अर्जल आम्ही शूद्र आम्ही
स्नेह नको सन्मान हवा

अर्जल आम्ही शूद्र आम्ही<br>स्नेह नको सन्मान हवा

अर्जल आम्ही शूद्र आम्ही
स्नेह नको सन्मान हवा
समाज वर्तन ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे समाजात असंख्य प्रकारचे आग्रह असतात या आग्रहाच्या आधारे समाज आपुलकी स्नेह सन्मान राग क्रोध बाळगून पुढे जात असतो वाटचाल करीत असतो
समाजातील स्नेह सन्मान राग क्रोध हे गुण आणि दुर्गुण हे सोबत घेऊन व्यक्तींचे जगणे चालू असते व्यक्तीचा स्नेह हा सहकार्य आदर अनुभव आणि माया याच्या आधारे वाढत राहतो स्नेह यामध्ये नाते असते बहुतेक वेळा स्नेहा मध्ये नातेही नसते पण स्नेह हा आदर आपुलकी यांनी व्यक्त होतं सहकार्याची भावना सतत इतरांच्या प्रति दाखवलेली आपुलकी ही स्नेहाचीच नाती दृढ करतात आपुलकी ही बांधिलकी असते आपुलकी हा आपलेपणा असतो आपले लोक त्यांची सुखदुःखे ही आपली असतात आपलेपणा ही खूप जवळची गोष्ट असते त्यात नैसर्गिकता असते त्यात दिखाऊपणा कमी असतो आपुलकीला नैसर्गिक नाती असतात पण त्याहून आपुलकी ही विचार अनुबंध जोडले जातात नात्याच्या निष्ठा तयार होतात त्यातूनही आपुलकीचा अनुबंध हा दृढ करता येतो दृढ होत राहतो आपुलकी मध्ये विचाराची निष्ठा विचाराची बांधिलकी विचाराचे सहजीवन असते
स्नेह आणि आपुलकी स्नेह आणि सन्मान स्नेह आणि आदर ही व्यक्ती आणि समाजाची निरंतर आत्मसन्मानाची भूक असते स्नेह मिळतो मदतीच्या कामामुळे ज्यांना मदत केलेली असते ते स्नेह दाखवतात स्नेही कृतज्ञतेची गोष्ट असते स्नेह हा गृहीत असतो
आपल्याला समाज आपले नातेवाईक आपले परिचित आपले मित्र स्नेह दाखवतात ही चांगलीच गोष्ट असते हे व्यक्तीला कळते स्नेही सन्मानाच्या पूर्वीची गोष्ट असते स्नेह हा एक खात्रीशीर नात्यांचा व्यवहार असतो कोणतेही वर्तन करताना स्नेहाची प्रारंभिकता आवश्यक असते स्नेहामध्ये नात्याच्या प्रती व्यक्तीच्या प्रति एक सदविचार असतो एक खात्री असते विश्वासार्थ असते म्हणून स्नेह ही समाजाला हवी असलेली मायेची भूक व दाखवण्याची कृती साकारण्याचे वर्तन असते तसे वर्तनुक प्रत्येकाने करायलाच हवे, माणूस हा समाजशील प्राणी आहे समाजशील ते मध्ये स्नेह हाच एक समाज सामर्थ्याचा सामर्थ्य ठेवा असतो म्हणून स्नेह दाखवणे स्नेहाने वर्तन करणे ही मानवी सभ्यता व्यक्तीच्या अंगी आलीच पाहिजे स्नेहाला नाती जात धर्म चिकटवणारे लोक हे प्रामाणिक असतात पण त्याहून जास्त ते स्वार्थी असतात स्नेहाची वर्तुळे ही एक स्वार्थाची बंदिस्तता असते स्नेहाची वर्तुळे सुरक्षिततेची काळजी असते स्नेहाला स्वीकाराच्या दृष्टीची गरज असते सन्मानाचे शब्दआदरवाचक उल्लेख ही स्नेह वाढवणारी चतुर संभाषणाची सभ्यतेची गुणवैशिष्ट्ये असतात परंतु स्वार्थ प्रेरित स्नेह जात प्रेरित स्नेह धर्मप्रेरित स्नेहभाव हा बंधुभाव वाढवत नाही म्हणून समाज जीवनातील सर्व बांधवांच्या प्रति स्नेहभावाचे वर्तन ही माझी आनंद कृती आहे त्या आनंद भवन आहे असे मला बुद्धीच्या पातळीवर कळायला हवे हे कळले तरच स्नेहाच्या वर्तनाची प्रथम सुरुवात अशा विचार करणाऱ्या व्यक्तींनी समूहाकडून होऊ शकते आज ती होण्याची नितांत गरज आहे
भारतामध्ये हिंदू आणि मुस्लिम हे जनसमूह स्नेह आणि सन्मान या पातळीवर वर्तन करतात का या प्रश्नाचा शोध घेणे हे राष्ट्रीय एकात्मतेसाठी खूप अत्यावश्यक आहे हिंदू हा धर्म नाही हिंदूही केवळ असुरक्षित भावना आहे इतरांनी इतरांना दिलेले नाव आहे तो धर्म पंथ उपासना आचरण मार्ग नाही तर ते सनातन व्यवस्थेचे विषमता मान्य असलेले व शरण जीवन जगण्यासाठी दैवाला महत्व देणारे जनसमूह अनेक धर्मात आहेत ख्रिस्ती इस्लामी बौद्ध जैन हे आहेत पण त्यापैकी सोपरीक्षणासाठी म्हणजे हिंदू जनसमूह होय हिंदू जनसमूह हे आज्ञावाचक अनुकरण व असुरक्षितता याच्या आधारे जगत असतात यामधील उतरंडी व्यवस्था ही वरच्या वर्गाने खालच्या वर्गांना स्नेह द्यावा दाखवावा सन्मान द्यावा या अधीर भावनेने प्रतीक्षेने जगत असतात ही प्रतीक्षा ही चूक आहे असेही हिंदू सनातन व्यवस्थेच्या विषमतेच्या पायऱ्यांवरील प्रत्येक जात आणि जनसमूहाला हे कळत नाही हे दुर्दैव आहे जातीला स्नेह जातीला सन्मान अशी एक विवेक व विचार शून्य वर्तन प्रक्रिया प्रत्येक जातींची आणि धर्मबांधवांची चालू असते आज यात बदल झाला नाही तर समाजामध्ये धर्माधर्मामध्ये शत्रुभाव कमी होण्याऐवजी वाढत जाण्याची दाट शक्यता आहे यासाठी

असंख्य अपघाती भेद असंख्य अपघाती जाती या जैविक घटनांना नाकारणे आणि तुच्छता श्रेष्ठत्व हे दूर ठेवून एकात्म समाजाच्या निर्मितीसाठी स्नेहाचे वर्तन स्नेहाचे नाते करीत राहण्यामध्ये एक बिरादारी विश्वासाच्या नात्यातून तयार करता येते ती भारतामध्ये आज नितांत गरजेची आहे लोक बिरा दारी युवा बिरादरी
ही एकात्म भारताची आशा आहे हाक आहे हे समजून घेण्याची गरज आहे
विषमतेच्या निर्मूलन ऐवजी आमच्या मध्ये विषमता कमीआहे तुमच्या धर्मात विषमता जादा आहे असे दाखवण्याचे निंदनीय प्रयत्न आता अनेकधर्म बांधवांच्या मध्ये सुरू झाले आहेत कोणताही धर्म अंतिम नाही कोणताही धर्म परिपूर्ण नाही प्रत्येक धर्म हा विषमता शोषण आणि श्रेष्ठत्व यावर च उभा आहे धर्म ही त्या काळाची नियंत्रणाची व्यवस्थापनाची त्यावेळी आदर्श व्यवस्था होती पण ती त्याहून समाजाच्या समूह मानसिकतेची सांस्कृतिकतेची गरज होती त्यातूनच समाज हा प्रतीके आणि प्रतिमा यांना खरे मानून जगत पुढे आहे तेव्हा या मूर्त प्रतिकांच्यामुळे धर्म व्यवस्थेतील ईश्वर वादाचे खुळ जगभर किती शतके वाढले आहे पुढे वाढत चालले आहे जे प्राचीन जे टिकते ते श्रेष्ठ आहे ते च. गौरव पूर्ण म्हणून सर्वांनी स्विकारले पाहिजे त्यातूनच स्पर्धा सुरू होते मूर्ती आणि देवळे बांधण्याची व त्याचे द्वारे शोषण करीत त्याचा हा धर्म श्रद्धा जंजाळ प्रदेश हा शतकांच्या प्रवासात ुन पुढे आला आहे आणि समाजाला भव्य दिव्य अशा मंदिर मशीद आणि चर्च यांचे मानसिक वेड आकर्षण कायम हि राहिले आहे स्व मनातील रितेपण हेच माणसाच्या श्रद्धा आणि प्रतिकांच्या गरजेचे कारण बनले आहे मानवी मन ही एक स्वयं प्रतिमा स्वयं भीती स्वयं अस्वस्थता निर्माण करणारी अकस्मात ची9 भाव अवस्था आहे याचे कारण मनाच्या श्रद्धायुक्त जगण्याला अनन्यसाधारण महत्त्व देणे हे आहे खरे तर विचाराच्या निष्ठायुक्त जीवनाला आचरणाला त्याच्या भल्या परिणामाला महत्त्व देणे व आवश्यक आहे ते स्वीकारणे महत्त्वाचे आहे आज हित हे होत नाही आणि समाज मात्र श्रद्धेच्या भीतीला श्रद्धेच्या अनामिक शांतीला कवटाळून बसत आहेत आणि त्याला तो अध्यात्मिक अनुभूतीचे नाव देतो आहे इतिहासातील पुरुषांनी अध्यात्मिक अनुभूतीचे घेतलेले अनुभव हे तो प्रमाण मानून तिथे तो शरण जातो आहे अनुभूतीची सापेक्षता आणि अनुभूतीची सत्यता ही न तपासता अध्यात्मिक अनुभूतीला शरण जाणारा समाज आणि व्यक्ती या विचाराच्या थक्क क्रांतीला रोखतात
आध्यात्मिक वाद्यांची रणनीती ही निश्चित नसते ते आत्म अनुभव आत्मचिंतन साक्षात्कार दिव्यदृष्टी भाकीत पवित्र पवित्र शुद्ध अशुद्ध यासारखे भावनिक भेद निर्माण करणारे प्रकार ते तयार करतात व हे घटक खरे आहेत असे मानण्यास भाग पाडतात विशिष्ट जात वर्ग आणि धर्माने तयार केलेल्या या भेदनीतीच्या असंख्य पद्धती आणि रीती आणि कृती हे स्वच्छतेचे घटक आहेत भेजनीती हे शोषणाचे सहज असे वर्गीकरण आहे हे श्रेष्ठ ते कनिष्ठ त्यांना सन्मान यांची उपेक्षा ते तुच्छ ते गलिच्छ अशा प्रकारच्या भेद रीतीच्या आधारे संमिश्र समाजाचे सतत वर्गीकरण मुठभर लोक करीत असतात जात ही विषमता आहे जात हे समानतेच्या विरोधी असलेले सनातन भयकर्मकांड आहे जात ही बहिष्कृत त्याची भीती आहे जात हे एकटेपणाचे काल्पनिक मरण कारण आहे जात ही अवहेल नाही वर्तमानाची ती इतरांनी दिलेली दूषणे आहेत भूषणही आहेत

म्हणून इस्लाम मध्ये मर्यादित अर्थाची नमाज वेळची समानता ही सुद्धा क्रांती आहे इतर धर्मात ईश्वराच्या जवळ जाताना प्रवेश नाकारला जातो श्रद्धा उपासना करू दिली जात नाही जगातील सर्व धर्मातील ईश्वर एक असेल तर शूद्रांचे देव वेगवेगळ्या असतात त्यांच्या उपासना त्यांच्या पूजाअर्चा पूर्णता वेगळ्या असतात याचे कारण उपासनेतील भेदनीती ही सुद्धा एकप्रकारचीदुरावा कायम ठेवण्याची रणनीती असते
अशा भेदनीतीने व्याप्त असलेल्या धर्म व्यवस्थेमध्ये रममान होऊन जगणारा समाज भेदग्रस्त राहिला पाहिजे तो तसाच टिकला पाहिजे हे गृहीत धरून धर्मभेद करणाऱ्या जाती आणि संघटना यांच्यापासून सर्व समाजाने दूर राहिला हवे भारतामध्ये इस्लाम धर्मात बद्दलत्यातील विषमतेबद्दल नव्याने कुजबुज सुरू झाली आहे कुजबूज करणाऱ्या धर्म बांधवांच्या घराला आग लागलेली आहे आणि ते मात्र इस्लाम मधील तुच्छता इस्लाम मधील जातीव्यवस्था याबद्दल नवे वाद पश्चनाद म्हणून आता तयार करीत आहेत हे कोणी उपस्थित केले आहेत उत्तर भारतामध्ये लखनऊला एकमेकाला विचारले जात आहे अरे पसनाद घेऊन आला आहे काय?

प श नाद भानगडीत नवी कुंजबूज सुरू झाले आहे की एक साई आणि तेली एक हो म्हणजेच मोठा इनामदार व छोटा इनामदार हे भेद उघड बोलले जाऊ लागले आहेत उत्तर भारतामधील इस्लाम मधील तोपची आणि बंदूकची हे दोन्हीही मुस्लिम आगळे वेगळ्या पद्धतीने एकच आहेत अशी एक नवी ठुम उठवण्यात आली आहे
यातूनच उच्च मुस्लिम जाती व दलित मुस्लिम जाती यांची भेदनीती तयार करण्यात येत आहे हिंदू मधील चातुर्वर्ण्य आणि इस्लाम मधील सय्यद शेख दलित मुस्लिम लालबिगी आणि डोम्स हे चार वर्ण नसताना तयार करण्याची कपटकृती कोण बरे तयार करते आहे

इस्लाम मध्ये कोडप गव्हर्नन्स म्हणजेच फतवे काढले जातात त्यानुसार तीन गटांच्या मध्ये मुस्लिमांचे विभाजन करण्यात आले आहे सुरुवातीचे म्हणून अझल अश्रफ अजलफ आणि अर्जल ही वर्गवारी तयार करून प शनाद तयार करून टोकाची हिंदू पद्धतीची अर्जल म्हणजे शूद्र जाती हिंदू व्यवस्थेतील रुपांतरीत जाती होय अजल्फ म्हणजे वैश्य जाती होय ज्या स्वच्छ जाती सेवा करणाऱ्या जाती होय मुळात या इस्लाम अंतर्गत शूद्र जातीच होय
भारतीय मुस्लिमांच्या मध्ये पषणाद ही जी नवीन रुजवण्यात येत आहे पसरवण्यात येत आहे त्याचा अर्थच असा आहे की इतर धर्मात विषमता आहे ती इस्लाम मध्येही आहे असे जाणीव नेणीव पातळीमध्ये रुजवून इस्लाम मधले जनमानस समतेचे नाही तर विषमताग्रस्त आहे असा प्रचार रुजवून नमाज पठणप्रसंगीची समता ही सुद्धा उदात्त उदार व सभ्यतेची गोष्ट बनू नये म्हणून संक्रमित व अनुकरणीय अशी दुर्गुणांची देवघेव प्रत्येक धर्म प्रत्येक जनसमूह एकमेकांच्या मध्ये करत आलेला आहे यासाठीच पशणा द या प्रकारच्या स्नेह नको सन्मान हवा या दिशेने सन कोणताही समाज जाऊ नये अशी व्यूह रचना धर्म मार्तंडाच्या मार्फत हिंदुत्ववादी संघटनांच्या मार्फत राजकीय पक्षांच्या व्यासपीठावरून असा कार्यक्रम सध्या लखनो आणि उत्तर भारतात बिहार येथे राबवण्यात येत आहे भारतातील हे मीही विषमतावादी तुम्हीही विषमतावादी विषमतेचे सारे आपण भेदवादी दाखवण्याचे निंदनीय निषेधार्य प्रयत्न जेव्हा सभोवताली चालू असलेले दिसून येतात तेव्हा प्रत्येक धर्म बांधवांना व्यक्तिगत श्रद्धा बाळगून जगता येणे हे जे अवकाश प्राप्त होणे आवश्यक आहे ते तयार करून देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असताना आपणच जर विषमतेच्या खोलगर्ततेत स्वतःहून जावू इच्छित असू तर सन्मान हवा स्नेह नको स्नेह म्हणजे समांतर नव्हे सन्मान म्हणजे समानतेची मान्यता होय सन्मान म्हणजे तुच्छता नि भेद हे नाकारल्याचे पुरावे आहेत सन्मान म्हणजे कर्तुत्वाची मान्यता होय एका व्यक्ती आणि जातींच्या दुर्गुणामुळे संपूर्ण समाजाने धर्म हा वाईट ठरवणे हे वाईट आहे तो विषमताग्रस्त ठरवणे हेही चूक आहे तो शोधून ठरवणे हेही चूक आहे पश शनादी व्यवस्था इतर धर्मांच्या मध्ये तयार करताना आपण सन्मान देत देत नाही कृत्रिम स्नेह दाखवतो आणि एकात्म भारताची स्वप्न पाहतो हे भारतातील नव्या पिढ्यांना लवकरात लवकर कळू लागले आहे हे सूचना आहे त्यामुळे बिरादारी जाती अंतर्गत धर्मांतर्गत न जोपासता बंधुभावाची बिरादारी सन्मानाची बिरादारी ही वर्तनातून सिद्ध करूनच भारतातील प्रत्येक जनसमूहाला पुढे जावे लागेल अन्यतः विषमतेच्या खोल चिखलात हा देश प्रत्येकांना खोल तळाशी बुडवत राहील आणि खोट्या स्नेहाच्या बंधुभावाच्या भाषेतून फसवत राहील हे होऊ द्यायचे नसेल तर धर्म आणि जातींच्या भेदापेक्षा कर्तुत्व आणि नीती आणि आचरण यांच्या सन्मानाच्या चळवळी सर्व धर्मांतर्गत एकमेकासाठी सुरू करणे हे अत्यावश्यक आहे यातूनच कटरता क्रूरता कमी होऊ शकते असा आशावाद वाटून राहतो
शिवाजी पांडुरंग प्रेस
सातारा 28 ऑगस्ट 2022 वेळ 2:50

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *