कपाळी टिळा टोपी; तो कैसला किर्तन करी ?

कपाळी टिळा टोपी; तो कैसला किर्तन करी ?

कपाळी टिळा टोपी; तो कैसला किर्तन करी ?

✍🏻 नवनाथ दत्तात्रय रेपे
भट बोकड मोठा या पुस्तकाचे लेखक
repe9nat@gmail.com

मेरी तु़ंबडी भर दे ! मेरी तुंबडी भर दे !
आले उपाध्ये भट वहापांचांचा गट ! जमून करी वटवट !
हात पसरिती चट ! घेती दक्षिणा घट ! कशी वरून – लगट !
मेरी तु़बंडी भर दे ! मेरी तुंबडी भर दे !
या महात्मा जोतिबा फुलेंनी मांडलेल्या ओळी आजच्या तथाकथित पोटभरू किर्तनकारांसाठी शंभर टक्के लागू पडतात असं म्हटलं तरी चालेल. कारण तुकोबांची बदनामी होत असताना हे विरोध करताना कुठेच दिसत नाहीत. कपाळी टिळा गळ्यात माळ हातात टाळ दिसला की आमच्या लोकांना वाटत की हा वारकरी आहे. त्यामुळे त्याला लोक आजही मान सन्मान देतात. मग त्यांच्याकडे विचारांची कमरता असो अथवा विचारांची आणि त्याची भेटही झालेली नसो. आमच्या लोकांच्या नजरेस टिळा टोपी दिसली की, लोक महाराज महाराज म्हणून त्याच्याभोवती गोळा होतात, पण हा टिळा टोपीवाला खरच संत नामदेव व संत तुकाराम महाराज यांनी जो वारकरी संप्रदायाचा विचार सांगितला त्या विचारांचा प्रचार, प्रसार आणि करतोय का ? याचा आज कोणीही विचार करत नाही. म्हणूनच तर वारकरी सांप्रदायात बनावट वारक-यांनी घुसखोरी केली असं म्हटलं तरी चालेल. कारण ह्या बनावट वारक-यांचे वर्तन विचारधारा आणि वारकरी संप्रदायाची विचारधारा यांचा कुठेच ताळमेळ बसताना दिसत नाही. त्यामुळे म्हणाव वाटत की, कपाळी टिळा टोपी; तो कैसला किर्तन करी ?. संतांच्या वारकरी सांप्रदायात भडव्यांनी केलेली घुसखोरी कशी ओळखायची यासाठीच तर तुकोबाराय म्हणतात की,
टिळा टोपी उंच दावी ! जगी मी एक गोसावी !
अवघा वरपंग सारा ! पोटी विषयांचा थारा !
मुद्रा लाविती कोरोनि ! मान व्हावयासी जनी ! तुका म्हणे ऐसे किती ! नरका गेले पुढे जाती !

धर्माचे पाळण ! करणे पाखंड खंडण !
हे चि आम्हा करणे काम ! बीज वाढवावे नाम !
हा तुकोबांचा अभंग आपल्या मस्तकी घेऊन आंबेडकरवादी चळवळीतील सुषमा अंधारे या नेहमी आपल्या कार्यक्रमातून अंधश्रद्धा अनिष्ट चालीरीती वर भाष्य करून लोकांना भटी कर्मकांडापासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्यांचा धंदाच कर्मकांडावर टिकून आहे, त्यांना थोडीच सुषमा अंधारे पचनी पडणार आहेत ? त्यामुळे अंधारेंच्या व्हिडीओ क्लिप व्हायरल करून त्यांच्यावर तथाकथित स्वयंघोषीत वारकरी वैचारिक चर्चा न करता केवळ अंधारेंवर शिव्यांच्या भडिमार करत आहेत, तेव्हा यांना वारकरी कसे म्हणावे हाच मोठा प्रश्न आहे. त्याच झालं असं की, सुषमा अंधारे यांनी जे प्रश्न उपस्थित केले त्याची उत्तरे नसल्याने तर पाखंड्यांचा जळफळाट होताना दिसतोय. एक महीला प्रश्न उपस्थित करत असेल तर तीला प्रश्नाची उत्तरे देण्यापेक्षा शिव्या शाप देऊन तीचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बर त्या महीलेबद्दल पुरुषांनी अपशब्द काढले तर समजू शकतो पण स्वतःला राष्ट्रीय किर्तनकार म्हणून घेणारे काही तथाकथित हभप जेव्हा खालच्या भाषेत व्यक्त होतात तेव्हा लेखण्या चालवणे भाग पडते. कारण याच विघ्नसंतोषी व वाचाळविरांना आमची लोक सुपा-या देऊन गावागावात किर्तनासाठी बोलवतात. हे सुपारी बहाद्दर संत तुकोबाराय यांची शिकवण विसरून भलत्याच वाटेला समाजाला घेऊन जात आहेत. त्याच झालं असं की, तथाकथित हभप व स्वयंघोषित राष्ट्रीय किर्तनकार सुनिता ताई आंधळे यांनी आकांडतांडव करताना म्हटले की, “देवाविषयी जी सुषमा अंधारे नावाची कुत्री भुंकत आहे, त्यावर आमच्यासारख्या किर्तनकार महीलांनी बोलावं तीची तेवढी लायकी नाही. पण नाईलाजाने काय म्हणते ती कुत्री की, ज्ञानोबा देवांनी रेडा बोलावला की नाही, हो त्यादिवशी रेडा बोलावला पण रेडे तु गैरहजर होती. मी किर्तनामध्ये सुद्धा असं बोलू शकते पण तिथे माझी एवढी खालची भाषा येऊ शकणार नाही. ती कुत्री काय बोलते की, हनुमान राया उड्डाण घेऊन लंकेला गेले मग तु नाही का ह्या पक्षातून त्या पक्षात उडत उडत गेली. नवरात्रात पतिव्रता उपवास करतात तुला काय करणार त्यातल घुबडे, नालायक कुत्री कुठली. आळंदी मध्ये तु कधी दर्शनाला आली नाही. या कुत्रीला जिथे दिसेल तिथे मी ठोकणार आहे. देवी अंगात येण्याचं तुला काय कळणार आहे मोकार जाणी कुठली. ज्या पक्षामध्ये ती आहे मला वाटतं तो पक्षा संपला अस समजाव, त्या पक्षाला कोणीही मतदान करायचे नाही. सुषमा ही कुत्री सुषमी अंधारे, येवढ मोठं थोबाड तिचं डोबाडीसारख आणि माझ्या ज्ञानोबा विषयी बोलती म्हसाड कुठली. ज्ञानोबांनी ज्ञान देताना तुच गैरहजर होती कुत्रे. समोर बसून जे टाळ्या वाजवत होते त्या बिना बापाच्या औलादी, त्यांच्या बापाचा तपास नसेल. संतांच्या अशा बोलण्यावर त्यांनी टाळ्या वाजवल्या बहुतेक त्यांना त्यांचा बाप सुध्दा माहीत नसावा. या बाईला देशाच्या बाहेर हाकलून द्या, संतांनी चमत्कार दाखवले पण राहीलेले चमत्कार आम्ही येत्या निवडणुकीत दाखवून देऊ. परत वारकरी संप्रदायाच्या नादी लागू नको यानंतर तु मला जिथे दिसशील तिथे ठोकणार अशी धमकी दिली.” हे बोलण आहे तथाकथित स्वयंघोषीत राष्ट्रीय हभप यांचं म्हणून तर यांना थेट तुकोबांच्या शब्दात सांगावं वाटतं की,
अति जाले उत्तम वेश्येचे लावण्य ! परि ते सवासीण न म्हणावी !
उचित अनुचित केले ठाया ठाव ! गुणा मोल वाव थोरपण !
शुरत्वावांचूनि शूरांमाजी ठाव ! नाही आयुर्भाव आणिलिया !
तुका म्हणे सोंग पोटाचे उपाय ! कारण कमाईविण नाही !

सुषमा अंधारे यांनी माफी मागितल्यानंतर ही स्वतःला राष्ट्रीय किर्तनकार म्हणून घेणा-या स्वयंघोषित किर्तनकार आपल्या तोंडातून अश्लिल शब्द बाहेर काढून आपल्यातील मनोवीकृतीचे दर्शन घडवत असतील तर यांना वारकरी संप्रदायातील किर्तनकार कसे म्हणावे ? परस्त्री रुक्माई समान सांगणारा संतांचा विचार घेऊन जाणारे तथाकथित हभप एका कलोकल्पीत कथेवर प्रश्न निर्माण केले म्हणून खालच्या दर्जाची भाषा वापरत असतील तर यांनाच खरे तुकोबांच्या विचारांचे डोस देण्याची गरज वाटत आहे. कारण वारकरी संप्रदाय कधीच महीलांचा तिरस्कार करणारा नाही तर सन्मान करणारा आहे. पण रामदासी विचार डोक्यात घेऊन वारकरी संप्रदायात शिरलेले हे रामदासी बैठकातील रातपाळीचे संघी महीलांना मुर्ख ठरवतात कारण हा रामदासी विचारांचा दोष आहे वारकरी संप्रदायाचा नव्हे ! ज्या मुर्तीवर उभ्याने कुत्रे लघुशंका करते त्या मुर्ती विषयी जर प्रश्न केला तर त्यांना कुत्रे म्हणण्याचा अधिकार या जंत मंडळींना कोणी दिला ? अंधारेंच्या प्रश्नांची उत्तरे न देता तिची लायकी काढणा-या तथाकथित टिळा टोपी वाल्यांची वैद्धीक वेश्यागिरी किती मोठ्या प्रमाणात झाली आहे हे स्पष्ट होत. ज्ञानेश्वरांनी रेडा बोलावला तेव्हा अंधारे नसल्याने त्यांना अक्कल नसेल असं समजलं तर रेड्याचं नाव घेऊन दररोज पैसा घेऊन किर्तन करणा-या तथाकथित हभपना तरी कुठे बोलण्याची अक्कल आहे ? मी किर्तनामध्ये सुद्धा खालची भाषा बोलू शकते म्हणणा-या आंधळेंनी स्वतः ची लायकी कोणत्या दर्जाची आहे हे स्वतःच मान्य केले आहे. संत गाडगेबाबा पंढरपूरला दर एकादशीला जात पण त्यांनी एकही उपवास धरला नाही हे का आंधळेंना माहीत नसेल ? रामदासी बैठकीत वाढलेल्यांच्या तोंडी वैचारिकता कमी अन् शिव्यांचा भडिमार जास्त असतो. म्हणून तर घुबडे नालायक कुत्रे असे शब्द तथाकथित किर्तनकारांच्या तोंडून बाहेर पडताना दिसतात. सुषमा अंधारे जिथे दिसतील तिथे फाडण्याची भाषा करणा-या आंधळेंनी एखाद्या मनोविकार तज्ञांकडे जाऊन उपचार घ्यायला काय अडचण आहे ? देवी अंगात घुसत असेल तर आंधळेंच्या अंगात कोणती देवी आहे ? इतरांना जाणी मोकार संबोधणा-या आंधळेंना देवदासी प्रथा कोणी सुरू केली हे माहीत आहे का ? पक्ष कोणता संपणार हे कोणालाही माहीत नसताना शिवसेना पक्ष संपणार हा आंधळेंना काय स्वप्नदोष झाला का ? पक्षाला कोणीही मतदान करू नये म्हणणा-या आंधळे कपाळी टिळा लावून कोणत्या पक्षाच्या स्टार प्रचारक झाल्या आहेत ? आंधारेंच्या एवढ्या मोठ्या डोबाडीसारख्या तोंडातून निघालेल्या छोट्याश्या विचाराने रामदासी स्वयंसेवक व तथाकथित किर्तनकारांचा पितांबर पिवळा का व्हावा ? ज्ञानोबांनी ज्ञान देताना सुषमा आंधारे गैरहजर असतील तर ठिक आहे पण तेव्हा त्या ज्ञानदानाच्या कार्यक्रमात कोणते ज्ञान वाटप झाले हे आपल्या तोंडून दिसत आहे. सुषमा आंधारेंच्या वक्तव्यावर टाळ्या वाजवणारांचे बाप आहेत एवढे मात्र नक्की पण आंधळे ज्यांचं स्तोम माजवत आहेत त्यांच्या माय बापाचा पत्ताच नाही त्याचे काय ? खीर खाऊन जन्मलेल्या बापाच्या औलादी कोण आहेत ? यांचं भान नसलेल्या लोकांच्या तोंडी शिव्या नाहीतर काय वेद येणार आहेत का ? बाईला देशाच्या बाहेर हाकलून द्या म्हणणा-या आंधळेंना माहीत नसेल की, त्या ज्या ब्राम्हणांचे देव्हारे मस्तकी घेऊन फिरत आहेत ते ब्राम्हणच विदेश आहेत. मग त्यांना हाकलून देण्यासाठी आंधळे कधी व्हिडिओ तयार करणार आहेत ? रामदासी बांडगुळांनी इथल्या ख-या वारकरी संप्रदायाच्या नादी लागू नये अन्यथा ‘नाठाळाचे माथा मारू सोठा’ हे तुकोबांनी आम्हाला सांगितले आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात की,
नको दंतकथा येथे सांगो कोणी ! कोरडे ते मानी बोल कोण !
अनुभव येथे व्हावा शिष्टाचार ! न चलती चार आम्हापुढे !
तुका म्हणे येथे पाहीजे जातीचे ! येरा गबाळाचे काम नाही !

सुषमा अंधारे यांचे वक्तव्य योग्य ठिकाणी लागल्यामुळे अनेकांचा मुळव्याध ठणका देऊ लागला. त्यामुळेच ते तोंडाला कुत्रं बांधल्यागत जोरजोरात भुंकू लागल्याचे दिसत आहे. असाच सोशल मिडीयावर एक व्हिडीओ मिळाला त्यात ती महीला म्हणते की, सुषमा अंधारे आमचा एखादा देव शिल्लक ठेवला का ? तु आता कोल्हापुरला देवीला काय झक मारायला गेली का ? सगळे लोक हाग* तुझ्या तोंडावर नालायक ड्याची, भिकमागे तोंडाची हीच्या तोंडावर हाला पाहीजे महाराष्ट्र सारा ! उटली की काहीतरी भुकती आणि आमचे नालायक टाळ्या वाजवतात. ही दुबईला जाते दिड महीन्याची पोरगी ठेऊन आणि आम्हाला शिकवते. महाराष्ट्राच्या भुमित तुझा जन्म झाला आहे, अभिमान वाटू दे जरा. परत तु अशी बोलली तर तुला दाखवते.” अशी धमकीही या महीलेने दिली. त्या महीलेला सांगावं वाटतं की, जोर का झटका धीरे सें देण्याचं काम चळवळीत घडलेला व्यक्ती करतो तेव्हा तो झटका प्रत्येकालाच सहन होईल हे सांगता येत नाही. असाच एक झटका देऊन सुषमा अंधारे यांनी देऊन इथल्या ब्राम्हण व ब्राम्हणवाद्याच्या तोंडावर पायतान भिरकावल आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. पण या पायतानाचा एवढा मार लागली की अनेकांचा पृष्ठभाग पिवळा झाला त्यात अनेक ढोंगी संधीसाधू किडे आहेत त्यांना सुषमा अंधारेंचे शब्द जिव्हारी लागले म्हणून तर ते आज विष ओकत आहेत. पण यांच्या विषारी वक्तव्यामुळे आज संबंध महाराष्ट्राला या ढोंग्याची ओळख झाली हे म्हत्वाचे. कारण सुषमा अंधारे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांचाच मुळव्याध खवळतोय ज्यांना त्यांची दुकानदारी बंद होण्याची भिती आहे. स्वतःला वारकरी म्हणून घेणारी एक महीला म्हणते की, सुषमा आमचा एक तरी देव शिल्लक ठेवला का तू त्या तथाकथित महीलेला सांगावं ‘एक शिवाजी हे नुसते नाव जरी उच्चारले तरी हिंदूंच्या तेहतीस कोटी देवांची फलटण बाद होते’ असे प्रबोधनकार ठाकरे म्हणतात. अंधारेंच्या तोंडावर लोकांना हा*ण्यास सांगणा-या महीलेच्या देवावर दररोज कुत्रे मुतून राहीले त्याचे काय ? पंढरपूरच्या तिर्थकुंडात मुतला तो ब्राम्हण नालायक नव्हता का ? मंदीरात दानपेठीचा कटोरा ठेवून मागितली जाते तीला भिक नाहीतर काय म्हणतात ? ज्या व्यवस्थेने महीलांना चूल आणि मुल पर्यंतच बंदिस्त करून ठेवलं होतं त्याला छेद देत सुषमा अंधारे दुबईला गेल्या तर तुमच्या तोंडून विष्ठा का बाहेर पडत आहे ? महाराष्ट्र ही संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भुमि आहे पण त्यात तुमच्यासारखी जळमटं निपजतात त्याच काय ? म्हणून तर तुकोबाराय म्हणतात की,
मुखे सांगे ब्रह्मज्ञान ! जनलोकाची कापितो मान !
ज्ञान सांगतो जनासी ! नाही अनुभव आपणासी !
कथा करितो देवाची ! अंतरी आशा बहू लोभाची !
तुका म्हणे तो चि वेडा ! त्याचे हाणूनि थोबाड फोडा !

पैसे घेऊन किर्तन करणारे तथाकथित हभप वारकरी संप्रदायाच्या विचारांची पेरणी करण्याऐवजी रामदासी विचारांची घुसळण करून लोकांची मती भ्रष्ट करतात अशा हभपना जगद्गुरु तुकोबाराय यांच्या खालील अभंगाचा विसर पडला आहे का ? कारण तुकोबाराय म्हणतात की,
जेथे कीर्तन करावे ! तेथे अन्न न सेवावे !
बुका लावू नये भाळा ! तृण मागो नये जाणा !
तटावृषभासी दाणा ! तृण मागो नये जाणा !
तुका म्हणे द्रव्य घेती ! देती ते ही नरका जाती !
आज रेडा ज्ञानोबा रोटी तुप आणि कुञ्यावर सुषमा अंधारे यांनी भाष्य केलं म्हणून त्यांच्याविरोधात कर्णकर्कश आवाज करणारे तथाकथित हभप तुकोबांची बदनामी होते तेव्हा नेमके कुठे असतात ? कारण संपा. गौरव शंकर कुलकर्णी यांने फिरकी दिवाळी अंक २०२० मध्ये तुकोबांच्या नावे ‘तुका म्हणे करावी पार्टी’ अशी चारोळी प्रकाशित करून तुकोबांची खिल्ली उडविली होती, तेव्हा स्वयंघोषित किर्तनकार सौ. आंधळेंनी व्हिडिओ केल्याचे कुठेच का दिसले नाही ? जेव्हा पंढरपूरच्या तिर्थकुंडात रात्री दोन वाजता गोपाळ रामकृष्ण बडवे नावाचा भडवा लघुशंका करून तमाम वारक-यांना मुत्र पाजत होता. तेव्हा हे गोंडस तोंड घेऊन फिरणारे तथाकथित हभप गोमुखातील पाणी पिऊन जिभाळ्या चाटत बसले होते का ? मागे काही दिवसांपूर्वी शालेय अभ्यासक्रमात संत तुकोबाराय यांचा समावेश केला खरा पण त्यातून त्यांच्या पत्नीच्या तोंडी जो शब्दप्रयोग घातला तो तुकोबांचा अवमान करणारा होता हे तथाकथित हभप मडके, तथाकथित हभप एक नंबरचा भुमाफिया गणेश शेटे व स्वयंघोषित राष्ट्रीय किर्तनकार आंधळे ताईंना माहीत झालेच नाही का ? रेशिमबागेच्या उकीरड्यावर जाऊन बांग देणा-या तथाकथित पोटभरूनी आम्हा बहुजनांना वारकरी संप्रदायाची शिकवण काय आहे ते सांगू नये. नामदेव तुकोबांच नाव घेऊन पैसा उकळणारे आम्ही मुळीच नाही आहोत. जे या संताच नाव घेऊन आपला बाजार जोमात चालवतात त्यांना या महापुरुषांचा झालेला अवमान दिसत नसेल तर यांनी पंढरपूरच्या तिर्थकुंडात जीव द्यावा. कारण पैश्यासाठी तुकोबांच्या नावाचा वापर करणारे तथाकथित हभप शेटे मडके व आंधळेच आहेत म्हणून तर त्यांना थेट तुकोबांच्याच शब्दात सांगावं वाटतं की,
कीर्तनाचा विकरा मातेचे गमन ! भाड खाई धन विटाळ तो !
हरिभक्ताचि माता हे हरिगुणकीर्ति ! इजवर पोट भरिती चांडाळ ते !

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *