दिवंगत सुवर्णा बाळासाहेब साळवी यांच्या स्मृतिदिनानिमित्त वृक्षारोपण व भोजन दान संपन्न
कोल्हापूर, प्रतिनिधी दिवंगत सुवर्णा उर्फ सुनिता बाळासाहेब साळवी यांच्या स्मृतिदिनानिमित्त सीपीआर चौकातील कोल्हापूर थाळी येथे गरजूंना ज्येष्ठ विधीज्ञ अँडव्होकेट दत्ताजीराव कवाळे व कोल्हापूर थाळीचे संकल्पक उदय प्रभावळे यांच्या हस्ते भोजन वाटप करण्यात आले.
अन्नधान्य वितरण अधिकारी डी.एम सणगर व जिल्हा परिषदेचे कक्ष अधिकारी संजय अवघडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी
क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय साळवे
परिवर्तनचे अमोल कुरणे,
ट्रॅफिकच्या हेमा पाटील, लहुजी प्रतिष्ठानचे शहराध्यक्ष राहुल गणेशाचार्य, विनोद जगताप, अशोक जगताप, प्रथमेश मोरे, रवी चांदणे, राज कुरणे आदी उपस्थित होते