गुरूवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी रत्नागिरी जिल्हा परीषद कार्यालय समोर आशा व गट प्रवर्तक महिलांचे जोरदार आंदोलन

गुरूवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी रत्नागिरी जिल्हा परीषद कार्यालय समोर आशा व गट प्रवर्तक महिलांचे जोरदार आंदोलन

गुरूवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी रत्नागिरी जिल्हा परीषद कार्यालय समोर आशा व गट प्रवर्तक महिलांचे जोरदार आंदोलन1.
रत्नागिरी जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तक महिलांनी सर्व मागण्यांचे निवेदन रत्नागिरी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर आटले यांना देऊन चर्चा केली. चर्चेमध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या अध्यक्ष विजया शिंदे यांनी सांगितले की.माझी रत्नागिरी माझी जबाबदारी याबद्दलचे काम आशांच्याकडून करून घेतलेले आहे परंतु काम करणाऱ्या आशांना मोबदला देण्याबाबत मात्र प्रशासन विसरले आहे. ते ताबडतोब मिळण्याची त्यांनी मागणी केली. संघटनेच्या उपाध्यक्ष पल्लवी पारकर यांनी सांगितले की, जिल्हा परिषदेमार्फत असा आदेश सर्व ग्रामपंचायत केलेला आहे की. कोविद काळामध्ये आशा व गटप्रवर्तक महिलांनी केलेल्या कामाबद्दल दरमहा एक हजार रुपये अशांना ग्रामपंचायतीमार्फत देण्यात यावेत. परंतु ग्रामपंचायतीनी दरमहा एक हजार रुपये भत्ता देण्यास तयार नाहीत.याबाबत जिल्हा परिषद जिल्हा परिषद मुख्याधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी चर्चा करून याबाबतचे निर्णय कळविण्यात येतील असे त्यांनी शिष्टमंडळास.
रत्नागिरी जिल्हा आयटकाच्या संघटनेचे जनरल सेक्रेटरी विद्या भालकर यांनी मागणी केली की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस आशा पेशंट जिल्हा रुग्णालयामध्ये घेऊन गेल्यानंतर शासनाचा निर्णय असूनही त्यांना थांबण्याची व्यवस्था केली जात नाही. त्याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी लेखी सूचना संबंधित रुग्णालयाला काढण्यात येतील असे सांगितले. तसेच जून 2022 पर्यंत आशा व गटप्रवर्तक यांनी केलेल्या कामाचा मोबदला ज्यांना मिळालेला नसेल त्यांनी कळवावे असेही त्यांनी सांगितले. गट प्रवर्तक वेदिका गडदे यांनी सांगितले की. गणेश उत्सवाच्या निमित्ताने चाकर्मणी कोकणात येतात त्यांची तपासणी करण्यासाठी अशा महिलांना सहा तास ड्युटी लावलेली आहे. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर आटले यांनी सांगितले की हे अत्यंत चूक असून असे आदेश काढणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी फोन करून असे करू नये असे सांगितले. त्यामुळे चाकणमनी बद्दल कसलेही काम आशाने करू नये असेही सांगितले.
चर्चेमध्ये निवेदन देत असताना आशा संघटनेचे राज्य नेते कॉ शंकर पुजारी यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाकडे हे निवेदन पाठवून देऊन संघटनेच्या मागण्या कळवावेत. त्यातील प्रमुख मागण्या महाराष्ट्रातील सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा. जोपर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळत नाही तोपर्यंत दरमहा 25 हजार रुपये किमान वेतन मिळाले पाहिजे. दिवाळीपूर्वी सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांना भाऊबीज म्हणून तीन हजार रुपये मिळाले पाहिजेत. आशा महिलांना ज्या कामाचा मोबदला दिला जात नाही त्याची सक्ती करता कामा नये. सक्ती करणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करावी. आरोग्यवर्धिनी कामकाजासाठी सीएचओ नेमले नसल्यास त्या ठिकाणच्या जिल्ह्यातील निम्म्या आशांना एक हजार रुपये काम करूनही मिळत नाहीत.
आशा महिलांना जो वेगवेगळ्या कामाचा मोबदला दिला जातो त्याबाबतची माहिती प्रत्येक आशांना मिळणे आवश्यक आहे. कारण बँक पासबुक वरून कोणत्या कामासाठी कोणती रक्कम जमा केलेली आहे याचा उल्लेख नसतो याबाबत ही कारवाई करण्यात येईल असे सांगितले
ज्या आशा महिला आरोग्य वर्धिनीचे काम करतात त्यांना आरोग्य वर्धिनीची रक्कम मिळणे आवश्यक आहे याबाबत जेथे सी एच ओ ची नेमणूक झालेल्या नाहीत त्या नेमणूका त्वरित करण्याबाबत राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडे कळविण्यात येईल असे त्यांनी चर्चेमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी श्री डॉक्टर आटले यांनी आश्वासन दिले.
सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांना स्कुटी व अँड्रॉइड मोबाईल मिळाला पाहिजे.आशा व गटप्रोधक महिलांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळाला पाहिजे. असा दर्जा मिळेपर्यंत दरमहा 25 हजार रुपये किमान वेतन मिळाले पाहिजे. या मागण्यांचे निवेदन राज्य शासनाकडे पाठवून देण्यात येईल असे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आश्वासन दिले.
यानंतर झालेल्या आंदोलक आशांच्या सभेमध्ये कॉ शंकर पुजारी यांनी सांगितले की,सध्याचे वर्ष अमृत महोत्सवी स्वातंत्र्य वर्ष म्हणून साजरा केला जात आहे .अशा वेळेस मागील सतरा वर्षापासून महाराष्ट्रामध्ये 60000 व देशातील दहा लाख आशा व गटप्रवर्तक महिला सलग पणे दररोज आठ तासापेक्षा जास्त वेळ काम करीत आहेत. परंतु त्यांना शासनाने अजूनही कायम कर्मचाऱ्यांचा दर्जा दिलेला नाही.
विशेषतः महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य खात्यामध्ये 29 हजार पदे रिक्त आहेत. म्हणूनच आशा व गटप्रवर्तक महिलांना नोकरीत कायम केले पाहिजे.जिल्ह्यातील सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांनी आपली संघटना मजबूत केली पाहिजे. त्याशिवाय आपले कुठलेच हक्क आपल्याला मिळवून घेता येणार नाहीत. म्हणून या पुढील आंदोलनाची त्यांनी तयारी करावी असे त्यांनी आवाहन केले.
या आंदोलनाचे नेतृत्व विजया शिंदे, विद्या भालकर, पल्लवी पारकर, सुरभी भोसले ,वेदिका गडचे, जयश्री साठे, मनीषा जाधव, रेश्मा खेडेकर, पूजा जाधव, संजीवनी तीवरेकर, अश्विनी शेलार, तनुजा कांबळे, सोनाली बाईक, श्वेता चव्हाण व वृषाली जाधव इत्यादींनी केले.

शारदा खानोलकर, अनुष्का गुराम,प्रतिभा ठुंबरे , मोनिका डॉनटस, वैशाली परब, जोती फल्ले, पूजा परब, मृण्यमाई धोलाम इत्यादींनी केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *