बाईने लावली बुडाला आग
✍🏻 नवनाथ दत्तात्रय रेपे
repe9nat@gmail.com
repe9nat@yahoo.com
नको दंतकथा येथे सांगो कोणी ! कोरडे ते मनी बोल कोण !
अनुभव येथे व्हावा शिष्टाचार ! न चलती चार आम्हापुढे !
ही संत तुकोबाराय यांची शिकवण आहे. पण याच तुकोबांच नाव घेऊन टिळा टोपी परिधान करणारे भामटे काल्पोकल्पीत कथांचा भडीमार करताना पाठीवर मांडे कसे भाजले ? भिंत कशी चालली ? रेडा वेद कसा बोलला ? अशा बुड ना शेंडा असलेल्या दंतकथांवर चार चार तास कंबरा बांधून कोकलतात तेव्हा त्यांना तुकोबारायांनी सांगितल्या या अभंगाचा विसर पडतो का ? आमच्या लोकांना बुड ना शेंडा असलेल्या गोष्टी वारंवार शिकवून त्यांच्या मस्तकाची माती करण्याचं काम इथल्या धर्मांध शक्तींनी पुर्वीपासूनच केले. त्या कथात घुसडल की, पाठीवर मांडे भाजले, रेड्याच्या तोंडातून वेद वदवून घेतले. मग हेच एका कार्यक्रमात सुषमा अंधारे यांनी संस्कृतीचा वेगळेपणा अधोरेखित करताना काही प्रश्न उपस्थित करत म्हटले होते की, रेड्याला शिकवण्याचे सामर्थ इथल्या संतामध्ये आहे म्हणून चमत्कार, अरे तुम्ही रेड्यांना शिकवले रे माणसांना कुठं शिकवल ? माणसांना नाही शिकू दिलं ह्यांची संस्कृती कशी रेड्याला शिक शिक म्हणून मागे लागतात, पण माणसाला शिकू द्यायच नाही. ह्यांची संस्कृती काय कुत्रं भाकर घेऊन गेलं तर तुपाची वाटी राहीली म्हणून एकनाथ महाराज त्याच्या मागं अरं तुप खा, अरं तुप खा नुसतीच रोटी कशी खातो. तुप पण खा सोबत’ असं प्रकारच वक्तव्य केलं. https://www.youtube.com/watch?v=GZR8vzxn-VQ सुषमा अंधारेंचा विरोध करणा-या बांडगुळांनी आपलं भंकस कथांचं साहीत्य घेऊन चर्चेसाठी अंधारेंसोबत बसावं कारण आता जो बहुजन समाज जागा होत आहे, तो तुम्हाला प्रश्न विचारून उत्तरे घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. सुषमा अंधारे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांच्या बुडाला आग लागलेली दिसते. त्यात तथाकथित वारकरी म्हणतात की, राजकारणाच्या ठिकाणी राजकरण कराव पण देवाधर्मावर टिका करू नये, पण या मुर्ख बाईला हे समजत नाही. https://www.youtube.com/watch?v=GZR8vzxn-VQ प्रश्न उपस्थित केले म्हणून जर सुषमा अंधारे यांना हे टिळा टोपीवाले मुर्ख म्हणून एकेरी भाषेत बोलत असतील तर यांना थेट तुकोबांच्या शब्दात सांगावं वाटतं की,
मऊ मेणाहुनि आम्ही विष्णूदास ! कठिण वज्रास भेदू ऐसे !
मेले जित असो निजोनिया जागे ! जो जो जो जें मागे ते ते देऊ !
भले तरी देऊ गांडीची लंगोटी ! नाठ्याळाचे गांठी देऊ माथा !
सदा सर्वकाळ अंतरी कुटिल ! तेणे गळा माळ घालू नये !
ज्यासी नाही धर्म दया क्षमा शांती ! तेणे अंगी विभूती लावू नये !
ही तुकोबांची शिकवण विसलेला तथाकथित हभप गणेश शेटे म्हणतो की, सुषमा अंधारे ज्या पक्षात असतील त्या पक्षाला मतदान करू नका. तथाकथित हभप हा संघाच्या शाखेत जाऊन गळ्यात गळे आणि मागच्या मळ्यांची देवघेव करणारा एक खुप मोठा भुमाफीया आहे हे किती लोकांना माहीत आहे ? हा ग्रामपंचायत कार्यालयाच्या हद्दीत येणा-या जमिनी बळकावून अलिशान इमारती कसा काय उभारतो ? गणेश गजानन शेटे हा टिळा टोपी धोतर परिधान करून वारक-यांच्या वेशातील एक भुमाफिया आहे असं जर कोण म्हटलं तर त्यांच चुकत कुठे ? कारण ग्रामपंचायत जऊळका यांच्या हद्दीत येणा-या शासकीय जागेत गजानन शेटे स्वयंघोषित अध्यक्ष गजानन महाराज मंदिर समिती जऊळका यांने अवैधरित्या अतिक्रमण केले असून ते काढण्यासाठी ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार अतिक्रमण काढण्यासाठीची नोटीस अनेक वेळा ग्रामपंचायत कार्यालयाने त्याला दिलेली आहे. परंतु अद्यापपर्यंत शेटे यांनी केलेले अतिक्रमण काढले नसल्याचे लेखी निवेदन मा. तहसिलदार, अकोट यांना ग्रामपंचायत कार्यालय जऊळका यांनी दि. ०१ जाने. २०१३ रोजी पाठवले होते.’ हा तथाकथित भुमाफिया संत तुकोबाराय यांच नाव घेऊन जमीनी हडप करतोय त्याला सांगावं वाटतं की,
मुखे बोले ब्रम्हज्ञान ! मनी धन अभिमान !
ऐशियाची करी सेवा ! काय सुख होय जीवा !
पोटासाठी संत ! झाले कलीत बहुत !
देवाचा बाजार मांडून लोकांचे खिस्से कापणारे भटुर्डे आणि त्यांच्या तालावर नाचून त्याच देवांच नाव घेऊन मलीदा चाखणारे बहुजनातील गणेश शेटे सारखे दलाल यात फरक तो काय ? पण जेव्हा कोण यांच्या देवांना चॅलेंज करत तेव्हा यांना भिती असते ती यांची दुकानदारी बंद होण्याची म्हणून तर पिसाळलेल्या कुत्र्यासारखे लाळ टिपकत भटांचे जोडे उचलून ते देव आणि त्यांच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित करणा-या लोकांवर खालच्या भाषेत टिका करतात. पण टिका त्यांनीच केली पाहीजे ज्यांचे हात भ्रष्टाचार चोरी दरोडा किंवा फसवणूक यांचे मध्ये रंगलेले नाहीत. गणेश शेटे यांचे हात येवढे बरबटलेले असतानाही हा जर सुषमा अंधारे या महीलेने विचारलेल्या वैचारिक प्रश्नांची मापे अवैचारिक पद्धतीने काढत असेल ? तर या प्रकरणावर आम्ही काय म्हणून शांत बसावे ? दि. २२ फेब्रुवारी २०१३ रोजीचे हिंदी दै. लोकमत समाचार मध्ये ‘लकी ड्राॅ के नाम पर धोकाधडी, अपराध दर्ज’ या नावाने आलेली बातमी ही तथाकथित वारकरी संप्रदायात घुसलेला बाजारबुनगा गणेश शेटे या किर्तनकाराचे धोतर फेडायला मदत करणारी आहे. या भामट्याने लोकांना लक्की ड्राॅ ची बनावट तिकिटे विक्री करून लाखोंची माया जमवली होती. त्यामुळे त्याला या प्रकरणात सात दिवसांची न्यायालयीन कोठडीही झालेली आहे. ज्याचे हात बरबटलेले आहेत तो आज वाल्याचा वाल्मिकी होऊ पाहत असेल तर आम्ही त्यांने केलेल्या कृत्यावर पांघरून काय म्हणून घालणार आहोत ? याला पायतानाचे फटके देण्यासाठी आमचे हात पायतान केव्हा घेणार आहेत ? म्हणून इथे तुकोबांच्याच शब्दात सांगावं वाटतं की,
मुखे सांगे ब्रह्मज्ञान ! जन लोकाची कापितो मान !
