एक्साईज कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाकडुन २,०४,९३५ किंमतीचा गोवा बनावटीचा मद्य साठा जप्त
कोल्हापूर दि. २८ (प्रतिनीधी)
राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य आयुक्त कांतिलाल उमाप, संचालक सुनिल चव्हाण (दक्षता व अंमलबजावणी), राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई व विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर,बी. एच.तडवी यांचे आदेशान्वये तसेच कोल्हापूर जिल्हा अधीक्षक रविंद्र आवळे व उपअधीक्षक राजाराम खोत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा भरारी पथक, कोल्हापूर या पथकाने गांधीनगर, ता. करवीर हद्दीत स्वामी शांती प्रकाश कॉलनी, वळीवडे-गांधीनगर रोड जवळ, राहत्या घराच्या बाजूस एका पत्र्याच्या शेडमध्ये छापा घालून बेकायदा गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्र प्रतिबंधित विदेशी मद्याचा साठा जप्त करण्यात आला. सदर आरोपी इसमाचे नाव व पत्ता विचारला असता त्यांने आपले नाव विजय महादेव माने, व. व. ४३, रा. स्वामी शांती प्रकाश कॉलनी, गांधीनगर, ता. करवीर, जि. कोल्हापूर असे सांगितले.
सदर आरोपीत इसमाच्या राहत्या घराच्या बाजूस असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवा बनावटीचे विदेशी मदयाने भरलेले १८० मिली व ७५० मिलीचे विविध ब्रँडचे २८ बॉक्स इतके मद्य मिळुन आले असुन निव्वळ मदयाची किंमत २,०४,९३५ इतकी आहे. सदर आरोपीत इसम हा सराईत गुन्हेगार असुन त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्हयांमध्ये गुन्हयांच्या ठिकाणी मिळुन आलेल्या आरोपी व्यतिरिक्त त्याच्या इतर साथीदाराचा सहभाग आहे का याबाबतचा तपास सुरू आहे. आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असुन त्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे पथक प्रमुख निरीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले.
सदर कारवाईत कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाचे निरीक्षक पी. आर. पाटील, हातकणंगले विभागाचे निरीक्षक एस. एस. बरगे, दुय्यम निरीक्षक विजय नाईक, गिरीशकुमार कर्चे, बबन पाटील, जवान सचिन काळेल, मारुती पोवार, राजेंद्र कोळी, जय शिनगारे यांनी सहभाग घेतला.
सदर गुन्हयाचा पुढील तपास चालूआहे असे निरीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले.