भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्ष साजरा करताना हर घर संविधान ही एक अभूतपूर्व संकल्पना माणगाव ग्रामपंचायत ता . हातकणंगले यांच्या वतीने साकारण्यात आली. देशाच्या इतिहासात नोंद व्हावी असा हा अभिनव उपक्रम माणगाव गावचे सरपंच युवा नेते मा राजू मगदूम व त्यांच्या सहकार्यानी राबविले हे अत्यंत कौतुकास्पद आहे . इथून पूढच्या काळातही त्यांच्याकडून समाजाच्या हिताची असंख्य कामे होवोत . यासाठी राष्ट्रीय लोकजनशक्ती पार्टी कोल्हापूर जिल्हा व राजगृह फोंडेशन कबनूर यांचे वतीने अभिनंदन व सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
यावेळी मा सुभाष शिंगे ( महा. उपप्रमुख ) मा प्रल्हाद सावंत ( संपर्कप्रमुख कोल्हापूर जिल्हा ) मा विकास आंबेकर ( अध्यक्ष राजगृह फौंडेशन कबनूर ) मा राजू कांबळे ( सामाजिक कार्यकर्ते रुई ) मा अमिन मुल्ला ( सदस्य को.जिल्हा ) अरुण कांबळे , शिरीष कांबळे , नयन सावंत , शकील सनदी , रोहित वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते
Posted inकोल्हापूर
हर घर संविधान अभियान राबवल्याबद्दल माणगाव गावचे सरपंच युवा नेते मा राजू मगदूम यांचा सत्कार