ज्ञान सांगतो जनासी ! नाही अनुभव आपणासी !
कथा करितो देवाची ! अंतरी आशा बहु लोभाची !
तुका म्हणे तो चि वेडा ! त्याचे हाणूनि थोबाड फोडा !
सावरकर नथुराम टिळक भावे ज्ञानेश्वर यांच स्तोम आम्हा बहुजनांनी काय म्हणून माजवावे ? कारण यांच्याविषयी वीर उत्तमराव मोहीते म्हणतात की, बाळ टिळक कोण होता ? अरे, कोठे तो पोत्याचा टिळक बाळ ! अन् कोठे तो विनू भावे, तो तर रात्रीचे चोरून लाडू खातो ! आणि ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी ? त्या संन्याशाच्या मेंदूला तर परमा रोग झाला होता !’ म्हणजेच या ब्राम्हणवाद्यांनी आजपर्यंत आम्हापुढे जे मांडलं ते तुकोबा म्हणतात तसे ‘गाढवाचे घोडे ! आम्ही करू दृष्टीपुढे ! म्हणून तर सुषमा अंधारे यांच्या नावाने वणवा पेटवणा-या गणेश महाराज शेटे याचे काळे कारनामे जेव्हा लोकांच्या नजरेस पडतील तेव्हा लोक याला पायतानाने ठोकल्याशिवाय राहणार नाहीत. कारण योग योगेश्वर संस्थानचे स्वयंघोषित अध्यक्ष गणेश शेटे यांचेवर दहिहांडा पोलिस स्टेशनमध्ये एक तक्रार दाखल झाली होती ती म्हणजे, ग्रामपंचायत जऊळका हद्दीतील शासकीय जमीन गट नंबर ६ क्षेत्र १ हेक्टर २२ आर यावर अतिक्रमण करून धर्मादाय आयुक्त कार्यालयातच काय तर कुठेही रजिस्ट्रेशन नसलेल्या योग योगेश्वर संस्थानला बनावट रजिस्ट्रेशन नंबर देऊन त्यानावाने लक्की ड्राॅ ची तिकीटे विकून लोकांकडून पैसे उकळण्याचा या महाशयांनी जोरात धंदा चालवला होता. या रजिस्ट्रेशन नसलेल्या संस्थेच्या नावाने सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पिकर लावून लक्की ड्राॅ ची जाहीरात हा गणेश शेटे करून लोकांची फसवणूक करत होता. त्यामुळे त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची बातमीही दि. ०५ डिसेंबर २०१२ रोजी दैनिक सकाळ या वृत्तपत्राने प्रसिद्ध केली होती.’ वारकरी सांप्रदायाचा कळस असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांनी कर्जखते असलेल्या वह्या इंद्रायणीत बुडवून इथल्या लोकांना कार्जमुक्त केलं होतं तर दुसरीकडे आज त्यांचेच नाव घेत टिळा टोपी घालून लाॅटरीची तिकीटे विकणारे, शासकीय जमीनी हडप करणारे हे तथाकथित भामटे तुकोबांच्या वारकरी सांप्रदायातीलच असतील का ? तथाकथित भगवे वस्त्र परिधान करून स्वत:ला किर्तनकार म्हणून घेणारी संगिता आंधळे नावाची महीला जी भाषा वापरते तीच्या तोंडून शब्द नव्हे तर विष्ठेचे लोळ बाहेर पडतात असं म्हटलं तर आमचं चुकत कुठे ? हे वारकरी संप्रदायात घुसलेले मनुवादी किडे आमच्या लोकांनी ओळखून यांना वेळीच धडा शिकवला पाहीजे. म्हणून तर डाॅ. बालाजी जाधव म्हणतात की, सुषमा ताईंचा वैचारिक प्रतिवाद न करता येणारे हरामखोर त्यांच्या बद्दल ‘ म्हसाड ‘ ‘ रेडे ‘ असे शब्द वापरत आहेत… यातच त्यांचे वारकरी ज्ञान किती तोकडे आहे हे लक्षात येते.
आज सुषमा अंधारे यांचेवर चिखलफेक करणारा तथाकथित भामटा गणेश शेटे २००५ साली जेव्हा गोपाळ रामकृष्ण बडवे नावाचा भडवा पंढरपूरच्या तिर्थकुंडात मुतला होता तेव्हा हा शेटे कोणाची हजामत करत बसला होता ? आज कोकलणारा हा गणेश शेटे काही दिवसांपूर्वी लोकांची खिस्से कापत होता हे वारकरी सांप्रदायातील किती लोकांना माहीत आहे ? हा लुटारू देवाच्या नावाने भक्तांची लुट करणारा लूटारू आहे हे तेव्हाच समजेल जेव्हा तुम्ही दै. देशोन्नती मधील बातमी वाचाल. ती बातमी अशी की, श्री. गजानन महाराज संस्थान शेगाव जि. बुलढाणा यांनी दै. देशोन्नती दि.२९ नोव्हें. २०१२ रोजी जाहीर आव्हान करून सर्तकतेचा इशारा मध्ये म्हटले होते की, श्री गणेश महाराज शेटे योगेश्वर संस्थान, वरूड ता. अकोट जि. अकोला यांनी प्रसिद्ध केलेल्या पॅम्लेट व भितीपत्रकावरून ही संस्था रजिस्टर्ड आहे काय ? किंवा वेगवेगळ्या संस्था दर्शवून वेगवेगळे रजिस्टर्ड नंबर दर्शवणे ही बाब निश्चितच संशयास्पद वाटते. त्यांनी ‘श्री’ चे नावाखाली अवैध पावत्या छापून, संस्थांनचा अधिकृत असलेला ‘श्री’ चा फोटो छापून श्री च्या विजय ग्रंथातील ओळी छापून वापरून दिशाभूल करून, भावणिक संबंध दाखवून वर्गणी गोळा करणे तसेच ‘श्री’ चे मंदीर बांधण्याबाबत लकी ड्राॅ काढून भक्तांची भावणिक दिशाभूल करून पैसा गोळा करण्याचा संबंधित प्रकार फसवेगिरीचा वाटतो. श्री गणेश महाराज शेटे हे स्वतःला विश्व वारकरी संघटनेचे पदाधिकारी म्हणून घेतात. परंतू वारकरी संप्रदायामध्ये अशा अवैध मार्गाने पैसा गोळा करून मंदिर उभारण्याचा प्रयत्न आतापर्यंत कधीच झालेला नाही व तसे निदर्शनासही आले नाही. तेव्हा अशांना काय म्हणावे ? हा प्रश्न उपस्थित होतो.
वरील सर्व माहिती श्री. ज्ञानेश्वर रामभाऊ बोरोकार माजी उपसभापती पंचायत समिती अकोट यांनी पावती व पाॅम्लेटसह जो अर्ज दिला आहे. त्यावरून ते आवाहन करत आहेत की, अशा प्रकारापासून सावध रहावे. व अशा आयोजकांना कोणताही सहयोग देऊ नये. संस्थानाने भक्तांची फसगत होऊ नये ‘श्री’ च्या बाबत असलेल्या श्रद्धा व भावणेस तडा जाऊ नये, म्हणून अनेक वेळा सूचना दिलेल्या आहेत. तरीही श्री. गणेश शेटे यांनी हा भावनिक गैरप्रकार प्रसिद्ध व पैशाकरिता केलेला दिसतो. हा संस्थेच्या उद्देशाला धरून नाही. संस्थानकडून विनंती की, अशा करिता भक्तांनी कोणत्याही प्रकारचा सहभाग देऊ नये. तसेच यामध्ये टिप देऊन म्हटले की, अशाच बाबतीत संस्थानकडून दि. २९.०३.२०११ रोजी दै. देशोन्नती मध्ये व दि. ३०.०३.२०११ रोजी दै. लोकमतमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. पुन्हा असे घडू नये म्हणून सर्वांनी सावध रहावे.’ अशा भामट्यांचं धोतर फेडून त्याने परिधान केलेली संघीची चड्डी काढून नागडं केलं पाहीजे. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात की,
उभ्या बाजारात कथा ! हे तो नावडे पंढरीनाथा !
अवघे पोटासाठी ढोंग तेथे कैचा पंढरीनाथ !
