मुख्यमंत्री सातारा जिल्ह्यात.
आपल्या गावी जंगी स्वागत
मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)
माणसाला ओढ असते ती आपल्या घराची, आपल्या गावाची. मग तो मनुष्य किती का! मोठ्या पदावर पोहचून दे.
महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून दोन दिवसीय आपल्या गावच्या सातारा जिल्हा दाैऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कर्मभूमी ठाणे.स्वर्गिय आनंद दिघेंचे ते विश्वासू साथीदार. बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक. युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांच्या जन आशिर्वाद यात्रेत सुध्दा एकनाथ शिंदे सतत त्यांच्या बरोबर दौर्यावर होते. महाराष्ट्रातील उध्दव साहेब ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते.आपली घुसमट होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या बरोबर जास्त वेळ राहणे न पटल्याने बंडखोरी केली. व थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.
मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या मूळगावी दरे (ता. महाबळेश्वर) येथे आज गुरूवारी दि. 11 आँगस्ट रोजी दुपारी रक्षाबंधन सणादिवशी येत आहेत. त्यामुळे दरे गावी उत्साहाचे वातावरण आहे. गावकऱ्यांकडून त्याच्या स्वागताची तयारी असून आजचा मुख्यमंत्री आपल्या गावच्या घरीच मुक्कामी असणार आहे.
सातारा जिल्ह्याचे चाैथे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे एकनाथ शिंदे मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर मूळगावी येत आहेत. त्यामुळे त्याच्या निवासस्थानी जिल्ह्यातील अनेकजण भेटीसाठी येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर चोख पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात येत आहे.
सहाजिकच गावकऱ्यांकडून त्याच्या स्वागताची तयारी असून आजचा मुख्यमंत्री आपल्या गावच्या घरीच मुक्कामी असणार आहे.
मुख्यमंत्री आज दुपारी 12 वाजता मुंबईतून मोटारीने साताऱ्याकडे निघतील ते आपल्या दरे या गावी जातील. सायंकाळी 7 वाजता मुक्कामास गावी जाणार असल्याने त्याचे अनेक ठिकाणी भेटी- गाठी असण्याची शक्यता आहे. उद्या शुक्रवारी दि. 12 आॅगस्ट रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत मुख्यमंत्री आपल्या गावातील निवासस्थानी असतील. तदनंतर ते मुंबईकडे रवाना होतील. सायंकाळी 7.30 वाजता मुंबईतील मलबार हिल येथील नंदनवन या शासकीय निवासस्थानी जातील.
पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्याची शक्यता आहे. हे पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार आहे. अधिवेशनाच्या नंतर दुसरा मंत्रीमंडळ विस्तार होणार आहे. या पाश्र्वभूमीवर अनेक उत्सुक आमदार सातारा दौर्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर वावरण्याची शक्यता आहे असे सुत्रांनी सांगितले.