डॉक्टर द्वारकाधीश कोटणीस यांच्या 80 व्या स्मृती दिनापासून सांगलीत निवारा भवन येथे बांधकाम कामगारांचे मोफत आरोग्य तपासणी शुभारंभ.
सांगली निवारा भवन येथे घेण्यात आलेल्या मेलाव्यामध्ये सुरुवातीस डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांच्या 80 व्या स्मृतिदिनानिमित्त आयटकचे सांगली जिल्हा अध्यक्ष कॉ महादेव कांबळे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार घालून मेळाव्यास सुरुवात करण्यात आली.
सुरुवातीस कॉ शंकर पुजारी यांनी सांगितले की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये १९३१मध्ये जपानने चीनवर आक्रमण केल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे चीनच्या सरकारने मागणी केली होती की एक डॉक्टरचे पथक चीनमध्ये पाठवण्यात यावे. यानुसार डॉ द्वारकानाथ कोटणीस यांच्या नेतृत्वाखाली एक डॉक्टरांचे पथक १९३८साली चीनमध्ये पाठवण्यात आले. या पथकामध्ये डॉक्टर द्वारकाणीस कोटणीस यांच्यासह सर्व डॉक्टरनी अत्यंत परिश्रम घेऊन चीनमधील जखमी सैनिकांची सेवा केली. या सेवेमध्येच डॉ द्वारकानाथ कोटणीस यांचा 9 डिसेंबर 1942 मध्ये मृत्यू झाला.या त्यांच्या महत्वपुर्ण कार्याबद्दल चीन सरकारने डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांना महान पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे. अभिमानाची गोष्ट म्हणजे डॉ कोटणीस हे सोलापूरचे आहेत.कामगारांच्या मेळाव्यामध्ये डॉक्टर कोटणीस यांच्या कार्यावर आधारित डॉक्युमेंटरी सभागृहांमध्ये दाखविण्यात आली
मेलाव्यामध्ये बोलताना प्राध्यापिका शरयू बडवे यांनी सांगितले की, सध्या महाराष्ट्रामध्ये 15 लाखापेक्षा जास्त नोंदीत बांधकाम कामगारांचे अर्ज प्रलंबित आहेत. ते तातडीने मंजूर होणे आवश्यक आहे ..तसेच सध्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अस्तिवात नसल्यामुळे त्वरीत मंडळ निर्माण करण्यात यावे. बांधकाम कामगारांना न्यायालयाने सूचित केल्यानुसार दहा हजार रुपये बोनस मिळावा. कोणत्याही वयाचा नोंदीत बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना दोन लाख रुपये आर्थिक मदत मिळावी. इत्यादी मागण्यासाठी नागपूर विधानसभेवर मोर्चा 28 डिसेंबर 2022 रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या मोर्चामध्ये सांगली जिल्ह्यातील जास्तीत जास्त बांधकाम कामगारांनी भागीदारी करावी असे त्यांनी आवाहन केले.
कॉ सुमन पुजारी यांनी सांगितले की महाराष्ट्रातील आशा महिलांना दरमहा किमान 25 हजार रुपये किमान वेतन मिळाली पाहिजे या व इतर मागण्यासाठी नागपूर विधानसभेवर मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. तरी जास्तीत जास्त आशा व गट प्रवर्तक महिलांनी 28 नोव्हेंबर च्या डिसेंबरच्या मोर्चामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले.
या मेळाव्यामध्ये कॉ संतोष बेलदार ,कॉ सणा मुल्ला, कॉ राजेंद्र कर्नाळकर, कॉ शिराज शेख व सलीम इनामदार इत्यादींनी मेलाव्यामध्ये आपले मत व्यक्त केले. शेवटी मेळाव्यामध्ये आभार प्रदर्शन कॉ विशाल बडवे यांनी केल्यानंतर मेळावा समाप्त झाला.