लावी अनुसंधान ! काही देईल म्हणुन !
काय केले रांडलेका ! तुला राजी नाही तुका !
जगद्गुरु तुकोबांपेक्षा मनु श्रेष्ठ अस जेव्हा मनोहर कुलकर्णी हा भट बोंबलून आभाळ हेपलत होता तेव्हा तथाकथित गणेश गजानन शेटे नावाचा संघी लोकांकडून योग योगेश्वर संस्थान या धर्मादाय आयुक्त यांचेकडे रजिस्ट्रेशन नसलेल्या संस्थेच्या नावाने लकी ड्रॉ ची कुपने विकून लाखोंचा मलिदा चाखत होता असं म्हटलं तर आमचं चुकत कुठे ? कोणाचीही परवानगी न घेता लकी ड्राॅ च्या माध्यमातून बेकायदेशीररित्या जमलेला पैसा गणेश शेटे आपल्या संस्थानचे बांधकाम करण्यासाठी वापरून त्याने भक्तांची फसवणूक केली अशी तक्रार ज्ञानेश्वर बोरोकार यांनी दाखल करून त्यांचेवर कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल झाला. याची ‘..अखेर शेटे महाराजाविरूद्ध गुन्हा दाखल !’ अशी सविस्तर बातमी दैनिक देशोन्नतीने दि. १० जानेवारी २०१३ रोजी प्रकाशित केली होती. ह्या तथाकथित हभप गणेश शेटेच वर्तन म्हणजे तुकोबा वर्णन करतात तसे नाहीतर कसे आहे ? कारण तुकोबाराय म्हणतात की,
कान फाडुनिया मुद्रा ते घालती ! नाथ म्हणविती जगामाजी !
घालोनिया फेरा मागती द्रव्याशी ! परि शंकरांनी नोळखती !
पोट भरावया शिकती उपाय ! तुका म्हणे जाय नर्क लोका !
सुषमा अंधारे यांचेवर टिका करताना गणेश शेटे म्हणतात की, व्हिडिओ जरी जूना असला तरी माणसाचे विचार बदलत नसतात. https://youtu.be/n_1CcQyWanU हो शेटे यांच्या मताशी आम्ही शंभर टक्के सहमत आहोतच कारण जसे विचार बदलत नसतात तसेच तर टिळा टोपी घातल्याने भुमाफियागिरी, फसवेगीरी, लुटालुटी करणाऱ्यांचे विचार थोडीच अष्टगंध कपाळी लावून बदलणार आहेत ? त्यामुळे समस्त वारकरी सांप्रदायातील तुकोबांच्या वैचारिक वारसदारांना सांगावं वाटतं की, ह्या चोरांच्या नादी लागून सुषमा अंधारे यांचा निषेध किंवा विरोध करू नका. कारण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की, सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानियले नाही बहुमता! हे लक्षात घ्या. शेटे नामक चोरांने टिळा टोपी घालून महाराष्ट्र पेटविण्याचा जो विडा उचलला आहे त्या हातावरच घाव घाला कारण हा रेशिमबागेतील चमच्या आहे. रेशिमबागेत शस्त्र पुजानाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणारा प्रदीप जोशींच्या रात्रीच्या खेळातील खेळाडू आहे. हा जेल रिटर्न व्यक्ती जर खुपचं अभ्यासू असेल तर त्यांने सुषमा अंधारे यांचे बरोबर चर्चा करायला काय अडचण आहे ? महीलेवर खालच्या भाषेत टिका करण्याची शिकवण काय वारकरी सांप्रदायाची आहे का ? हा रामदासी शाखेत वाढलेला शेटे रामदासाप्रमाणे वर्तन करणार नाहीतर काय प्रदीप जोशी सारखे वर्तन करणार आहे का ? म्हणून अशा विकृतींना चोप देण्यासाठी तुकोबा म्हणतात की,
गाजराची पुंगी तैसे नवे झाले जोगी !
काय करोनि पाठन ! केली अहंता जतन !
अल्प असे ज्ञान ! अंगी ताठा अभिमान !
तुका म्हणे लंड ! त्याचे हाणोनि फोडा तोंड !
