जो रडतो त्यांच्यासाठी नकोच तो आमच्यासाठी
✍️नवनाथ दत्तात्रय रेपे
भट बोकड मोठा या पुस्तकाचे लेखक
मो. ९७६२६३६६६२
ब्राम्हणी मेंदूतून निघालेल्या नरक नदीतून अनेक काल्पनीक कथांची उत्पत्ती झाली ?त्यांनी त्याचा बनाव करून त्याला आपल्या उपजिविकेच साधन व बहुजनांच्या लुटीच साधन बनवल हे वेळोवेळी सिध्द झालं आहे. कारण जागृत देवस्थान हे नाव देऊन त्यांनी अनेक देव देवळांची निर्मीती करून बहुजन समाजाचे खिस्से कापले पण ज्यांचे खिसे कापले त्यांना मुळीच त्याची जाणीव होत नाही, हे जागृतीच लक्षण नव्हे हेच आमच्या बहुजन समाजाला कळत नाही हीच खुप मोठी शोकांतिका आहे. जसा पंक्चर काढणारा व्यक्ती कारमध्ये हवा भरतो तसे हे भट मंत्रोच्चार करून दगडी मुर्तीत प्राणप्रतिष्ठेच्या नावाखाली प्राण भरतो म्हणे. ज्यांच्यात प्राण भरला त्यांच्या समोर महीला मुली नागवल्या नासवल्या जातात तेव्हा ह्या मुर्त्या रडताना किंवा डोळ्यातून पाणी काढताना दिसल्या का ?पण काल परवा म्हणे सोलापुरात बप्पा रडला. जो आमच्यासाठी रडत नाही त्याच्या देव्हा-यासाठी आम्ही आमचे का मस्तक द्यावे ?जो सावधान म्हणताच लग्न मंडपातून पसार झाला, ज्याच्या मंदीरातून मुर्त्या चोरीला जातात त्याच्यात कसला समर्थपणा आहे ?यापेक्षा एखादा नपुंसक बरा म्हटलं तर काय चुकीचे आहे ?आमच्यासाठी कधी न रडणारा बप्पा बहुतेक त्या असमर्थाच्या मंदीरात झालेल्या चोरीमुळे तर रडला नसेल ?कारण खोले बाईने यादव या मराठा महीलेच्या हाताने बनवलेला नैवेद्य नाकारला होता. तेव्हा जर हा बप्पा रडला असता तर आम्हाला काहीतरी खरं वाटलं असतं. त्यामुळे म्हणावं वाटतं की, जो रडतो त्यांच्यासाठी तो काय घंटा करेल आमच्यासाठी ?
घनसावंगी तालुक्यातील जांब हे रामदास ठोसर यांचे जन्मगाव आहे. येथील मंदिरात इ.स. १५३५ मधील श्रीराम, सीतामाता, लक्ष्मण व हनुमान यांच्या पंचधातूच्या सहा मूर्त्या होत्या. तसेच रामदास ठोसर भिक्षा मागत असताना भिक्षापात्रात ठेवली जाणारी व हाताच्या दंडावर बांधली जाणारी हनुमानाची मूर्तीही या मंदिरात होती. चोरट्यांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास या श्रीराम मंदिरातून श्रीराम, सीतामाता, लक्ष्मण, हनुमानाच्या दोन मूर्तींसह सहा पंचधातूंच्या मूर्तींची चोरी केली आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली त्यामुळे त्यांच्या भक्तांनी चोरी गेलेल्या मूर्तीचा शोध तत्काळ घेण्यात यावा अशी मागणी करत ग्रामस्थांनी मंदिर परिसरात आज सकाळपासून एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. (लोकमत २४ आॅगस्ट २२) ज्याच्या मंदीरातून चोरी झाली तेव्हा तो नेमका करत होता तरी का ?जो स्वतः घरी चोरी होत असताना केवळ बघ्याची भूमिका घेतो त्याला कोणी नपुंसक, हिजडा म्हटलं तर त्याच काय चुकीचे आहे ? जांब गावात तर म्हणे समर्थ ?रामदास याने जन्म घेतला मग तिथेच जर चोरीचा प्रकार घडत असेल तर कुंपणच खातय शेत म्हटलं तर काय चुकीचे आहे ?जो लग्नाच्या मंडपातून पसार होतो त्यात कसला समर्थपणा आहे ?याचा विचार भक्त कधी करणार आहेत ?कधीच कुठे एक दिवसही संसार न थाटलेला व्यक्ती संसार करावा नेटका हा उपदेश कशाच्या आधारावर देतो ?यांना संसारातल काहीच माहीत नव्हतं मात्र आक्का वेणूच्या वाळत घातलेल्या साड्या अंगाला गुंडाळून गल्ली धुंडाळायच तेवढ मात्र नक्की माहीत असेल ?ज्यांच्यात शुन्य मात्र समर्थ पणाच लक्षण नाही त्या असमर्थ व्यक्तीला जर आपण समर्थ समर्थ म्हणून डोक्यावर घेत असू तर हे मुर्खपणाचे लक्षण आहे. त्यामुळे बहुजन समाजातील लोकांनी वेळीच सावध होऊन प्रा. मा.म. देशमुख लिखित रामदास आणि पेशवाई हे पुस्तक वाचावे. कारण याच पुस्तकातून बनावट समर्थपणा दाखवणा-या रामदासांचे वस्त्रहरण करून विना पोपटाचा समर्थ दाखवला आहे. दास विश्रामधाम मध्ये लिहल आहे की, मांसान्नाची समर्थांनी गुलाबाची फुले केली होती. (अत्रेंचा ढाल तलवार मधील लेख) मग प्रश्न पडतो की, मांसाचे गुलाब फुल करण्याचा चमत्कार जर रामदास ठोसर यांच्याकडे होता तर मग त्यांच्या चोरी गेलेल्या मुर्ती रामदास भक्तांकडे असलेल्या एखाद्या चमत्काराने शोधता येत नाहीत का ?म्हणजे असमर्थाचे भक्तही असमर्थच आहेत का ?
चोरी गेलेल्या मूर्तींचा अद्यापही शोध लागला नाही. सोमवारी रात्री समर्थ रामदास स्वामी यांचे अकरावे वंशज भूषण स्वामी ठोसर यांनी मंदिरात श्रीरामांची प्रतिमा ठेवून मंदिर दर्शनासाठी खुले केले. मूर्तींची चोरी करणाऱ्या चोरट्यांचा शोध लावण्यासाठी सहा पथके तैनात करण्यात आली. मंगळवारी अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनी घटनास्थळाला भेट दिली. दरम्यान, सोमवारी पहाटेच्या सुमारास एक कार गावाच्या परिसरात फिरत होती. त्याची चौकशी केली असता, त्यात उस्मानाबाद येथील काही लोक असल्याचे पोलिसांना समजले. (लोकमत २४ आॅगस्ट २२) जोपर्यंत चोरट्यांचा शोध लागत नाही तोपर्यंत मंदीर बंद ठेवण्याचा निर्णय जर रामदास ठोसर यांचे अकरावे वंशज भूषण ठोसर यांनी घेतला असता तर योग्य ठरला नसता का ?पण मंदीर बंद केलं तर मंदीराच्या दानपेटीत पडणारा मलिदा बंद होऊ नये त्यामुळे तर मंदीर खुले केले नसेल ?मुर्ती चोरणाऱ्या चोरट्यांच्या शोधासाठी जी सहा पथके तैनात करण्यात आली त्यांच्यात जेवढा समर्थपणा आहे तेवढा रामदास ठोसर मध्ये नसेल तर काय म्हणून समर्थ नावाचा दिंडोरा पिटत आहेत ?म्हणून तर विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
देव चोरी जातो नवल केवढे ! तक्रार ही पडे पोलिसात ॥१॥
त्याला शोधणारे श्वान बुध्दीमान !काय देवपण देवाजीचे ॥२॥
सांगा ऐसा देव पावेल कोणाला।त्याची गांड त्याला उचलेना ॥३॥
म्हणे विश्वंभर ऐसा कैसा देव। जसे की गाढव चोरी जावे ॥४॥
तेलंगणातील भद्रकाली देवीच्या मंदिरात अभिषेकावेळी देवी डोळे बंद करते, असा दावा केला जातो. व्हिडिओ पाहून तुम्हालाही हे खरं वाटेल पण मुळात हा तुमचा भास आहे. या भद्रकाली देवीची मुर्तीच अशाप्रकारे बनवली आहे की जेव्हा देवीच्या या मुर्तीवर हळदीचा अभिषेक केला जातो तेव्हा देवीने डोळे बंद केल्याचा भास होतो. सोशल मीडियावर व्हिडिओला पाहून यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. काहींच्या मते ही अंद्धश्रद्धा आहे तर काहींना हा चमत्कार वाटतो. सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरलाय. (सकाळ २४ आॅगस्ट २२) सदरील व्हिडिओ पाहीला असता त्यात स्पष्ट दिसते की, जेव्हा देवीला हाळदीचा अभिषेक केला जातो तेव्हा देवीचे डोळे हळदीच्या पिवळसर रंगाने दिसत नाहीत पण नंतर जसजसे ते हळदीचे पाणी निघून जाते तेव्हा देवीने डोळा उघडल्याचा भास होतो. पण हा चमत्कार त्यांनाच वाटतो ज्यांना दगडात देव दिसतो. कारण यांची मती खुंटली आहे त्यामुळे त्यांना साप, विंचू, डुक्कर, कुत्रा यांच्यात देव तर गायीत माता दिसते ?अशा मनोरुग्णांना दवाखान्याची गरज आहे. मंदीरात बलात्कार होतो त्यावेळी देव डोळे बंद करून घेतात कारण त्यांच्यात बलात्कार करणाराला सजा किंवा धडा शिकविण्याची धमक नसावी ?देवी व देवीच्या हाती असलेली शस्त्रे केवळ एक फुसका बार आहेत ?कारण अनेक मंदीरात अनेक पुजारी महीलांना नको त्या ठिकाणी स्पर्श करतात पण तेव्हा मुर्ती सर्व काही उघड्या डोळ्यांनी पाहते. त्यामुळे मुर्तींने डोळे झाकले अथवा उघडले तर त्याचा आम्हा बहुजनांना काय फायदा आहे ?.
पशुचे मुंडके मेंदु ही पशुचा।
गणेश बुध्दीचा देव कैसा॥१॥
त्याला पूजताना मला येते हसू।
आहे नरपशु गणपती॥२॥
वरील शब्द हे विद्रोही कवी विश्वंभर वराट यांचे असून ते एकदम बरोबर आहेत. पण अंधश्रद्धाळू लोकांचा मेळा जमला की, त्यांच्या बुद्धीचा गोळा करून त्याच विसर्जन सहज करता येत. ते यापुर्वी अनेक राजकीय पुढाऱ्यांनी केलं आहे. कारण त्यांच्या हाताने एकदा गणपती दूध पिला होता. तसेच मागे काही दिवसांपूर्वी देवळातील नंदीने दूध प्राशन केले होते. तसेच हनुमानाने प्रसाद खाल्ला होता हे जून होत न होते तोच काल परवा म्हणे देवीला अभिषेक करताना देवीने डोळे बंद केले अशा बातम्या येत आहेत. याला वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहील्यास हे शंभर टक्के थोतांड आहे हे स्पष्ट होते. पण हे थोतांड त्यांनाच कळत ज्यांच्या डोक्यात मेंदू शिल्लक आहे. ज्यांच्या डोक्यात केवळ गोबर गोमुत्राचा भरणा आहे त्यांना तर गायी मध्येही तेहतीस कोटींचा भरणा दिसतो हे नवल नाही. कारण तो त्यांच्या दुष्टी व बुध्दीचा अभाव असल्याचे लक्षण आहे. त्यामुळे तर असे नवनवीन थोतांड घडते किंवा घडवल्या जाते. परंतु आता तर गणपती बाप्पा रडत असल्याचं सांगितलं जात आहे. गणपती मंदिरात बाप्पा रडतोय अशी बातमी प्रसारित होतेय. सोलापुर मधील कुंभारी रोडवरील गणपती मंदिरात अचानक भाविकांची गर्दी का वाढली, असा प्रश्न अनेकांना पडला. याचा शोध घेतल्यानंतर देऊळातील गणपती रडत असल्याची माहिती एका भक्ताने दिली. याच कारणामुळे मंदिरात गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी भाविक गणपतीच्या डोळ्यातील पाणी पाहण्यासाठी उत्सुकतेपोटी त्यांनी मंदिरात गर्दी केली. ही अफवा बघता बघता आजूबाजूच्या गावात पसरली. माहिती मिळताच भाविकांचा ओघ दर्शनासाठी मंदिराकडे वाढला. भाविकांनी लगेच दर्शनासाठी गर्दी करून हार, श्रीफळ अर्पण केले. (सकाळ २४ आॅगस्ट २२) गणपतीचे अश्रू बघण्यासाठी गर्दी करणा-या लोकांना जर बुद्धी असती तर त्यांनी गर्दीच केली नसती. कारण दगड किंवा सिमेंट रेती पासून बनवलेली मुर्ती ही निर्जीव असून निर्जीव वस्तूंला भावना नसतात. त्यामुळे मुर्ती रडते असं म्हणणे हे शुध्द वेडगळपणाचे लक्षण आहे. बर मुर्ती रडली तर त्याचा जनसामान्यांच्या जीवनावर काय परिणाम होणार आहे ?गणपती मुर्ती जर वाढती महागाई, बेरोजगारी, महीलावर होणारे अत्याचार पाहून रडत असेल तर ते आमच्या हिताचं आहे. पण लाखोंच्या संख्येने मरणारा शेतकरी, सिमेवर मरणारे जवान, दिवसा ढवळ्या नागवल्या व नासवल्या जाणा-या मुली पाहून जो गणपती कधीच रडला नाही. तो आज कोणासाठी अश्रू ढाळत आहे ?जो आमच्यावर आलेल्या दु:खासाठी रडत नाही तो आमचा आदर्श कसा ?याचा विचार बहुजन समाज कधी करणार आहे ? त्यामुळे येथिल भाविकांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आवाहन करताना म्हटले की, गणपतीच्या डोळ्यातून अश्रू वाहत असल्याची ही अफवा असून या मागचे शास्त्रीय कारण काय त्याचा शोध घेतल्यानंतर नेमका प्रकार निदर्शनास येईल असे सांगितल्यावरही दर्शनासाठी नागरिक आणि भक्त गर्दी करत असल्याचे दिसून येत होते. म्हणून तर विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
बसणा-यापेक्षा वाहन बारीक
हा एक अजब मसला
प्रामाणिक म्हणावा उंदीर
बोळाता नाही घुसला !.
मुर्तीने उघडलेला डोळा व गणपतीने रडताना काढलेले अश्रू पाहण्यासाठी गर्दी करणारे, देवाच्या चमत्काराला नमस्कार करणारे चोरट्यांना अटक करा म्हणून आंदोलन करणारे हे सर्व भक्त मनोरुग्ण नाहीतर कोण आहेत ?यांच्या अंदोलनाची दिशा चुकली आहे. हे भक्तांना माहीत नाही त्यांनी ही आंदोलनाची शक्ती प्रा. मा.म. देशमुख म्हणतात तिथे जर खर्ची केली तर ती त्यांच्या हिताची आहे कारण ते म्हणतात की, सर्व जातीय बहुजन समाज भट मुक्त आणि सुखी करण्यासाठी बालक मंदिरांपासून पदवीपर्यंतच्या अभ्यासक्रमातील घटनाविरोधी, चातुवर्ण्य समर्थक, उच्च नीचवादी पुस्तकावर बंदी घालावी. सर्व वंदनीय फुले शाहु आंबेडकर पंजाबराव ह्यांच्या विचारांची पुस्तके नेमावित. सर्व जातीतील बहूजन समाजातील मुला मुलींना इंग्रजीतून अद्ययावत आणि विज्ञाननिष्ठ मोफत शिक्षण आणि शिष्यवृत्ती द्यावी. त्यासाठी पैसा कमी पडू नये म्हणून हिंदू मंदिरातील संपत्ती जप्त करावी. (कारण, ती त्यांचीच आहे) आता सर्व जातीय बहुजनांनी जास्तीत जास्त गोरगरीब बहुजनांना फायदा होईल ‘असे मोर्चे’ काढण्यात आपली शक्ती खर्च करावी. कारण पुरोगामी सिंह पाहीजेत, आंधळी मेंढरे नकोत. म्हणून तर विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
उत्क्रांत होऊन माणूस
जाऊ लागला चंद्रावर
तरी आमचे गणपती बाप्पा
बसून राहिले उंदरावर !
नवनाथ रेपे लिखित भट बोकड मोठा हे पुस्तक घरपोहोच मिळेल
संपर्क – रुक्माई प्रकाशन, अंजनडोह (बीड)
मो. ९७६२६३६६६२