हिरव्या सोन्या’ची नवी क्रांती ,कोल्हापुरात प्रथमच भव्य बांबू उद्योग परिषद व प्रदर्शन चे आयोजन

हिरव्या सोन्या’ची नवी क्रांती ,कोल्हापुरात प्रथमच भव्य बांबू उद्योग परिषद व प्रदर्शन चे आयोजन

हिरव्या सोन्या’ची नवी क्रांती ,कोल्हापुरात प्रथमच भव्य बांबू उद्योग परिषद व प्रदर्शन चे आयोजन

कोल्हापूर (प्रतिनिधी): जागतिक वन दिन आणि जलदिनाचे औचित्य साधून कोल्हापूरकरांसाठी एका अनोख्या आणि भविष्यातील अर्थकारणाला नवी दिशा देणाऱ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापुरात प्रथमच २१ व २२ मार्च २०२६ रोजी भव्य बांबू उद्योग परिषद व प्रदर्शन पार पडणार असून, शेतकऱ्यांपासून ते नवउद्योजकांपर्यंत सर्वांसाठी ही ‘हिरव्या सोन्या’ची नवी दारे खुली करणारी पर्वणी ठरणार आहे.
कोल्हापुरातील शहाजी लॉ कॉलेज पटांगण, के.डी.सी. बँकेजवळ हे दोन दिवसीय भव्य प्रदर्शन भरणार आहे. कौन्सिल ऑफ एज्युकेशन कोल्हापूर,देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार मेमोरियल ट्रस्ट आणि पाटलोबा पाटील बांबू रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा ऐतिहासिक उपक्रम होत आहे. कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा सौ. रजनीताई मगदूम आणि सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम हे या परिषदेचे प्रमुख संयोजक म्हणून काम पाहत आहेत.
शासकीय धोरणे, अनुदान आणि यशोगाथांचे व्यासपीठ या परिषदेत महाराष्ट्र शासनाच्या बांबू उद्योग २०२५ धोरणा’वर विशेष चर्चासत्र होणार आहे. तसेच, बांबू लागवडीच्या विविध अनुदान योजनांची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली जाईल. या क्षेत्रातील बांबू शेतकऱ्यांची यशोगाथा आणि यशस्वी बांबू उद्योजकांचे अनुभव कथन नवोदितांना प्रेरणा देणारे ठरेल. महाराष्ट्रातील नामवंत बांबू तज्ज्ञ आणि उद्योजकांचे थेट मार्गदर्शन ऐकण्याची मोठी संधी या निमित्ताने उपलब्ध झाली आहे.
बांबूचे कपडे ते बांधकाम तंत्रज्ञान: आधुनिक दालने
प्रदर्शनातील दालने अत्यंत नाविन्यपूर्ण असणार आहेत. यामध्ये विशेषतः बांबूपासून बनवलेले टॉवेल आणि कपड्यांचे दालन हे मुख्य आकर्षण ठरेल. याशिवाय, बांबूची सळी वापरून घरे बांधण्याचे अद्ययावत तंत्रज्ञान, भविष्यातील बांबू प्रक्रिया उद्योग, बांबू उद्योगातील आधुनिक मशिनरी आणि बांबू नर्सरी उद्योग यावर सखोल चर्चासत्रे आयोजित केली आहेत. उपस्थित शेतकऱ्यांना बांबूच्या विविध प्रजातींची ओळखही करून दिली जाणार आहे.
हस्तकला, प्रशिक्षण आणि विक्री व्यवस्थापनावर भर
केवळ माहिती नव्हे, तर या प्रदर्शनात बांबू हस्तकला प्रदर्शन आणि प्रत्यक्ष हस्तकला प्रशिक्षण’ दिले जाणार आहे. तसेच उत्पादित मालाला बाजारपेठ कशी मिळवून द्यावी, यावर ‘बांबू विक्री व्यवस्थापन व विक्री’ आणि ‘बांबू उद्योगातील संधी’ या विषयांवर तज्ज्ञांचे विशेष मार्गदर्शनपर चर्चासत्र पार पडेल.

सहभागासाठी संयोजकांचे आवाहन

पारंपरिक शेतीला व्यावसायिक जोड देऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आणि तरुणांसाठी हे प्रदर्शन एक मैलाचा दगड ठरणार आहे. या परिषदेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले असून अधिक माहितीसाठी डॉ. नंदकुमार कुंभार (९०४९७२२६६२) आणि पाटलोबा पाटील (९६६५०४९५६३) यांच्याशी संपर्क साधता येईल.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *