प१ ही खरी चढाई असून ओढे-नाले क्रॉस करत चार जण कॅम्प १ जो कि १७००० फूटांवरती आहे तेथे पोहोचले. इथे पोहचल्यानंतर पुन्हा एकदा सर्व गिर्यारोहकांनी आरोग्याबाबत सर्व काळजी घेत व लोड फेरी करत सर्वांनी २ दिवस याठिकाणी घालवले. त्यानंतर एकमेकांना धीर देत पुन्हा चढाईला सुरुवात केली. याचं दरम्यान चमुतील एक सदस्य थकवा वाटत असल्याकारणाने माघारी परतला. पुन्हा तिघांची वाटचाल सुरू झाली. साधारणतः १८००० फुटापर्यंत येऊन चमूमधील दुसरा गिर्यारोहक आजारी पडल्यामूळे त्याला माघार घ्यावी लागली.

त्यानंतर २९ जुलैला रात्री १ : ३० वाजता शिखराच्या शेवटच्या चढाईला सुरुवात झाली. शेवटच्या कॅम्पवरून म्हणजे (अंदाजे) १७००० फूटांवरून २०१०० चे अंतर गाठायचे होते. वाटेत अणकुचीदार दगड व खडकांनी आच्छादलेला रस्ता साधारणपणे ६ तास चालल्यानंतर शेवटच्या टप्प्यात बर्फ लागतो व शिखरमाथ्यावर पोचल्यानंतर तेथून चंद्रभागा व मुलकिला या रांगेतील पर्वत आकाशला दिसू लागले. ३० जुलै रोजी सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी युमान शिखर सर करून आकाशने भारताचा राष्ट्रध्वज फडकवला. युमान शिखराच्या माथ्यावर पोहोचून आकाश पालकर याने रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. हे यश संपादन केल्याबद्दल सर्वत्र त्याचे कौतुक केले जात आहे.

आकाश सोबत प्रसाद कासारनेही सर केलं शिखर

रत्नागिरी येथील चार गिर्यारोकांनी युनाम शिखराला गवसणी घालण्याचे ठरविले होते. यांमध्ये आकाश पालकरसह कुंतल खातू, प्रसाद बाष्टे, आणि प्रसाद कासार या चार गिर्यारोकांचा समावेश आहे. चौघेही बेसकँप १ पर्यंत पोचले. त्यानंतर दोघांना तब्बेतीच्या कारणामुळे माघारी परतावे लागले. कुंतलने शिखराच्या अगदी शेवटच्या चढाईतील जवळजवळ १८००० मीटरचा टप्पा पार केला. प्रसाद कासार याने आकाशसोबत युमान शिखराच्या माथ्यापर्यंत सोबत राहिला. आणि दोघांनी मिळून युनाम शिखर सर करून भारताचा राष्ट्रध्वज फडकवून भारत माता की जय, शिवाजी महाराज की जय असे नारे देत आनंद साजरा केला.

माऊंटेनिअर्स असोसिएशन शिखर सर करणारी पहिली संस्था

आकाश पालकर रत्नागिरीत परतला त्यावेळी म्हणाला, युमान शिखरावर ४ गिर्यारोकांमधे चढाई करण्याचे धाडस माऊंटेनिअर्स असोसिएशन रत्नागिरी या संस्थेमुळे निर्माण झाले. दोन महिने संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण घेत होतो. मला आणि प्रसादला युनाम शिखराच्या माथ्यापर्यंत पोचण्यासाठी प्रोत्साहित ज्यांनी केलं तो कुंतन खातू आणि प्रसाद बाष्ठे या दोघांनी केलं. रत्नागिरीतून प्रथमच आम्ही गेलेलो यशस्वी युनाम शिखरावर पोहोचलो त्यावेळी मला आनंदाचे अश्रू देखील अनावर झाले.

यापुढे आकाश म्हणाला, गिर्यारोहण क्षेत्रातील माऊंटेनिअर्स असोसिएशन ही संस्था कोकणातील शिखर सर करणारी एकमेव संस्था ठरली आहे. तीन दिवसांपूर्वी (दिनांक ७ ऑगस्ट रोजी) वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या वतीने माझा सत्कार करण्यात आला. त्यावेळी मला खूप अभिमान वाटला. भविष्यात कोकणातील सामान्य माणसाला देखील माउंट सर करण्याची जिद्ध व इच्छा निर्माण होईल. असा विश्वास यावेळी आकाशने व्यक्त केला आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *