संगांयो लाभार्थ्यांना मंगळवारी मंजूरपत्राचे
व पोस्टामार्फत पेन्शनचे वाटप
इचलकरंजी/प्रतिनिधी –
संजय गांधी योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मंजूरीपत्राचे वाटप तसेच पोस्टात खाते उघडलेल्या लाभार्थ्यांना पेन्शन वाटप कार्यक्रम मंगळवार 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता येथील श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे.
इचलकरंजी शहर शाखेअंतर्गत संजय गांधी योजना, श्रावणबाळ योजना व इंदिरा गांधी विधवा व वृध्दापकाळ योजनेतील 28 फेब्रुवारी व 31 मार्च 2022 मध्ये झालेल्या मिटींगमधील पात्र लाभार्थ्याना मंजूरी पत्राचे वाटप आणि 30 जून 2020 आणि 4 फेब्रुवारी व 12 जुलै 2021 मधील मंजूर लाभार्थी ज्याचे पोस्टात खाते उघडलेले आहे अशा 2560 लाभार्थ्यांना पेन्शनचे वाटप असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
आमदार प्रकाश आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार्या या कार्यक्रमास संबंधित सर्व लाभार्थ्यांनी मंगळवारी सकाळी 10 वाजता श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृह येथे येवून मंजूरीचे पत्र व पेन्शनसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन संजय गांधी योजना कार्यालयाचे प्र. नायब तहसिलदार अमित डोंगरे यांनी केले आहे.
Posted inकोल्हापूर
संगांयो लाभार्थ्यांना मंगळवारी मंजूरपत्राचेव पोस्टामार्फत पेन्शनचे वाटप
