राज्यस्तरीय
एकदिवसिय आरक्षण हक्क परिषद संपन्न
अधिकारी- कर्मचारी व सामाजिक संघटनांनी स्वतंत्र राजकीय भूमिका घ्यावी ही काळाची गरज
रजत डेकाटे // नागपूर प्रतिनिधी
आरक्षण हक्क कृती समितीद्वारा चिंतन-हाँल माताकचेरी नागपूर येथे एकदिवसिय आरक्षण हक्क परिषद आयोजित केली.
पहील्या सत्राची सुरुवात कास्ट्राईब महासंघाचे अध्यक्ष अरुण गाडे याःचे अध्यक्षतेखाली व संविधान प्रास्ताविकचे वाचन करुन झाली. नाटककार संजय सायरे यांनी प्रथम जयभीम गीत सादर केले. आरक्षण हक्क कृती समितीने महाराष्ट्रात आंदोलन केली सरकारने दखल घेतली नाही आता रस्त्यावरची लढाई लढायची आहे.आणि अधिकारी -खर्मचारी व सामाजिक संघटनांनी राजकीय भुमिका घेणे काळाची गरज आहे. मागासवर्गियांची हक्काची .40%वोट बँक आपल्याकडे असतांना आपण पराधिन झालो.यापूढेआपले प्रतिनिधी निवडून आणण्याची ताकद निर्माण करण्यासाठी सर्व बहुजन संघटनानी एकत्र आल्याशिवाय न्याय मिळणार नाही असे अरुण गाडे यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.
माजी ऊपकुलसचिव पुरण मेश्राम यांनी ऊच्च शिक्षण क्षेत्रातील शैक्षणिकआरक्षण संपविण्याचे षडयंत्र आकडेवारीसह विशद केले.पहिल्या सत्रात आयबीसेफचे एस.के.भंडारे,आँल ईंडिया आदिवासी एम्पलाँईज फेडरेशनचे मधुकर ऊईके,धनगर अधिकारी कर्मचारी सःघटनेचे अनिल कुमार ढोले,हलबा-हलबी अधिकारी कर्मचारी संघटनेचे फरेंद्र कुतीरकर यां सर्व वक्त्यांनी मागासवर्गियांच्या विरोधात सरकारचे षडयंत्र अन्यायकारक असुन सरकारला धडा शिकविणे आवश्यक असल्याचे म्हटले.
दुसरे समारोप सत्र ईंजि कुलदीप रामटेके यांचे अध्यक्षते खाली संपन्न झाले “संविधान आणि आरक्षण ” या विषयावर वक्त्यांनी मार्गदर्शन केले. कुलदीप रामटेके यांनी विविध न्यायालयीन प्रकरणाचा परामर्श घेतांना न्यायालये ही सुध्दा बहुजन विरोधी असुन मनुवादी विचारसरणी जोपासत आहे:आपला लढा हा व्यवस्थेविरोधात असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.मागासवर्गिय विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे डाँ.नितिन कोळी,परिसंघाचे राज्याध्यक्ष डाँ.संजय कांबळे (बापेरकर),पशु वैद्यकीय संघटनेचे डाँ.अश्विन मेश्राम,बँक असोसिएशनचे शरद कांबळे,अ.भा.तांडा सुधार समितीचे नामा जाधव,सामाजिक कार्यकर्त्या अँड.सोनिया गजभिये,यांनी मार्गदर्शन केले.एम.एस.जांभुळे यांनी क्रांतीगीत सादरकरुन दुस-या सत्राची सुरुवात केली.संचालन प्रा.डाँ.एम.एस.वानखेडे,प्रास्तविक शामराव हाडके आभार विठ्ठल मरापे यांनी केले.
याप्रसंगी डाँ.नितिन कोळी आणि अँ.सोनिया गजभिये यांच्या कार्याचा गौरव म्हणून शाल व मोमेंटोदेऊन सत्कार करण्यात आला.
या परिषदेला महाराष्ट्रातून विविध संघटनाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने ऊपस्थित होते.

