अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुखपदी गणेश नलवडे

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुखपदी गणेश नलवडे

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुखपदी गणेश नलवडे

कोल्हापूर: भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देणाऱ्या अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख पदी श्री गणेश चंद्रकांत नलवडे* यांची निवड करण्यात आली आहे.

     समितीचे महाराष्ट्र राज्याचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष *मा. श्री. धीरज रोकडे सर* यांच्या हस्ते नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात नलवडे यांना नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

    नलवडे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन समितीने त्यांच्यावर जिल्ह्याची जबाबदारी सोपवली आहे.

     याप्रसंगी बोलताना नलवडे म्हणाले, "मला मिळालेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडेन. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जाऊन लोकांना त्यांच्या अधिकारांची माहिती देणार. शासकीय कामात होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी समितीच्या माध्यमातून जनजागृती आणि कायदेशीर मदत केली जाईल."

    याप्रसंगी, श्री धनंजय सराटे सर, मधुकर मांडवकर, कयेश पोवार, अनिरुद्ध कुलकर्णी,  सलमान पठाण, सुनील यादव, महादेव मोहिते, अविनाश कांबळे आदी पदाधिकारी,  कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *